हेरले / प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवभारत या हिंदीत दैनिकाला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवभारताचे शिल्पकार हा कार्यक्रम घेण्यात आला.नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या भारतातील काही मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
याप्रसंगी लोकसभा खासदार पूनम महाजन,नवभारत समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक निमिश बाबू माहेश्वरी उपस्थित होते.
घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यापीठाची जबाबदारी विश्वस्त विनायक भोसले यांना दिल्यानंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट, संजय घोडावत आयआयटी आणि मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून क्षणाचा विस्तार सर्व दूर पोहोचवला. यामुळे शिक्षण क्षेत्रात अविरत काम करणारी शिक्षण संस्था म्हणून संजय घोडावत विद्यापीठ नावा रूपाला आले. त्यामुळे राष्ट्रीय राज्य आणि संस्थांतर्गत पातळीवर विविध पुरस्काराने या शिक्षण समूहाला गौरवण्यात आले.
या पुरस्काराबद्दल बोलताना विनायक भोसले म्हणाले,की संजय घोडावत यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा पुरस्कार घोडावत विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या सर्व टीमचा आहे.
या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत,कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,सर्व अधिष्ठाता,प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.