हेरले /प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथील पाटील वाड्यामध्ये माजी सभापती राजेश पाटील यांच्या वतीने
डॉ. पद्माराणी पाटील व पोलीस पाटील नयन पाटील यांच्या नेतृत्वाखाली खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला होममिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
जल्लोष होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे निवेदन विशाल बेलवळेकर पाटील यांनी केले. या कार्यक्रमामध्ये गावातील बहुसंख्य भगिनींनी सहभाग घेतला. महिलासाठी करमणूक व मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमातील प्रथम क्रमांक व पैठणीचे मानकरी
सौ. अनिता मुंडे यांनी बहुमान पटकावला.द्वितीय क्रमांक व सोन्याची नथीची मानकरी सौ. पल्लवी इंगळे तसेच तृतीय क्रमांक सौ. माणिक पाटील ह्या चांदीचे करंडकचे मानकरी ठरल्या. कार्यक्रमासाठी महिलांचा उत्साह विलोभनीय होता.
फोटो
हेरले:जल्लोष होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे बक्षीस सौ. अनिता मुंडे यांना वितरण करतांना माजी सभापती राजेश पाटील व डॉ. पद्माराणी पाटील