प्रतिनिधी संदीप पोवार
कसबा बावडा येथील आंबेडकर उद्यानात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा प्रथम वर्धापनदिन आणि स्नेहसंमेलन समारंभ दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडला , या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एस पी कुलकर्णी ( जिल्हा व सत्र न्यायाधीश ) हे अध्यक्ष स्थानी होते , यावेळी त्यांनी सरकार मार्फत जेष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा व त्यांचा लाभ कसा घ्यावा याचे विवेचन केले , यानंतर काही जेष्ठ नागरिकांनी आपल्या बऱ्या वाईट अनुभवांचे प्रसंग कथन केले यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले
या कार्यक्रमात माधवराव बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला , कार्यक्रमास नगरसेवक डॉ संदीप नेजदार , विलासराव बेडेकर , कृष्णदास पाटील, नानासाहेब पाटील; ऍड आनंदराव पाटील , दिलीप मेथे तसेच संघाचे सर्व सभासद व नागरिक उपस्थित होते