सध्याचे जग आधुनिक युग व वैज्ञानिक उपाशी म्हणले जाते पण त्या नवीन व आधुनिक युगात किंवा वैज्ञानिक युगात वाचन असेल तर तुम्ही या जगाच्या समस्या व आव्हानांना तुम्ही तोंड देऊ शकणार आहात मातृभाषा हीच जन्म भाषा असते लहानपणापासून आपल्यावर ज्या भाषेचे संस्कार घडतात तीच भाषा आपली निखळ व अर्थाची समजणारी जन्म भाषा असते त्या भाषेच्या आधारित आपण जगातील किंवा कोणत्याही कानाकोपऱ्यातील भाषेचे आपण भाषांतर करू शकतो त्यासाठी शैक्षणिक धोरणनुसार किंवा राष्ट्रीय आराखड्यानुसार चे स्वातंत्र्यपूर्व काळापासून किंवा स्वातंत्र्यानंतर किंवा आत्ताच्या विज्ञान युगापर्यंत सुद्धा विचार केला तर प्रथम भाषा ही आपल्याला योग्य अर्थाची समजली तरच आपण जगाशी त्या मिळालेल्या ज्ञानावर आपण वर्चस्व गाजवू शकणार आहे त्यासाठी अवांतर वाचन हेच मूळ कारण आहे आमंत्र वाचनाने विद्यार्थी शिक्षक संशोधक सक्षम व अर्थपूर्ण असा बनतो माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारंपारिक ग्रंथालयांनी आपली ओळख आधुनिक काळात डिजीटल ग्रंथालये अशी निर्माण केलेली असून हा तंत्रज्ञानाच्या वापराबद्दलचा बदल केवळ आणि केवळ ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या सकारात्मक भूमिकेमुळेच शक्य झाला आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सामाजिक संस्थामध्ये ग्रंथालयांचेही स्थान, शिक्षण, आरोग्य, अर्थ या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संस्थाबरोबरच्या समकक्षतेचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग या संस्थांनी जेवढ्या तत्परतेने आपल्या दैनंदिन कार्यामध्ये केला. तेवढ्याच तत्परतेने किंबहुना त्यापेक्षा जास्त वेगाने ग्रंथालये आधुनिकीकरणासाठी सज्ज झाली. मनुष्यबळाचा अभाव, तांत्रिकज्ञानाची कमतरता, अपुरा अर्थ पुरवठा, वरिष्ठांचे असहकार्य, मूलभुत सोयीसुविधांचा अभाव या व यासारख्या अनंत अडचणींवर मात करुन ग्रंथपाल व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी आपली ग्रंथालये आधुनिक करुन बदलत्या काळात वाचकांच्या बदल्यात मागण्यापूर्ण करु शकतील इतकी सक्षम केली आहेत.
माहिती तंत्रज्ञानातील नवनवीन शोध, सोशल मीडिया चा उगम, त्या अंतर्गत निर्माण झालेले विविध शैजजिज् पातळ्यांवरील माहिती उपभोक्त्यांचे गट व त्यांच्या बदललेल्या माहिती विषयक गरजा या यासारख्या अनेक आव्हांनावर काही प्रमाणात ग्रंथालयांनी आपल्या वाचन साहित्यांच्या स्वरुपातील बदल, दैनंदिन कामकाजाचे संगणकीकृत सेवा, तज्ञ व कुशल कर्मचारी नियुक्ती इ. माध्यमातून मात केल्याचे आढळून येते. मात्र तंत्रज्ञानातील वेगवान बदलांवर एवढे जुजबी उपाययोजना पुरेश्या होत नाहीत. यासाठी ग्रंथपाल व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी आपल्या पारंपारिक भूमिकेपेक्षा आधुनिक व्यवस्थापकीय व तंत्रनिपुण दृष्टीकोन स्विकारणे अधिक उपयोगी ठरेल.
अवांतर वाचनासाठी डिजीटल ग्रंथालय निर्मितीची कारणे :-
१) माहितीचा विस्फोट : आधुनिक काळात माहितीचे मूल्य उच्च स्तरावरील ठरले आहे. प्रत्येक देश अशी मौल्यवान माहिती निर्मितीची क्रिया आपआपल्या स्तरावर राबवत आहे. यातून दरदिवशी हजारो पानांच्या संख्येने माहितीची निर्मिती होत आहे. त्या त्या विषयातील मोठ्या संख्येने निर्माण होणारी माहिती मिळवणे तिचे संघटन करणे या डिजीटल स्वरुपात ग्रंथालयानांच शक्य आहे.
तंत्रज्ञानाच्या घटत्या किंमती : डिजीटल ग्रंथालय निर्मितीसाठी आवश्यक असणारे माहिती व तंत्रज्ञान आता
संस्थाच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये सहज समाविष्ठ होऊ शकणाऱ्या किंमतीत उपलब्ध होत आहे. डिजीटल ग्रंथालये आपल्या संग्रहात इलेक्ट्रॉनिक वाचनसाहित्याचा समावेश मोठ्या प्रमाणात करत आहे. ऑनलाईन वाचन साहित्याची सामूहिक खरेदी सारखे पर्याय निर्माण झाले आहेत. या अंतर्गत लाखो नियतकालिके, डेटाबेस अत्यल्प किंमतीमध्ये उपलब्ध झाले आहेत.ग्रथालयातील ई-वाचन साहित्य व्यवस्थापनासाठी विविध आज्ञावली मोफत (Open Source Software) स्वरुपात उपलब्ध आहेत. प्रत्येक ग्रंथालयाने सुसज्ज संगणक प्रयोगशाळा निर्माण केल्या आहेत.
३) पर्यावरणपूरक ग्रंथालये: डिजीटल ग्रंथालये ही पर्यावरण पुरक ग्रंथालये म्हणून उदयास येत आहे. कागदनिर्मितीचा व छपाईचा खर्च म्हणजे पर्यावरणाचा नाश असून डिजीटल ग्रंथालये आधुनिक काळात फायद्याची ठरतात. चोवीस तास अविरत संगणकाव्दारे सेवा देणारी ग्रंथालये अपुरी जागा, अपुरा कर्मचारी वर्ग, निधीची कमतरता या प्रमुख समस्यांवर योग्य उपाय आहेत.
४) नव्या वाचक पिढीची गरज : आधुनिक काळातील वाचक माहिती तंत्रज्ञानात निपुण आहे. तो सोशल मिडीयाच्या वापरातून हजारो सहकाऱ्यांच्या संपर्कात राहतो. विविध कारणाने प्रत्यक्षात ग्रंथालयात येणे त्यास शक्य नसते. मात्र अद्ययावत माहितीची त्यास गरज आहे. ग्रंथालयांकडून त्यास हि माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळावी अशी तो अपेक्षा करतो. यूजर आय.डी. व पासवर्डच्याव्दारे अश्या वाचकयांना ग्रंथालये आपल्या डेटाबेसमधील माहिती वापरण्यास देऊ शकतात.
५) मातृ/पितृ संस्थांची गरज उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रातील संस्थांच्या उद्दीष्ठपूर्तीसाठी कार्यपूरक संशोधन त्याठिकाणी होत असते. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे ग्रंथालय हे एक अभिन्न अंग असते. संस्थेतील माहिती व तंत्रज्ञानाच्या वापराचा परिणाम आपोआपच त्या संस्थेच्या ग्रंथालयावर होत असतो. पर्यायाने या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज अपरीहार्य ठरते. ग्रंथालयांनी मातृसंस्थच्या उद्दीष्ठपूर्तीसाठी पूरक बदल आपल्या सेवा व सुविधांमध्ये करावे लागतात.
डिजीटल ग्रंथालयाचे घटक :
१) वाचनसाहित्य : पारंपारिक ग्रंथालयांमध्ये पुस्तके, नियतकालिके या स्वरुपात वाचनसाहित्य उपलब्ध होते. डिजीटल ग्रंथालयांना या वाचनसाहित्याची खरेदी किंवा निर्मिती करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत बऱ्याच ग्रंथालयांनी इ. वाचन साहित्याची निर्मिती म्हणजे मुद्रीत वाचन साहित्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतर करणे असाच घेतला आहे.
२) व्यवस्थापन -: इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील वाचनसाहित्याचे व्यवस्थापन करणे हे आवश्यक कार्य आहे. वाचकांच्या दृष्टीने शोध घेण्यास सोपे असलेले वाचनसाहित्याचे व्यवस्थापन यशस्वी ठरले आहे.
३) सेवा/सुविधा : ई-साहित्याच्या वापर योग्य होण्यासाठी वाचकांना शोध प्रणाली (Search Strategy) राबवता आली पाहिजे. दूर अंतरावरुनही वाचकांना हवे ते वाचनसाहित्य मिळविण्याची सोय निर्माण करुन दिली पाहिजे. ४) तंत्रज्ञान : तंत्रज्ञान हे डिजीटल ग्रंथालयाचे अभिन्न अंग आहे. नवीन तंत्रज्ञान आत्यावश्यक असेल तरच वापरावयास हवे. संदर्भ सेवेला पर्याय म्हणून काही ग्रंथालयांनी कॉल सेंटर सेवा सुरु केली मात्र त्यास योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असे आढळून आले.
५) कुशल मनुष्यबळ : डिजीटल ग्रंथालयामुळे पारंपारिक ग्रंथालयातील मनुष्यबळ कमी होणार नसूल उलट अधिक तज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज वाढेल. वाचन साहित्याची निवळ, त्याचे व्यवस्थापन, सेवा सुविधा यासाठी अधिक जाणकार व्यक्तीची गरज भासते. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या सूचनेनुसार ग्रंथालय कर्मचाऱ्यांना तांत्रिक शान, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापकीय कौशल्य, संवाद व प्रशिक्षण कौशल्य, विपणन यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आधुनिक काळात ग्रंथालयची बदलती भूमिका :
इंटरनेट युगात सर्व माहिती मोफत असून, ग्रंथालये किंवा ग्रंथपाल यांची भूमिका मर्यादित झाल्याचा चुकीचा समज पसरला आहे. मात्र अमर्याद माहितीच्या उपलब्धतेमध्ये ग्रंथपालांचे कार्य अधिक अत्यावश्यक व उपयोगी आहे, ही वस्तुस्थिती आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये निष्णाम उपभोक्त्यांना माहितीच्या अमर्याद उपलब्धतेमुळे योग्य शोधप्रणाली राबवण्यात वेळेचा अभाव व या प्रक्रियेचे अल्पज्ञान असल्यामुळे शक्य होत नाही. येथे ग्रंथपाल आपले कौशल्य वापरुन माहितीचे उपभोक्त्यांच्या गरजेनुसार पुर्नसंघटन करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विनाविलंब योग्य स्थळ पाठवू शकतो. या बदलेल्या सोडूनू ग्रंथपालास आपली पारंपाकि भूमिका सोडून अनेक नवी कौशल्य आत्मसात करुन विविध भूमिका पार पाडणे आवश्यक झाले आहे.
१) माहिती तंत्रज्ञान तज्ञ नवीन माहितीस्त्रोताचे स्वरुप बदलेले असून त्याची इलेक्ट्रॉनिक स्वरुपामध्ये निर्मिती, प्रसार व वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. उपभोक्त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या या माहिती तंत्रज्ञानात ग्रथालय व्यावसायिकांनी कुशलता प्राप्त करणे आवश्यक आहे. संकेतस्थळांची निर्मिती करणे, त्याअंतर्गत विविध सेवा सुविधांची निर्मिती करणे त्याची उपयुक्तता वाढवणे, संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवणे, ब्लॉगची निर्मिती करणे सोशल मिडीयाचा वापर करुन, विविध उपभोक्त्यांचे गट निर्माण करुन त्यांच्या माहिती विषयज् गरजा पूर्ण करण्याचे काम करणे जास्त गरजेचे आहे.
२) माहिती समिक्षक : इलेक्ट्रॉनिक स्वरुपात निर्माण होणाऱ्या माहितीतील वैविधता पाहता या माहितीचे संपादन करण्यापूर्वी विश्वासाहर्यता तपासणे आवश्यक असते. विश्वासाहर्य माहितीचे संपादन, पुर्नसंघटन करुन गरजेनुसार माहिती उपभोक्त्यांपर्यंत योग्य वेळेत पोहचवण्याची जबाबदारी आधुनिक माहिती व्यवस्थापकांची आहे. बदलत्या माहितीच्या गरजांसाठी माहितीची निवड करुन नवनवीन सेवांची निर्मिती त्यांनी करणे आवश्यक आहे.
३) आशय व्यवस्थापक: ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केलयानंतर आशय व्यवस्थापनाची गरज निर्माज झाली आहे. त्याअंतर्गत संकेतस्थळांची निमिर्ती, अत्याधुनिक तंत्राव्दारे माहितीचे वितरण अत्यावश्यक ठरले आहे. डेटावेअर हाऊसिंग, केटा मायनींग, टॅक्सोनॉमीज् सारखे व्यावसायिक कार्य करणे आता शक्य झाले आहे. तंत्रज्ञानामुळे आशय निर्मिती व त्याचे व्यवस्थापन आवश्यक झाले आहे. त्यास ग्रंथालयांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला आहे. सामुहिक खरेदी (कन्सॉरशिया) सारखे उपक्रम ग्रंथपालाच्या दैनंदिन ज्ार्यामध्ये आशय वितरणाचे कार्य जोडत आहे.
४) संशोधन तज्ञ : संशोधन प्रक्रियेमध्ये ग्रंथालय कर्मचारी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. संशोधन प्रक्रियेची परीपूर्ण माहिती, संशोधनपुरक उपयुक्त माहितीचे ज्ञान या गुणांमुळे मातृसंस्थेच्या संशोधक गटात त्यांची वेगळी ओळख निर्माण होते. माहितीचा शोध, माहितीचे विश्लेषण, माहितीचे पुर्नसंघटन यामुळे संशोधकांना नेमजी व संशोधन पुरक माहिती तात्काळ उपलब्ध होऊन संशोधन प्रक्रिया वेगाने पुढे सरकते.
५) तज्ञ प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त माहिती व ज्ञानस्त्रोत केंद्राचे दैनंदिन कामकाज जबाबदारीचे असते, कामाचे नियोजन, उद्दीष्ठ निर्मिती, ज्र्मचाऱ्याचे व्यवस्थापन, अर्थसंकल्पाचे नियोजन या सर्व बाबींवर ग्रंथपालानी लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. सेवा सुविधांची निर्मिती व त्यांचा दर्जा सुधारणे त्यावर देखरेख करणे, गुणवत्ता व्यवस्थापन, मातृसंस्थेच्या उद्दीष्ठपूर्तीसाठी आखलेल्या योजनांचे मूल्यमापन करणे या व यासारख्या इतर कार्याचा दैनंदिन प्रशासनात अंमलबजावणी करणे आवश्यक ठरले आहे.
समाजाचे योगदान: शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील लहान-मोठी तरुण मंडळ, सामाजिक कार्यकर्ते ,लोकप्रतिनिधी, समाजसुधारक यांनी शाळेसाठी पुस्तके भेट द्यावी. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा वाढदिवस यावर होणारा खर्च पाहता तो कमीत कमी शंभर रुपये व जास्तीत जास्त किंमत सांगता येत नाही अशा प्रकारे आपण वाढदिवसावर अनावश्यक खर्च करतो त्याच पैशातून शाळेसाठी व शाळेतील ग्रंथालयासाठी मुलांना आवाहन वाचनाची गोडी निर्माण होण्यासारखी लहान लहान पुस्तके, बोधकथा, सुविचार संग्रह, निबंधाची पुस्तके, म्हणी ,सुविचार, द्वि भाषिक पुस्तके इत्यादी भेट दिली तर शाळेतील अवांतर वाचन समृद्ध होऊन विद्यार्थ्यांमध्ये आवानंतर वाचनाच्या ओळीतून त्याचे ज्ञान अद्यावत होईल व त्यास वाचनाची गोडी लागून तो एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आदर्श असा नागरिक घडणार आहे.