Tuesday, 31 January 2017

‘वहन आकार’ हा नवीन कर लावून महावितरणची लूट


 महावितरणने डिसेंबर २०१६ पासून आणखी एका आकाराची आकारणी करण्यास सुरुवात केली असून   प्रतियुनिट १ रुपये १८ पैसे असा आकार बिलांमधून छापून त्याची वसुलीही सुरु केली आहे , १ महिन्याच्या वीज बिलात स्थिर आकार , वीज आकार , इंधन समायोजन आकार , वीज शुल्क , वीज विक्री कर असे ५ प्रकारचे वेगवेगळे चार्जेस घेतले जात आहेत त्यात आता वहन आकाराची भर पडली आहे , मूळ वीज वापराच्या ४० टक्के जादा बिल आता ग्राहकांना भरावे लागणार आहे , ग्राहकांनी एकजूट होऊन या अन्यायी वहन आकाराला  तीव्र विरोध करावा , 
वहन आकार म्हणजे वीजकेंद्रापासून ग्राहकांपर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी येणार खर्च , आणि ग्राहक कायद्याने हा वहन कर आकारणे चुकीचे आहे कारण वीज हि काय स्वतः जाऊन पिशवीत घेऊन येण्याची वस्तू नाही , या अगोदरच विज  आकारामध्ये याचा समावेश आहे , 
महावितरणचे अच्छे दिन लोकांना जोर का झटका धीरेसे देणारे आहेत , पण नागरिकही सुज्ञ आहेत ते याबद्दल आवाज उठवणारच 

वडणगेमध्ये घरफाळा वसुलीचा अनोखा फंडा , थकबाकीदारांच्या दारात ढोल ताशांचा गजर


प्रतिनिधी महादेव लोहार

घरफाळा व पानिपट्टी च्या वारंवार  नोटीस पाठवूनही दाद न देणाऱ्या ग्रामस्थांच्या दारात जाऊन , थकबाकीदारांच्या दारात ढोल ताशांचा गजर करण्याचा अनोखा फंडा कोल्हापूर शहरालगतच्या वडणगे गावात सध्या राबवण्यात येत आहे , वडणगे ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी वर्षअखेर जवळ आल्याने चांगलीच कंबर आली असून त्यांची वसुलीसाठी ढोल ताशा पथक निर्माण केले आहे , ग्रामसेवक , शिपाई , सदस्य व ढोल ताशा वाजंत्री थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवून त्वरित थकबाकी भरण्याच्या सूचना देत आहेत , चार चौघात अब्रू जाऊ नये म्हणून नागरिकही याला थकबाकी भरण्याचे आश्वासन देऊन  प्रतिसाद देत आहेत 

Monday, 30 January 2017

कोल्हापूर महापालिकेच्या स्थायीसमिती सभापतिपदाच्या निवडणुकीत डॉ. संदीप नेजदार विजयी

 कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातील अत्यंत चुरशीच्या व नाट्यपूर्ण  निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. संदीप नेजदार तर  भाजपकडून आशिष ढवळे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते काँग्रेस-राष्ट्रवादीतील रिना कांबळे या विरोधी  भाजप-ताराराणी आघाडीच्या गोटामध्ये गेल्या होत्या , निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी , शिवसेना  आठ , तर भाजप-ताराराणी आघाडी सात  असे मतदान झाल्याने  आमदार सतेज पाटील समर्थक व काँग्रेसचे उमेदवार  डॉ. संदीप नेजदार यांचा १ मताने विजय झाला आणि त्यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड झाली , त्यांच्या निवडीमुळे आमदार सतेज पाटील गट आणि काँग्रेस मध्ये जल्लोषाचे वातावरण आहे 

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज कसबा बावडा चक्काजाम आंदोलन यशस्वी


 प्रतिनिधी संदीप पोवार

मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्यासाठी आज  मराठा क्रांती मोर्चाच्या.वतीने सर्वत्र महाराष्ट्रभर  चक्काजाम करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात कसबा बावडा शुगर मिल कॉर्नर येथे चक्क जाम आंदोलन शांततापूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध रित्या यशस्वी करण्यात आले , कसबा बावडा परिसरातील सर्व  बंधूनी यात उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता .  सर्वानी राष्ट्रगीत म्हणून चक्का जाम आंदोलनाची  सांगता झाली 




रेल्वे रुळाला तडा पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक बंद ,सह्याद्री एक्सप्रेस पुण्यातच थांबवली

सकाळी 6.20  मिनिटांनी चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात येताच  मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या  सर्व एक्सप्रेस थांबवण्यात  आहेत. यामुळे मुंबईला जाणाऱ्या  प्रवाशांना सकाळी  त्रास सहन करावा लागत आहे.काल रात्री कोल्हापुरातून सुटलेली  सह्याद्री एक्सप्रेस पुणे स्थानकातून अद्याप सोडण्यात आलेली नाही.रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर  सुरु आहे


आयडिया आणि व्होडाफोन येणार एकत्र , विलीनीकरणावर बोलणी सुरु

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन  - आयडियाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.व्होडाफोन व  आयडिया सेल्युलर मिळून भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनवण्याची तयारी करत आहेत.जर हे विलीनीकरण झाले तर देशातील १.७७ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार क्षेत्रातील बाजारात दोन्ही कंपन्या एकत्र मिळून एअरटेलला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरणार आहे. त्याचबरोबर क्रमांक एकची कंपनी होण्याचा रिलायन्स जिओच्या स्वप्नालाही मोठा झटका बसणार आहे.जिओने मार्च २०१७ पर्यंत मोफत कॉल-डाटा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे दराच्या लढाईमुळे महसुलावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे.कंपन्यांच्या नफ्यातही मोठी  घट होत आहे.असे जर झाले तर बाजारात फक्त चारच मोठ्या कंपनाया उरतील 

व्होडाफोनने हायकोर्टात ‘ट्राय’ विरुद्ध तक्रार , रिलायन्स जिओविरोधात सर्व कंपन्या एकवटल्या

सर्व दूरसंचार कंपन्यांचे दर समान असावेत, असा ट्रायचा नियम आहे. कोणतीही दूरसंचार कंपनी मोफत ऑफर 90 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवू शकत नाही, असं ‘ट्राय’ने 2002 मध्ये स्वतःच म्हटलं होतं, असा दावाही करत  व्होडाफोन इंडियाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली  आहे.रिलायन्स जिओला मोफत सेवा चालू ठेवण्यास परवानगी ची मेहेरबानी का असा सवालही केला आहे याप्रकरणाची पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.  रिलायन्स जिओविरोधात सर्व कंपन्या एकवटल्या असतानाच आता व्होडाफोनने हायकोर्टात धाव घेत ‘ट्राय’विरुद्धही नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार केली आहे 

Sunday, 29 January 2017

सकल मराठा समाजाच्या वतीने दि ३१ ला कोल्हापुरात ५०ठिकाणी चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर शहरातील  शिरोली टोल नाका, शिवाजी पूल,  कसबा बावडा, दसरा चौक, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या प्रमुख ठिकाणांसह १२ तालुक्यातील विविध ठिकाणी अश्या एकूण ५० ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी दि.३१ जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे . अत्यंत शिस्तबद्धरीत्या व शांततेच्या मार्गाने हे  चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनातून परीक्षार्थी विद्यार्थी, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले,  सर्वानी सकाळी १० वाजेपर्यंत  नियोजित ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनहि  सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव भव्य दिव्य करण्याचा मानस


कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापना १९६८ साली झाली असून सध्या मार्च २०१७ ते २०१८ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष भव्य प्रमाण आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा मानस नुकताच पार पडलेल्या संस्थेच्या सभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला , याकरिता सुवर्णमहोत्सव स्मरणिका प्रकशित करणे , कोल्हापुरातील रणजीपटुंचा सत्कार करणे , K D C A चा लघुपट तयार करणे , जेष्ठ खेळाडू सामने भरवणे , क्रिकेट प्रदर्शन , विविध स्पर्धा आयोजन , तज्ज्ञ व राष्ट्रीय क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन घेणे , करमणूक कार्यक्रम , क्रिकेट प्रश्नमंजुषा आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना सभासदांकडून मांडण्यात आल्या त्यावर अंमलबजावणी करण्याचे ठरले , 
यावेळी आमंत्रित तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या सभेस  अध्यक्ष बाळ पाटणकर ,रमेश कदम , केदार गयावल, बाबासो जाधव , सागर पाटील व क्रिकेट तालुका संघटना पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते 



Thursday, 26 January 2017

कसबा बावडा येथील आंबेडकर उद्यानात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा प्रथम वर्धापनदिन आणि स्नेहसंमेलन समारंभ संपन्न


 प्रतिनिधी  संदीप पोवार 

कसबा बावडा येथील आंबेडकर उद्यानात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा प्रथम वर्धापनदिन आणि स्नेहसंमेलन समारंभ दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडला , या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एस पी कुलकर्णी ( जिल्हा व सत्र न्यायाधीश ) हे अध्यक्ष स्थानी होते , यावेळी त्यांनी सरकार मार्फत जेष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा व त्यांचा लाभ कसा घ्यावा याचे विवेचन केले , यानंतर काही जेष्ठ नागरिकांनी आपल्या बऱ्या वाईट अनुभवांचे प्रसंग कथन केले यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले 
या कार्यक्रमात  माधवराव बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला , कार्यक्रमास नगरसेवक डॉ संदीप नेजदार , विलासराव बेडेकर , कृष्णदास पाटील, नानासाहेब पाटील; ऍड आनंदराव पाटील , दिलीप  मेथे  तसेच संघाचे सर्व सभासद व नागरिक उपस्थित होते 


बैलगाडी शर्यतींना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

तामिळनाडूतल्या जलीकट्टूनंतर त्याधर्तीवर निवडणूक आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठन्याची शक्यता निर्माण झाली आहे ,यापूर्वी केंद्र सरकारने जुलै २०११मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतींवरही बंदी आली आहे  मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती.मात्र सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारचा निर्णय रद्द ठरवत  प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल दिला आता तामिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली, तशीच महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना मिळावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर बैलगाडी  संघटनांनि मांडल्यावर त्यांना आश्वासन देताना आपणही या स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्नशील असून, आचारसंहिता असल्याने तूर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू असे म्हणाल्याचे समजते 

Tuesday, 24 January 2017

हेल्मेट सक्तीची आवश्यकता

 वारंवार सरकारकडून होणारी हेल्मेट सक्तीची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे , राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती  नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ मध्ये केली होती महाराष्ट्रात परत हेल्मेट सक्तीचे वारे सुरु झाले होते. नो हेल्मेट नो पेट्रोल सारखा नियम लागू करण्यात येणार होता. मात्र पेट्रोलपंप चालकांच्या संपाच्या भितीमुळे सरकारने हा निर्णय आज मागे घेतला. आणि या प्रश्नाला वेगळी दिशा मिळाली. हेल्मेट परिधान न करता वाहन चालविल्यामुळे आत्तापर्यंत लाखो वाहन चालकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.आपल्या जीवाची काळजी प्रत्येका व्यक्तिला असलीच पाहिजे. त्यामुळे हेल्मेट हे अत्यावश्यक आहे.कारण आपला जीव केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या परिवारासाठी जास्त महत्वाचा आहे. आपल्या जीवाची किंमत कधीही आपल्या पेक्षा ज्यांचे आपल्यावर प्रेम आहे त्यांना जास्त असते. त्यांचे जगणे आपल्यावर अवलंबून असते. मग ते आपले आई वडील असू देत, नवरा बायको, मुलं असू देत नाहीतर इतर कोणी. मात्र यामुळे ज्यांचा जीव आपल्यावर अवलंबून आहे त्यांच्या साठी तरी किमान आपली काळजी घेतली पाहिजे.पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्यात आली असूनदेखील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी हेल्मेट परिधान न करता दुचाकी वाहने चालविताना दिसतात.
     याविषयी साप्ताहिक क्राईम डायरीचे संपादक बाबासो जाधव यांनी आपले असे मत व्यक्त केले आहे कि वाहन चालवताना सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. त्यात कोठेही तडजोड होऊ शकत नाही. दुचाकीवरून जाताना वाहन घसरून पडणे वा अन्य प्रकारचा अपघात झाल्यास डोक्याला मार लागून प्राण गमवावे लागल्याच्या घटना कमी नाहीत. अशा घटनांमध्ये डोक्याला गंभीर मार लागून शस्त्रक्रिया कराव्या लागल्याची, अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत उपचारांचा खर्च मोठा असतो. यावरून हेल्मेटचे महत्त्व लक्षात येते. अशा रीतीने हेल्मेटशिवाय वाहन चालवणे धोक्याचे असल्याने त्याबाबत सक्तीचे धोरण राबवण्याचा प्रकार अन्य देशांमध्येही पहायला मिळतो.

Sunday, 22 January 2017

कॅशलेस - स्वीडन !

कागदी नोटा - ज्याला आपण इंग्रजीत "कॅश' म्हणतो, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तंत्रज्ञानाने बरीच प्रगती करूनही अजूनही आपण अनेक वेळा कॅशचा वापर करतो. बसमध्ये तिकीट काढण्यासाठी अथवा रिक्षावाल्याला द्यायला अजूनही कॅशच लागते. जगातील एक देश मात्र कॅशलेस- रोखमुक्त बनत चालला आहे. दिवसेंदिवस या देशामध्ये अनेक ठिकाणी तुमची इच्छा असेल तरीही कॅश वापरता येत नाही! एवढेच नव्हे, तर अनेक बॅंकांच्या शाखेमध्ये कॅश दिली-घेतली जात नाही. या देशाचे नाव आहे स्वीडन! स्वीडन जगातील पहिला रोखमुक्त देश बनण्याच्या मार्गावर आहे.
स्वीडनमध्ये दर पाच खरेदीपैकी चार खरेदी रोखमुक्त असतात. या खरेदीसाठी पैसे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिले जातात. दुकानामध्ये होणारे 95 टक्के व्यवहार क्रेडिट कार्डाने होतात. 2010 ते 2012 च्या मध्ये स्वीडनमधील 500 बॅंकांच्या शाखा पूर्णपणे रोखमुक्त झाल्या. या शाखांमध्ये कुठल्याही प्रकारची कॅश दिली अथवा घेतली जात नाही. तुम्हाला अकाउंटमध्ये कॅश भरता येत नाही, अथवा कॅश काढताही येत नाही. याच काळात वापर होत नाही म्हणून स्वीडनमध्ये 900 एटीएम मशिन काढून टाकण्यात आल्या. कॅशचा वापर न केल्याने स्वीडीश बॅंकांच्या या शाखांमध्ये बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची गरजच नाही. तसेच या शाखांमध्ये रोख रक्कम ठेवण्यासाठी तिजोरीचीही गरज नाही. 2010 मध्ये स्वीडीश बॅंकांच्या तिजोऱ्यांमध्ये अंदाजे 8.7 अब्ज क्रोनर होते. 2014 मध्ये ही रक्कम 3.6 अब्ज क्रोनरएवढी खाली आली आहे. स्वीडनमधील चर्चमध्येही देणगी देण्यासाठी पेटीऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मशिन ठेवल्या जातात. "कोलेक्टोमॅट' नावाच्या या मशिनमध्ये क्रेडिट कार्ड रीडर असल्याने क्रेडिट कार्डने देणगी देणे सोपे जाते. एका वृत्तानुसार स्वीडनमधील चर्चला मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी 85 टक्के देणग्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळतात!

रोखमुक्तीचे  अनेक फायदे ---

नोटा आणि नाणी छापायला सरकारांना खूप मोठा खर्च येतो. त्या सांभाळण्यासाठीही खूप मोठा खर्च अनेक लोकांना व संस्थांना करावा लागतो. बॅंकांना नोटा ठेवण्यासाठी मोठमोठ्या तिजोऱ्या बनवायला लागतात. त्या नोटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बंदूकधारी रक्षक असणाऱ्या गाड्या लागतात. एवढेच नव्हे, तर त्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या हे तपासण्यासाठी विशेष मशिनही लागतात. सुट्या पैशांच्या आणि फाटलेल्या नोटांच्या प्रश्नाविषयी तर मी काही अधिक सांगायला नकोच. त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यम वापरून पैशाची देवाण-घेवाण करणे खूपच सोपे असते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून पैसे देण्यामुळे कुणी, कुणाला आणि कधी पैसे दिले याची नोंद राहते. त्यामुळे काळ्या व्यवहाराला आळा बसतो. त्यामुळेच जगातील अनेक सरकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे देण्याला प्रोत्साहन देतात.

Friday, 20 January 2017

वाहतुकीला शिस्त कधी लावणार ?

{संदीप पोवार - कोल्हापूर mh9Live Reporter}

नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह पार पडला पण कोल्हापुरात वाहतुकीला व वाहनचालकांना शिस्त लागण्याची चिन्हे काही दिसत नाहीत ,
ट्रिपल सीट दूचाकी ,
अवैध फेन्सी नंबर प्लेट ,
सिग्नल तोडणे ,
झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे ,
वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे ,
शाळकरी मुलांनी वाहन चालवणे
असे किती तरी नियम रोज पायदळी तुडवले जातात , ट्राफिक पोलिस नेमके काय करतात यावर न बोललेच बरं ,
शहरातील सिग्नल व मोक्याची ठिकाणे सोडली तर ट्राफिक पोलिस ईतरत्र कोठेही दिसत नाहीत , त्यामुळेच की काय अगदी कोर्ट व पोलीस मुख्यालयासमोरुन जाणार्या रस्त्यावर देखील वाहनचालक नियम मोडतात , पोलीस वाहतुकीला शिस्त कधी लावणार असा सवाल नागरिकातुन विचारला जात आहे

Thursday, 19 January 2017

खुषखबर रेल्वेच्या कन्फर्म तिकीट बुकिंगसाठी नविन बदल

आतापर्यंत दूर पल्ल्याच्या रेल्वेंचं रिझर्व्हेशन अंतरावर ठरवलं जायचं. जसे की, बेंगलोर ते जोधपूर ही एक्स्प्रेस मधल्या प्रवासात ही रेल्वे दावणगेरे , हुबळी , मिरज आणि पुणे रेल्वे स्टेशनवर थांबते. अशावेळी बेंगलोर व दावणगेरे चा सीटचा कोटा ३०० व हुबळी , पुणे १०० तर मिरज ५० असा असायचा आणि मिरजेसारख्या मधल्या स्टेशन्सवर वेटिंग तिकीट पुल्ड कोट्यात जारी केला जायचे.
मिरज ते अजमेर जाणार्या मधल्या प्रवाशांची गोची व्हायची , आता रेल्वेने १९६८ च्या आरक्षण नियमात सुधारणा करत सर्वत्र एकच जनरल कोटा ठेवण्याचे जाहीर केले असुन त्या मुळे मधल्या स्टेशनवरुन प्रवास करणार्यांना कन्फर्म तिकीट आरामात मिळु शकेल कारण सर्व कोटा एकत्र करुन ५०० च्या वर जागा उपलब्ध होतील ,
पहिल्या स्टेशनवरुन सुटलेल्या रेल्वेसाठी मधल्या एखाद्या स्टेशनवरुन तिकीट बुकिंग करणं मोठं जिकिरीचं काम असायचे मात्र आता ही अंतर व कोटा मर्यादा हटवल्याने, प्रवाशांना जनरल वेटिंग देण्यात येईल, त्यामुळे वेटिंग तिकीट सहजासहजी कन्फर्म होईल.

Wednesday, 18 January 2017

वर्तमानपत्रे झालीत सैराट , कशाची बातमी करावी याचे हरवले भान

वाचकवर्गाला भुरळ घालणार्या थिल्लर बातम्या छापुन टी आर पी वाढवण्याच्या नादात आपण काय छापतोय याचे भानही संपादकांना नसावे याचा खेद वाटतो , नुकतेच एका वर्तमानपत्रात

"आर्ची सैराटमध्ये
ज्या फांदीवर बसली होती ती तुटली "

या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आहे ,
या फांदीच्या तुटण्याने सैराट चित्रपटाचे व आर्चीचे चाहते चांगलेच हळहळत असुन जणू काही महाराष्ट्राचा  फार मोठा ठेवा नष्ट झाल्याचा सुर या बातमीत आहे ,
आणि सरकारने याची तातडीने दखल घेऊन काही उपाय योजना करावी अन्यथा वठलेले झाडही नामशेष होईल असा आशय आहे ,
एकीकडे शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधताना मोठ्या हिकमतीने मिळवलेले संपुर्ण महाराष्ट्रभर असणारे गड व कोट यांचे संवर्धन , जतन याविषयी बातम्या छापण्यासाठी तुमच्याकडे जागा नसते , ज्या गड किल्ल्यांपासुन भावी पिढीला खरी प्रेरणा मिळेल अशांच्या बातम्या लावण्यात तुम्हाला काही स्वारस्य नसते
  सध्या वर्तमानपत्रांपुढे अशा सवंग प्रसिद्धी मिळवणार्या बातम्या छापण्यापेक्षा , जनतेच्या असुविधा , तक्रारी , भ्रष्टाचार , गुन्हेगारी , बेरोजगारी या समस्या सोडवण्याचे कितीतरी मोठे आव्हान असताना ज्याला शेंडा नाही अन बुडकाही नाही अशा चटपटीत बातम्या छापणे म्हणजे वाचकांशी केलेली प्रतारणाच होय !

Sunday, 15 January 2017

मानसिक ताण तणावामुळे हृदयरोगाचा धोका

मानवी शरीरातील यंत्रणेचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला असून मानसिक ताण तणावाचा सर्वाधिक प्रभाव हृदयावर पडत असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. त्यामुळे मेंदूवरील अतिरिक्त ताण आणि पर्यायाने हृदयरोगाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने संशोधकांनी केलेले हे संशोधन महत्त्वाचे आहे. धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे हृदयरोगाचा धोका मोठय़ा प्रमाणावर वाढतो, हे सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अतिरिक्त तणाव हा देखील हृदयरोगाला मदत करतो आहे.
मेंदूवर पडणाऱ्या तणावामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो यासंबंधी कोणत्याही प्रकारचे संशोधन यापूर्वी झालेले नाही. या संशोधनात  रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या मेंदूवर पडणारा तणाव आणि हृदयाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वर्षांनंतर त्यांची पुन्हा तपासणी केली असता रुग्णांना हृदयविकाराचा धोका वाढल्याचे आणि रक्तवाहिन्यांचे रोग बळावल्याचे स्पष्ट झाले. तसेच, यातील रुग्णांना अतिरिक्त तणावामुळे हृदयरोग बळावल्याचे स्पष्ट झाले. बौद्धिक कार्य आणि ताण तणाव यामुळेच रक्तवाहिन्यांवर सूज येणे आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद होणे हे धोके संभवतात.

Saturday, 14 January 2017

रिलायन्स जिओ ब्रॉडबँड वाजवणार बीएसएनएलचा बँड

रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेत नवं पाऊल ठेवलं आहे. जिओकडून ‘फायबर टू दी होम’ (FTTH) या सेवेची चाचणी सुरु करत 1Gbps या स्पीडने डेटा देण्याची दमदार घोषणा करण्यात आली आहे ,

त्यातुलनेत प्रतिस्पर्धी बीएसएनएलने  २४९ रु प्रति माह ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा केलेला  केविलवाणा प्रयत्न कामचुकार कर्मचारी वर्गामुळे असफल होत आहे , कनेक्शन देताना टाळाटाळ केली जात आहे , तसेच या योजनेचा स्पीड फक्त 1Mbps इतकाच आहे ,

या सर्व त्रुटींमुळे ग्राहक  लाँचिंग ऑफरनुसार तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा मिळणार्या  रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेकडे नक्कीच आकर्षित होतील आणि बीएसएनएल आपले उरलेसुरले ग्राहकही गमावणार यात शंका नाही

गृहमंत्रालयाकडुन जवानांच्या सोशल मिडीया वापरावर बंदी ?

काही जवानांनी सोशल मिडीयावर आपल्या तक्रारी मांडुन न्याय मागण्याचा प्रयत्न केल्यावर त्याची चौकशी करण्याऐवजी त्याची मुस्कटदाबी करण्यासाठी जवानांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर गृहमंत्रालयाकडून बंदी घालण्यात येत असल्याचे समजते ,
या आदेशानुसार कोणत्याही जवानाला फेसबूक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम वापरता येणार नाही.

सोमवारी एका जवानाने बीएसएफचे अधिकारी कसे भ्रष्ट आहेत व ते जवानांना खराब दर्जाचे अन्न कसे देतात, याचा भांडाफोड करणारा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर सीआरपीएफच्या जवानानेही तक्रारीचा पाढा वाचणारा व्हिडीओ पोस्ट केला. यानंतर देशभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला व यावर चर्चा झाली.

Friday, 13 January 2017

कागलमध्ये घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प होऊ शकतो तर कोल्हापूरात का नाही ?


रोज तयार होणारा कचर्याची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत असतात.
रोजच सफाईकामगार व नागरिकांच्यात वाद होतात , यावर मात करत कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे.
२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. १०० टक्के अनुदान तत्वावर साडेतीन कोटी रुपये मंजूर झालेल्या या प्रकल्पातुन रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती होत आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते.
तर याविरुद्ध जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या कोल्हापूरात मात्र कचर्याची परिस्थिति चांगली नाही , येथे कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी झुम नावाचा प्रकल्प आणला गेला पण अधिकारी व पदाधिकारी यांच्या खाबूगिरीने याचे तीनतेरा वाजले , दररोज साधारण २०० टन कचरा कोल्हापूर शहरातुन तयार होतो , झुम प्रकल्पावर कचर्याचे ढीगच ढीग लागले असुन प्रकल्प केव्हाच बंद पडला आहे , या प्रकल्पातील कचर्याला अनेकवेळा आगही लागली आहे  ,  कचरा टाकण्यासाठी रिकाम्या जागा मिळेणात ,  आता कोल्हापूरलाही कागलचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे पण याला जोड पाहिजे अधिकारी व पदाधिकारी यांच्या इच्छाशक्तिची !

Wednesday, 11 January 2017

अॅमेझॉनला आली मस्ती , वेबसाईटवर भारतीय तिरंग्याच्या पायपुसण्यांची विक्री

अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाइटवर भारतीय तिरंग्याच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री होत असल्याने तेथील भारतीयांनी त्याला विरोध केला आहे. भारतीयांनी अॅमेझॉनविरोधात याचिकाही दाखल केली आहे.

गेल्यावर्षी अॅमेझॉनने भारतीय देवी- देवतांची चित्र छापून काही वस्तूंची विक्री केली होती.

अॅमेझॉनने तात्काळ या उत्पादनांची विक्री बंद करावी आणि बिनशर्त माफी मागावी ,  अन्यथा अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. तसेच याअगोदर देण्यात आलेले व्हिसाही रद्द करण्यात येतील, अशी सक्त ताकीद सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला दिली आहे.

सर्व देशाभिमानी भारतीयांनी देशाच्या तिरंग्याचा जाणुन बूजून अवमान करणार्या अशा अॅमेझॉनला चांगलाच धडा शिकवण्यासाठी कृपया कोणीही त्याच्या वेबसाइट वरुन खरेदी करु नये

Tuesday, 3 January 2017

*कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनमार्फत पत्रकार दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन*

*कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनमार्फत पत्रकार दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन*

[ कोल्हापूर mh9Live न्यूज प्रतिनिधि - संदीप पोवार ]

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेलफेअर असोसिएशन च्या वतीने
शुक्रवार ( ता. ६ जानेवारी २०१७ ) पत्रकार दिनानिमीत्त सिध्दगिरी, कणेरी मठ येथे जिल्ह्यातील पञकारांसाठी सहकुटुंब विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सिध्दगिरी मठाचे मठाधिपती प. पू. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी पञकारांच्या कुटुंबियांसाठी मठावरील विविध उपक्रम मोफत करून दिले आहेत. मठाधिपती प. पू. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर जिल्हा पोलिसप्रमुख प्रदिप देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी पञकार परीषदेत दिली.
श्री. निर्मळे म्हणाले, सकाळी अकरा ते दुपारी बारा यावेळेत नोंदणी, त्यानंतर श्री सरस्वती व बाळशास्ञी जांभेकर यांचे प्रतिमा पूजन, प्रमुख सत्कार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे मार्गदर्शन, त्यानंतर स्नेहभोजन व मठावरील विविध उपक्रमांची पाहणी पत्रकार व परीवारासाठी मोफत असेल.यामध्ये सिध्दगिरी म्युझीयम, ग्रामजिवन, आरसे महल, भूत बंगला, गोशाला, सेंद्रिय शेती व प्रेरणा थीम पार्क यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व पञकारांनी सहकुटुंब उपस्थित रहावे , तसेच या कार्यक्रमासाठी आपली नोंदणी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेशी संपर्क साधुन नियोजित करावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

[ प्रतिनिधि - संदीप पोवार कोल्हापूर]

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेलफेअर असोसिएशन च्या वतीने
शुक्रवार ( ता. ६ जानेवारी २०१७ ) पत्रकार दिनानिमीत्त सिध्दगिरी, कणेरी मठ येथे जिल्ह्यातील पञकारांसाठी सहकुटुंब विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सिध्दगिरी मठाचे मठाधिपती प. पू. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी पञकारांच्या कुटुंबियांसाठी मठावरील विविध उपक्रम मोफत करून दिले आहेत. मठाधिपती प. पू. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर जिल्हा पोलिसप्रमुख प्रदिप देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी पञकार परीषदेत दिली.
श्री. निर्मळे म्हणाले, सकाळी अकरा ते दुपारी बारा यावेळेत नोंदणी, त्यानंतर श्री सरस्वती व बाळशास्ञी जांभेकर यांचे प्रतिमा पूजन, प्रमुख सत्कार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे मार्गदर्शन, त्यानंतर स्नेहभोजन व मठावरील विविध उपक्रमांची पाहणी पत्रकार व परीवारासाठी मोफत असेल.यामध्ये सिध्दगिरी म्युझीयम, ग्रामजिवन, आरसे महल, भूत बंगला, गोशाला, सेंद्रिय शेती व प्रेरणा थीम पार्क यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व पञकारांनी सहकुटुंब उपस्थित रहावे , तसेच या कार्यक्रमासाठी आपली नोंदणी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेशी संपर्क साधुन नियोजित करावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, 2 January 2017

कचर्याची तक्रार करा ऑनलाइन , स्वच्छता MOUD app च्या सहाय्याने

भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपिंग ने नागरिकांसाठी  swachhata -MOUD हे app आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केले आहे , याद्वारे आपल्या भागातील कचर्याच्या समस्येची तक्रार आपण ऑनलाइन करु शकता , कोल्हापूर शहरातील अस्वच्छ रस्ते , तुंबलेल्या गटारी , भरुन वाहणारे कोंडाळे , कामचुकार , उद्धट सफाई कामगार इत्यादि सर्व तक्रारी आता आपण या app द्वारे ऑनलाइन नोंदवु शकणार आहात , तसेच नोंद तक्रारीची दखल घेतली की नाही हे सुद्धा समजणार आहे

The Swachhata-MoUD is the official app of Ministry of Urban Development (MoUD),

चला तर स्वच्छ कोल्हापूरसाठी हे app डाउनलोड करुन आपणही हातभार लावुया