प्रतिनिधी महादेव लोहार
घरफाळा व पानिपट्टी च्या वारंवार नोटीस पाठवूनही दाद न देणाऱ्या ग्रामस्थांच्या दारात जाऊन , थकबाकीदारांच्या दारात ढोल ताशांचा गजर करण्याचा अनोखा फंडा कोल्हापूर शहरालगतच्या वडणगे गावात सध्या राबवण्यात येत आहे , वडणगे ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी वर्षअखेर जवळ आल्याने चांगलीच कंबर आली असून त्यांची वसुलीसाठी ढोल ताशा पथक निर्माण केले आहे , ग्रामसेवक , शिपाई , सदस्य व ढोल ताशा वाजंत्री थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवून त्वरित थकबाकी भरण्याच्या सूचना देत आहेत , चार चौघात अब्रू जाऊ नये म्हणून नागरिकही याला थकबाकी भरण्याचे आश्वासन देऊन प्रतिसाद देत आहेत