Monday, 30 April 2018

महाराष्ट्र दिन...माहिती विशेष


आज १ मे.. अर्थात महाराष्ट्र दिन...

शिवाय हा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काही राज्यकर्त्यांचा विरोध होता.

स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी तत्कालीन राज्यकर्ते पाऊलं उचलत नसल्यानं संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. दार कमिशनकडून भाषावर प्रांतरचनेस विरोध दर्शवण्यात आला. इतकंच नाहीतर विदर्भासह महाराष्ट्र, सौराष्ट्रासह गुजरात आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर करण्यात आली. त्यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव असल्याचं लक्षात येताच मराठी जनता पेटून उठली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी नव्या चळवळीवनं पेट घेतला.

संयुक्त महाराष्ट्रावरील कवने गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. कवनांच्या जोडीला अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशीर, माझी मुंबई, शेटजींचे इलेक्शन असे कितीतरी तमाशे गाजत होते...

संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली, एका धगधगत्या चळवळीचे फलित म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव , कारवार, निपाणी , बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हवे असलेले 'मुंबई ' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र 'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, एस.एम, जोशी यासारख्या व्यक्तींनी या चळवळीचं नेतृत्व केलं. ही चळवळ दडपण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. यांत १०५ जणांना हौतात्म्य प्राप्त झालं. पुढं चळवळ अधिक तीव्र झाल्यानं एक पाऊल मागं जात तत्कालीन सरकार मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी राजी झालं. त्या १०५ हुतात्म्याच्या बलिदानामुळं आज आपण  महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. हुतात्म्यांना वंदन करत महाराष्ट्र दिन चिरायू होवो याच साऱ्यांना शुभेच्छा.

संकलन - ज्ञानराज पाटील, कोल्हापूूर 

Sunday, 29 April 2018

औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विराट मोर्चा 

प्रतिनिधी दि. २९/४/१८


फोटो 

औरंगाबाद येथील सभेत बोलतांना  शिक्षक नेते संभाजी थोरात, शेजारी मोहन भोसले, राज्य कोषाध्यक्ष जनार्दन नेऊगरे, जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील सह इतर मान्यवर.

   शिक्षक व शिक्षक पती पत्नी एकाच मुख्यालयामध्ये  नोकरीस असणे आवश्यक आहे. तरच आनंददायी अध्ययन अध्यापन घडते. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या बदली धोरणामुळे शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडली आहे. चुकीच्या बदली धोरणामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याचे विपरीत परीणाम शरीरावर होत आहेत. शिक्षकांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शंभर वर्षापासून सोडविल्या जात आहेत व यापुढे ही सर्व प्रश्न व समस्या सोडविल्या जातील असे प्रतिपादन शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी केले. ते औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विराट मोर्चा काढला त्या प्रसंगी ते बोलत होते.


   प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्ती करावी यासह राज्यस्तरीय विविध मागण्यासाठी  २९ एप्रिल रोजी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांनी मोठया संख्येनी या मोर्चात सहभाग घेतला.

       २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये राज्य शासनाने जे बदली धोरण जाहीर केले आहे. त्या बदली धोरणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने या धोरणात बदल करावा यासह विविध मागण्याचे लेखी निवेदन राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय तहसिलदार श्रीराम बेंडे यांना शिष्टमंडळा समवेत दिले.

     शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यभरतील प्राथमिक शिक्षक सहभागी झाले, मोर्चा क्रांती चौकातून निघाला.मोर्चातील प्रमुख मागण्या बदली धोरणात बदल करून शिक्षकांच्या बदल्या सेवाजेष्टतेनुसार तालुका अंतर्गतच करण्यात याव्यात,प्रशासकीय बदल्याची टक्केवारी असावी, बदल्याची खो पद्धती बंद करण्यात यावी, एकदा बदली झाल्यावर पुन्हा ५ वर्षे बदली करण्यात येवू नये ,विनंती बदल्या मागणी नुसार कराव्यात या दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत. तसेच दि.२३/१०/२०१७ च अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून १२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात यावी,

१ नोवेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकासह सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासन निर्णयाप्रमाणे ३० सप्टेंबर च्या पट संख्येनुसार शिक्षक पदनिर्धारण करावे. सातवी पर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक व सामाजिक शास्त्र विषयाचे पदवीधर शिक्षक पद मान्य करावे, सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची श्रेणी देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या १०० टक्के विध्यार्थ्यांना मोफत गणवेश  देण्यात यावा, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ देवून सुरु केलेली वसुली थांबवण्यात यावी, पट संखेअभावी राज्यातील बंद केलेल्या प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात, अंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया जलद राबवून त्वरित कार्यवाही पूर्ण करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मोर्चात करण्यात आली .

     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचीटनिस अप्पासाहेब कुल, महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनुराधा तकटे, कोषाध्यक्ष जनार्दन नेऊंगरकरे , शिक्षक नेते मोहन भोसले आदी मोर्चाचे नेतृत्व केले. 

   कोल्हापूर जिल्हयातून जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, स्वाभिमानी शिक्षक संघ अध्यक्ष सुधाकर निर्मळे, जयवंत पाटील, शिवाजी ठोंबरे, रघुनाथ खोत, सरचिटणीस सुनील पाटील,  सुरेश कांबळे,मधुकर येसणे ,बाळासाहेब निंबाळकर ,प्रकाश खोत, सुनील एडके ,प्रकाश सोहनी ,अशोक चव्हाण, इंद्रजीत कदम, हेमंत भालेकर , तानाजी जत्राटे ,अशोक पाटील , विक्रम पोतदार ,प्रसिद्धी प्रमुख किरण शिंदे , विजय भोसले, पी.के. कांबळे, प्रकाश मगदूम, किरण पाटील, उत्तम कोळी, शशिकांत पाटील, रावसाहेब मोहीते, प्रकाश सोनी, शिवाजी रोडे पाटील,आदी पदाधिकारीसह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

    

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर जिल्हा यांची सभा संपन्न


कोल्हापूर प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर जिल्हा यांचे चर्चासत्र शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी पार पडले , शिक्षकांच्या विविध समस्येवर चर्चा करून समस्या सोडवण्याबाबत शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा .श्री अरुण मुजुमदार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेनेच्या करवीर तालुका अध्यक्ष पदी श्री सुधीर अमणगी सर यांची निवड करण्यात आली , 

इंचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी श्री संदीप रजपुत सर व इंचलकरंजी शहर सरचिटणीस पदी श्री जगदीश पुजारी सर यांची निवड करण्यात आली , 


या चर्चासत्राला जिल्हा उपाध्यक्ष श्री गजानन जाधव सर , जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश लोहार सर, कोल्हापूर शहर अध्यक्ष श्री संदीप भाट सर , कोल्हापुर शहर उपाध्यक्ष श्री शरद वरुटे सर ,इंचलकरंजी शहर अध्यक्ष श्री गजानन लवटे सर , जिल्हा कमिटी सदस्य श्री एस एल पाटील सर , जिल्हा कमिटी सदस्य श्री कांबळे सर ,  पदाधिकारी , शिक्षक सेना सदस्य या ठिकाणी उपस्थित होते यांच्या सहमताने हि निवड करण्यात आली .

Tuesday, 24 April 2018

राज्य प्राथमिक शिक्षक संघ औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार 


कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. २४/४/१८

        मिलींद बारवडे

   प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्ती करावी यासह राज्यस्तरीय विविध मागण्यासाठी दि २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांनी मोठया संख्येनी या मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहन शिक्षक नेते मोहन भोसले यांनी केले आहे. अशी माहिती शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

       महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा दि. १७ रोजी शरद अध्यापक विद्यालय पुणे येथे घेण्यात आली होती. या महामंडळ सभेत दि. २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये राज्य शासनाने जे बदली धोरण जाहीर केले आहे. त्या बदली धोरणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने या धोरणात बदल करावा या सह विविध मागण्यासाठी  परळीच्या तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण निवडणूक आयोगाच्या दि. २० च्या पत्रान्वये उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेची निवडणूक जाहीर केल्याने बीड जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्यामुळे परळी ऐवजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

     शिक्षक संघाचे नेते मा. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यभरतील प्राथमिक शिक्षक सहभागी होणार असून मोर्चा क्रांती चौकातून निघणार आहे. 

मोर्चातील प्रमुख मागण्या बदली धोरणात बदल करून शिक्षकांच्या बदल्या सेवाजेष्टतेनुसार तालुका अंतर्गतच करण्यात याव्यात. प्रशासकीय बदल्याची टक्केवारी असावी, बदल्याची खो पद्धती बंद करण्यात यावी, एकदा बदली झाल्यावर पुन्हा ५ वर्षे बदली करण्यात येवू नये ,विनंती बदल्या मागणी नुसार कराव्यात या दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत. 

 तसेच दि.२३/१०/२०१७ च अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून १२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात यावी. 

१ नोवेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकासह सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासन निर्णयाप्रमाणे ३० सप्टेंबर च्या पट संख्येनुसार शिक्षक पदनिर्धारण करावे. सातवी पर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक व सामाजिक शास्त्र विषयाचे पदवीधर शिक्षक पद मान्य करावे, सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची श्रेणी देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या १०० टक्के विध्यार्थ्यांना मोफत गणवेश  देण्यात यावा, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ देवून सुरु केलेली वसुली थांबवण्यात यावी, पट संखेअभावी राज्यातील बंद केलेल्या प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात, अंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया जलद राबवून त्वारिक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मोर्चात करण्यात येणार आहे.

    तरी या राज्यस्तरीय मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमीक शिक्षकांनी हजारोच्या संख्येंने सहभागी व्हावे . महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचीटनिस अप्पासाहेब कुल, महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनुराधा तकटे,  नेतृत्व --- कोषाध्यक्ष जनार्दन नेऊंगरकरे कार्यकारी अध्यक्ष एन वाय पाटील , शिक्षक नेते मोहन भोसले आदी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व उपनेते रघुनाथ खोत जिल्हा मार्गदर्शक जीवन मिठारी दिनकर पाटील आनंदराव जाधव,दयानंद पाटील, सुरेश कांबळे,सुहास शिंत्रे मधुकर येसणे ,बाळासाहेब निंबाळकर ,प्रकाश खोत, सुनील एडके ,प्रकाश सोहनी . अशोक चव्हाण, अशोक लंबे ,अशोक वसगडे, इंद्रजीत कदम, हेमंत भालेकर ,संभाजी पाटील, तानाजी जत्राटे ,अशोक पाटील ,जयसिंग पाटील, प्रकाश येडगे ,विक्रम पोतदार.जिल्हाअध्यक्ष रविकुमार पाटील सरचिटणीस सुनील पाटील, कार्याध्यक्ष दुंडेश खामकर,  बाळकृष्ण हळदकर,कोषाध्यक्ष अरुण चाळके,प्रसिद्धी प्रमुख किरण शिंदे आदी पदाधिकारी करणार आहेत.

Monday, 23 April 2018

सिद्धनेर्ली  ता कागल येथे उज्वला गॅस योजना कार्यक्रम संपन्न

सिद्धनेर्ली (वार्ताहर)आजही ग्रामीण भागात महिलांना चुलीवर जेवण बनवावे लागते त्यामुळे चुलीच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत यावर एक उपाय म्हणजे गॅस वर जेवण बनवणे होय त्याच बरोबर लागणारा वेळेची बचतही होते ,प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस वापरला जावा यासाठी शासनाच्या  अनेक योजना देखील असून त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर पर्यन्त देखील करत आहे असे प्रतिपादन एलपीजी गॅस  कंपनीचे सिनियर मॅनेजर राजीव नरुला यांनी केले ते सिद्धनेर्ली  ता कागल येथे उज्वला गॅस योजनेच्या कार्यक्रमा

च्या निमित्ताने बोलत होते.  

     पुढे बोलताना राजीव नरुला म्हणाले गॅस जेवणासाठी वापरल्या मुळे जेवण करताना वेळेची बचत होऊन जेवण स्वच्छ बनवता येते त्याच बरोबर गॅस वापरताना काळजीही तितकीच घेतली पाहिजे असेही ते बोलताना पुढे म्हणाले.

        या वेळी कार्यक्रमाचे स्वागत सरपंच सौ नीता युवराज पाटील यांनी केले तर प्रास्ताविक  उज्वला पोवार यांनी केले .यावेळी या कार्यक्रमासाठी माजी सरपंच पुष्पलता मगदूम,बळीराम मगदूम, सोपान घराळ ,युवराज पाटील,बाबासो कांबळे ,सौ श्वेता कांबळे तसेच गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित  होता  .


फोटो -उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन वाटप करताना राजीव नरुला ,सोबत नीता पाटील,  बळीराम मगदूम, सचिन पाटील आदी

Saturday, 21 April 2018

फौंडेशन मार्फत महिला व किशोरीका यांच्या आरोग्यविषयी कार्यशाळा संपन्न


    प्रतिनिधी (पन्हाळा):पिंपळे तर्फ सातवे(बांबरवाडी) येथे आज वुई केअर सोशल फौंडेशन ,कोल्हापुर यांच्या वतीने महिला व किशोर वयीन मुलीं यांच्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.स्त्रियांच्या समस्येवर बहुतेक करुण गांभीर्याने पाहिले जात नाही.तर त्यांच्या समस्येना कमी लेखल जात.व त्यातून फार गंभीर अशा अडचणी उद्भवतात.म्हणून फौंडेशन ने असा निर्धार केला की,ग्रामीण भागात असे कार्यशाळा आयोजित करावे.त्याची सुरवात आज या कार्यक्रमातून झालेली आहे. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच मा तानाजी पाटील होते,मार्गदर्शक म्हणून समुपदेशक अमृता जोशी-सालोँखे होत्या.त्या म्हणाल्या की, "ग्रामीण भागात स्त्रियांच्या समस्या खूप जाणवतात तेथील महिलांसाठी 2 ते 3 महिन्यातून असे प्रबोधनाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.'कार्यक्रमाचे प्रस्ताविक फौंडेशनचे अध्यक्ष मा सुदर्शन पांढरे यांनी केले.ते म्हणाले कि, "शोधाची जननी ही स्त्री आहे व तिने आपला इतिहास अभ्यासला पाहिजे,तेव्हा कुठे तिला योग्य वागणूक समाजाकडून मिळू शकते. सूत्रसंचालन अनिकेत पाटील यांनी केले.यावेळी विरसेन सालोंखे,उपसरपंच सौं पूनम शिपुगड़े फौंडेशनचे रूपेश कांबळे,सलमान मुजावर,मनिषा धमोणे,वर्षा माने आदि उपस्थित होते.

Wednesday, 18 April 2018

सेनापती कापशीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात  लक्षवेधी पारंपरिक वाद्य  ढोल ताशासह मिरवणूक 


फोटो - सेनापती कापशी (ता - कागल) येथे ऐतिहासिक स्वामी चौकातील शिवजन्मोत्सव मिरवणुक.

सेनापती कापशी / वार्ताहर - अवधूत आठवले 

       

            सेनापती कापशी (ता - कागल) येथे ऐतिहासिक स्वामी चौक येथे गावातील राजा शिवछत्रपती ग्रुप, सेनापती कापशीकर, श्री शिवप्रतिष्ठान, नवयुग मंडळ व गावातील सर्व तरुण मंडळे व शिवप्रेमी एकत्र येऊन पारंपरिक वाद्य ढोल ताशासह मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला .गावात सगळीकडे या तरुण मंडळांनी भगवे झेंडे, पताका लावल्या होत्या सगळीकडे जय भवानी जय शिवाजी,शिवाजी महाराज की जय अशा जयघोषाने कापशी नगरी दुमदुमुन वातावरण शिवमय झाले होते.

          सकाळी 8 वा  भुदरगडाहून शिवज्योत आणण्यात आली. यानंतर 9 वा श्री मूर्ती अभिषेक करण्यात आला. ठीक 12 वा शिवजन्मकाळ सोहळा महिलांनी पाळणा म्हणत साजरा केला.  सायंकाळी 7 वा  ऐतिहासिक स्वामी चौकातून मिरवणुकीला सुरवात झाली येथून शिवाजी चौकातून संताजी चौक येथे मिरवणूक आणण्यात आली व तेथे ढोल व ताशांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली कापशी व कापशी  परिसरातील शिवप्रेमींनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी पावसाला अचानक सुरवात झाली तरीही शिवप्रेमींचा उत्साह या मिरवणुकीत पाहण्यासारखा होता.

           दरम्यान, शिवजयंती निमित्त बुधवार दि 18 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी 7 वा राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा डॉ गजानन वाव्हळ पुणे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.




Tuesday, 17 April 2018

शिक्षक बदली पोर्टल वर माहिती भरताना अडचणी

कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. १७/४/१८

    मिलींद बारवडे


  सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग १, २ व ३ मधील शिक्षकांची बदली संदर्भातील माहिती भरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच संवर्ग ४ मधील शिक्षकांची माहिती भरण्याचे पोर्टल सुरू होणार आहे .परंतु विषय शिक्षकांना सदरची माहिती भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याामुळे शिक्षकांच्यामधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .


     कारण महाराष्ट्रात अनेक जिल्हय़ात विशेषत: कोल्हापूर जिल्हयात इ. ६  ते ८ या वर्गांना शिकविणेकरिता विषयावर अशी विशेष शिक्षकांच्या  कोणत्याही प्रकारे नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत .किंबहुना आपली नेमणूक कोणत्या विषया करता आहे हे कोणत्याच शिक्षकाला माहिती नाही .अशा परिस्थितीत सध्या जास्तीत जास्त जुने पदवीधर शिक्षक इंग्रजी विषयाचे तर नवीन विषय शिक्षक हे इतर विषय शिकवताना दिसून येतात. बदली पोर्टलमध्ये माहिती भरताना आपण शिकवत असलेल्या विषयानुसार माहिती भरायची की ,आपल्या पदवीच्या विषयानुसार माहिती भरायची याबाबत शिक्षकांच्यामध्ये प्रचंड संभ्रमावस्था असून ठोस माहितीच्या अभावी त्यांना प्रचंड मनस्तापास सामोरे जावे लागत आहे .असे असूनही या संदर्भात तालुका व जिल्हास्तरावरील कोणतेही सक्षम अधिकारी याबाबत स्पष्ट माहिती देताना दिसून येत नाहीत .जर याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही तर शिक्षकांच्या हातून चुकीची माहिती भरली जाऊन चुकीच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पदवीधर विषय शिक्षकांच्यावर बदली प्रक्रियेमध्ये प्रचंड अन्याय होण्याची  शक्यता आहे .


        कारण अवघड क्षेत्रातील शिक्षक सर्वसाधारण क्षेत्रात येण्यास समन्वय समितीचा विरोध नसून विरोध हा खो-खो च्या खेळखंडोबाला आहे .कोल्हापूर जिल्ह्यात ३४  शिक्षकांनी  दुर्गम भागातून सुगम भागात येण्यासाठी विनंती केली आहे .मात्र एकंदरीत ५  हजारांवर शिक्षकांच्या  विनाकारण बदल्या होण्याची शक्यता आहे .३४ मधील ९० टक्के शिक्षकांची सेवा दुर्गममध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालेली नाही .यापूर्वीही सदर शिक्षक सुगम मध्ये सोयीत कार्यरत होते .त्यातील बहुतांशी शिक्षक शाळेतील पटसंख्या न टिकवल्यामुळे अतिरिक्त म्हणून तिकडे गेले आहेत.उलटपक्षी सध्या बदली पात्र असलेले बहुतांशी शिक्षक यापूर्वी शेकडो किलोमीटर अनेक वर्षे सेवा त्या काळातील दुर्गम भागात केलेली आहे . म्हणून दुर्गम  भागातील शिक्षकांना सोयीसाठी प्राधान्य देऊन समुपदेशाने जिल्हास्तरावर बदली धोरण राबवण्याची समन्वय समितीची मागणी होत आहे . जिल्हांतर्गत बदलीमध्ये खो-खो ची पद्धत रद्द करून कार्यरत शाळा व तालुक्याची ज्येष्ठता धरून प्रशासकीय बदल्या कराव्यात .नवीन शिक्षक भरती केल्यास समानीकरण करावे लागणार नाही. जिल्हांतर्गत बदल्या या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षेत ऑनलाईन ऐवजी समुपदेशन पद्धतीने केल्यास सर्वांचे समाधान होईल असे समन्वय समितीचे म्हणणे आहे .


          असे न केल्यास शिक्षकांचे आंदोलन होऊन शैक्षणिक वातावरण ढवळून निघेल .त्याचबरोबर घटनेचे कलम २४३ चे अवमूल्यन व १२/९ च्या  शुद्धी पत्रकावर उच्च  न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होईल. तसेच  न्यायालयाचा अवमान केला आणि    जी.आर .नुसार  बदल्या  केल्या नाहीत म्हणून  अनियमिततेबद्दल असंख्य याचिका कोर्टामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता समन्वय समितीने व्यक्त केली आहे . यासंबंधीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले , अध्यक्ष रविकुमार पाटील , मार्गदर्शक राजाराम वरुटे , प्रसाद पाटील, सरचिटणिस सुरेश कोळी आदींनी ग्रामविकासचे सचिव असिम गुप्ता यांना  दिले आहे . अशी माहिती प्रसिध्दीस पत्रकाद्वारे रविकुमार पाटील यांनी दिली आहे.

दापोली राज्यस्तरीय कृतिसत्रास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - विजयसिंह गायकवाड


फोटो

    महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ सभेत बोलताना विजयसिंह गायकवाड,डी.एस.पाटील, आदिनाथ थोरात,व्ही.जी.पोवार,अरुण थोरात.



शिरोली/ प्रतिनिधी दि. १७/४/ १८

    अवधूत मुसळे


 राज्यस्तरीय कृतिसत्रास मोठ्या संख्येने उपस्थित रहा-विजयसिंह गायकवाड यांचे आवाहन शैक्षणिक क्षेत्रातील समस्या वाढतच आहेत. त्या सोडवण्यासाठी राज्यातील मुख्याध्यापकांनी एकजुट दाखवून दापोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृतिसत्रास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा नँशनल स्कूल, दापोली जि.रत्नागिरी येथे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

       मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य स्तरीय कृतिसत्र दिनांक ४ व ५ मे रोजी दापोली येथील कृषि विद्यापीठाच्या शिंदे सभागृहात संपन्न होणार आहे. या कृतिसत्रात विविध शैक्षणिक समस्या बाबत विचार मंथन होणार आहे. या कार्यक्रमास मा.ना.रामदास (भाई) कदम पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.ना.रवींद्र वायकर साहेब गृहनिर्माण, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री व जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

    तरी राज्यातील सर्व कौन्सिल सदस्यांनी सदर कृतिसत्रास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी राज्य पदाधिकारी मा.आदिनाथ थोरात, अरूण थोरात, संदिपान मस्तूद, व्ही.जी.पोवार, शिवाजीराव किलकिले, डी.एस.पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, संदेश राऊत, संभाजी पाटील, डी.एस.घुगरे सर, आर.वाय.पाटील, मोझर सर, दत्ता पाटील, कुंभार सर, मंगेश जोशी, प्रसाद गायकवाड, सुंभे सर, डॉ. ए.एम.पाटील, रतन पाटील, मातोंडकर सर, शिंदे सर कुसगावकर सर व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

       

मेळघाट मधील दुर्घटनाग्रस्त आदिवासी भागाला उडान फौंडेशनने दिला मदतीचा हात


शिरोली/ प्रतिनिधी दि. १७/४/१८

अवधूत मुसळे

फोटो

उडान फौंडेशनच्या महिला कार्यकर्त्यासह अॅड उल्का पाटील

मेळघाट मधील दुर्घटनाग्रस्त आदिवासी भागाला उडान फौंडेशनने दिला मदतीचा हात.उडान ने केलेल्या मदतीच्या आवाहनाला कोल्हापूर वासीयांचा भरघोस प्रतिसाद.

   अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील सेमाडोह गावातील ढाणा या आदिवासी भागातील सुमारे ४० झोपड्या आग लागल्यामुळे बेचीराख झाल्या. आग लागली त्यावेळी अनेक आदिवासी बांधव शेताच्या कामावर गेले होते. काही आदिवासी इंधन वेचण्यासाठी व काही मोह फुलांना गोळा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे या आगीत खुप मोठे नुकसान झाले.

                     ही घटना समजताच उडान फौंडेशन कडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कोल्हापूर वासीयांना मदतीचे आवाहन केले होते. तुमच्या घरी वापरात नसलेले लहानांपासून ते वृद्धापर्यंतचे कपडे, साड्या, अंथरून- पांघरून, स्वयंपाक घरातील जेवणासाठी वापरली जाणारी भांडी, घागर तसेच तांदूळ, गहू असे धान्य, चपला, स्टेशनरी असे साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. फक्त दोन दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. कमी कालावधी असताना सुद्धा एक टेम्पो भरून साहित्य जमा झाले.

                     हे साहित्य जमा करण्यासाठी टेक केयर फौंडेशन आणि सावली फौंडेशन 'यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले. शनिवारी हे साहित्य पुण्यातील समाजबंध या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आले. तिथून हे साहित्य मेळघाट मधील दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पोहोचवले जाणार आहे. 

                     कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय उडान फौंडेशनने अल्पावधीत केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी उडान फौंडेशनचे अध्यक्ष भुषण लाड, हरेश वाधवानी सौ. मनाली वीरकर, आराध्या सावंत, प्राजक्ता चव्हाण, सौ. सारीका सुर्यवंशी, सौ. रेखा उगवे, अॅड. उल्का पाटील, नम्रता मालानी, अमृता मालानी, सौ. संजोगीता सातपुते, माधवी टिके उपस्थित होत्या.

        

विशाळगड अतिक्रमणे काढा नाही तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा


हेरले / प्रतिनिधी दि. १६/४/१८

सलीम खतीब


किल्ले विशाळगड तालुका शाहूवाडी येतील बेकायदेशीर बांधकामे तात्काळ काढणेबाबत  व परप्रांतीय  रहिवाशांचे स्थानिक रहिवाशांना वारंवार होत असलेल्या मारहाणीबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा असे लेखी निवेदन मुख्य वनसंरक्षक अधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. अन्यथा मनसे स्टाईलने रविवार दि. २२ एप्रिल रोजी अतिक्रमण काढण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार राहील अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव यांनी पत्रकार परिषेद्वारे दिली.


           निवेदनाचा आशय असा की छत्रपती शिवरायांना जीवदान देणारा व वीर  बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन जिंकलेला शाहुवाडी तालुक्यातील एकमेव असा इतिहासाचा साक्षीदार असणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर किल्ले विशाळगड अतिक्रमणाच्या व बेकायदेशीर कृत्यांच्या विळख्यात आहे .सध्या विशाळगडावर दारूबंदी असताना राजरोसपणे दारू ,गांजा ,चरस ,गुटखा इत्यादींची विक्री होत आहे .कायद्याचे उल्लंघन करून कुठल्याही ऑफिसची परवानगी न घेता आर सी सी तीन ते चार मजली बेकायदेशीर घरे बांधली जात आहेत. परप्रांतीय लोकांची बोगस रेशनकार्ड तयार केली जात आहेत. यासाठी आर्थिकतेच्या मोठ्या वाटाघाटी केल्या जातात. याबाबत वारंवार सूचना देऊन सुध्दा पुरातत्व खात्याचे  विशाळगड कडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी वनविभागाच्या जमिनीत येथील स्थानिक व परप्रांतीय लोकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे पर्यटना कडून भाडे वसुल केली जात आहे .तसेच विशाळगड एस टी स्टँड येथे स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करून भाडे वसुली चालू केली आहे.

             छत्रपती शिवाजी महाराजांचा गड असताना त्यांच्या परप्रांतीय लोकांकडून छत्रपती शिवरायांच्या पोस्टरवर डांबर फेकले जात.भगवे ध्वज लावून विशाळगडावर येणाऱ्या लोकांना मारहाण केली जाते. ऐतिहासिक वस्तू जाणीवपूर्वक नष्ट केल्या जात आहेत. वाघजाई देवीची मूर्ती वारंवार उखडून फेकून दिली जाते .गडाच्या पायथ्याला वनखात्याच्या जागेवर परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे .परप्रांतीय लोक स्थानिक  रहिवाशांना व येणाऱ्या पर्यटकांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत .असंख्य मारहाण झालेल्या लोकांनी भीतीपोटी तक्रारी शाहुवाडी पोलिसांना दिलेल्या नाहीत .सध्या विशाळगड परिसरातील लोकांचे वातावरण तणावपूर्ण  बनले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे असे झाले नाही. तर मोठी घटना घडून किल्ले विशाळगडावर पर्यटक येण्याचे बंद होतील व ऐतिहासिक साक्षीदार किल्ले विशाळगड काळाच्या ओघात नष्ट होण्यास वेळ लागणार नाही .

          तरी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे काढावीत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवार दिनांक 22 एप्रिल 2018 रोजी मनसे स्टाईलने अतिक्रमण काढण्यात येईल व होणार्‍या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल . निवेदनाच्या माहिती प्रती तहसिलदार शाहूवाडी, पंचायत समिती शाहूवाडी, पोलीस ठाणे शाहूवाडी, ग्रामपंचायत गजापूर विशाळगड आदींना पाठविल्या आहेत.

     कृष्णात दिंडे शाहुवाडी तालुका अध्यक्ष , फरजाना मुल्ला कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा ,आनंद विंगकर तालुका उपाध्यक्ष कृष्णात पाटील तालुका उपाध्यक्ष,संदीप कांबळे तालुका उपाध्यक्ष ,सतीश तेली बांबवडे शहर अध्यक्ष ,विजय परीट शहर उपाध्यक्ष बांबवडे, महादेव मुल्ला माजी शहराध्यक्ष बांबवडे ,सतीश तांदळे माजी तालुका उपाध्यक्ष मिराज नायकवडी ,सुनील सुतार, विभागीय अध्यक्ष ,मंगेश घोडके ,विजय निकम, दिनकर जाधव ,विजय माळी, विकास महाडिक आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.

Monday, 16 April 2018

तरच खरे स्वराज्य !


आज शिवजयंती त्या निमित्ताने हे दोन शब्द ! 

कोल्हापूर - ज्ञानराज पाटील. 

शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केलीच पाहिजे यात दुमत नाही पण वर्गणी काढून आणि डॉल्बीवर नाचण्यापेक्षा घराघरांत आणि मनामनात शिवजयंती साजरी झाली पाहिजे. 

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर असताना कोणतेही कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही,त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो.

अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून,आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती,भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही.

 जिजाऊ मा साहेबांच्या, छ. शिवरायांच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

Saturday, 14 April 2018

भारतीय जनरल व असंघटीत कामगार संघटना हातकणंगले तालूका अध्यक्षपदी रुपाली कुंभार यांची निवड


हेरले / प्रतिनिधी  दि. १५/४/१८


   भारतीय जनरल व असंघटीत कामगार संघटनेच्या हातकणंगले तालूका अध्यक्षपदी रुपाली सचिन कुंभार चोकाक यांची  निवड करण्यात आली.

      संघटनेचा उद्देश असंघटीत कामगार, बांधकाम कामगार, व घरेलू कामगार या सर्व कामगारांच्या न्याय हक्क आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्य असून ९० टक्के समाजकारण दृष्टीकोन ठेवून सर्व कामगार वर्गांना संघटीत करण्यासाठी क्रियाशील राहणार असल्याचे मत रूपाली कुंभार यांनी निवड झाले नंतर व्यक्त केले.

    संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडुन व सभासदां कडुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवर संघटनेचे अध्यक्ष अभिजीत ढवण,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशदादा सरनाईक ,  पोलीस पाटील सचिन कुंभार तसेच संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रसेनजीत बनसोडे आदी मान्यवरासह कामगार वर्ग मोठया संख्येंनी उपस्थित होता.

श्री जय हनुमान सह .दुध व्याव.संस्थेच्या चेअरमनपदी  बाळासो  चौगुले तर व्हा . चेअरमनपदी डॉ.सागर थोरवत यांची बिनविरोध निवड 

हेरले / प्रतिनिधी  दि. १५/४/१८


            मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील श्री जय हनुमान सह .दुध व्याव.संस्थेच्या चेअरमनपदी  बाळासो  चौगुले तर व्हा . चेअरमनपदी डॉ.सागर थोरवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते चेअरमन महादेव शिंदे होते.

    या प्रसंगी संस्थापक माजी चेअरमन बाळासो थोरवत ,  सतिश चौगुले,  सुभाष मुसळे ,  जयवंत चौगुले ,  सुनिल सुतार ,शकील हजारी , शिवाजी रजपूत निवास शेंडगे , नेताजी कांबरे , सुरेश कांबरे तसेच संस्थेचे सचिव आण्णासोपाटील , विलास घुगरे  लक्ष्मण चौगुले यांचे सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

हेरले परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी 

फोटो

मौजे वडगांव -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच किरण चौगुले ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे, अवधूत मुसळे, अविनाश पाटील व इतर मान्यवर.

हेरले / प्रतिनिधी दि. १५/४/१८

  हेरले परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

     सकाळी माणगांव येथून भिम अनुयायांनी ज्योत आणली व कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्योत प्रज्वलीत केली. विविध व्याख्यात्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्यावर व्याख्यांने संपन्न झाली.सायंकाळी 'जय भिमच्या ' जयघोषात शांततेने मिरवणूका संपन्न झाल्या.

    हेरले ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पाहार अर्पण सरपंच अश्विनी चौगुले व उपसरपंच विजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राहूल शेटे, सतिश काशिद,रणजित इनामदार, मज्जीद लोखंडे, शरद आलमान, बटुवेल कदम, फरीद नायकवडी, अर्पणा भोसले, अशा उलस्वार, विजया घेव्हारे, शोभा खोत, स्वरूपा पाटील,मिनाताई कोळेकर, निलोफर खतीब, रिजवाना पेंढारी, आरती कुरणे आदी उपस्थित होते.

    मौजे वडगांव ग्रामपंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पाहार अर्पण सरपंच काशिनाथ कांबळे व उपसरपंच किरण चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे, अविनाश पाटील, सुभाष अकिवाटे, अश्विनी लोंढे, वैशाली गोरड, सरताज बारगीर, सरिता यादव, माधुरी सावंत, सुनिता मगदूम, मायावती तराळ, तंटामुक्ती अध्यक्ष राजू थोरवत, मुबारक बारगीर, प्रकाश कांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

       मौजे मुडशिंगी येथील बौद्ध समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन केले होते. ध्वजारोहण उज्वला चौगुले यांच्या हस्ते झाले. प्रतिमापूजन उपसरपंच गजानन जाथव यांच्या हस्ते तर ज्योत पूजन सरपंच मिनाक्षी खरशिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नामदेव अणुसे, दादासो इंगवले, रविराज मंडले,मिनाक्षी वरिंगे, स्नेहल गुरव, नंदा पाटील, मुमताज शेख, व समस्त बौध्द समाज उपस्थित होता.

         मौजे माले येथील बौध्द समाजाच्या वतीने जयंतीचे आयोजन केले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन गटनेते माजी उपसरपंच बंटी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती राजेश पाटील, उपसरपंच सुनिल कांबळे, पोलीस पाटील संदीप साजणकर, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गावडे, अर्चना पाटील, सुनिता कांबळे, अनिता माने आदीसह बौध्द बांधव उपस्थित होते.

        चोकाक येथील बौद्ध समाजाच्या वतीने जयंती साजरी केली. ध्वजारोहण व्याख्याते अनिल मम्हाणे यांच्या हस्ते झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन माजी सभापती अविनाश बनगे यांच्या हस्ते  झाले. यावेळी उपसरपंच विकास चव्हाण, ग्रांमपंचायत सदस्य विकास कुंभार, कृष्णात पाटील, सुकुमार पाटील, महावीर पाटील, स्मिता सरदार, उज्वला जाधव, दत्ता हलसवडे, योगेश चोकाककर आदीसह बौद्ध बांधव उपस्थित होते.

     

दहावी पुनर्र्चित अभ्यासक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न


प्रतिनिधी सतिश लोहार   **


दहावी पाठयपुस्तक नवीन अभ्यासक्रम , नवीन झालेले बदल , नवीन पुस्तकाची माहिती यासाठी ताराराणी विदयापीठ डी एड कॉलेज,  कोल्हापूूर या ठिकाणी सर्व विषयांची प्रशिक्षण सुरू आहेत , यामध्ये गणित विषयाच्या प्रशिक्षणात उल्लेखणीय बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मा . श्री किरण लोहार साहेब यांनी प्रशिक्षणास भेट देऊन शिक्षकांना गणित विषयाचे मनोरंजक पध्दतीने शिक्षकांच्यात  मिसळून विविध विषयात चर्चा घडवून आणून सध्याची परिस्थिती , गणिताचे विदयार्थ्याना ज्ञान केंद्रीत अध्यापन, यावर मोलाचे मार्गदर्शन   शिक्षणअधिकारी मा . श्री किरण लोहार साहेबांनी केले . गणित विषय राज्य अभ्यास गटाचे सदस्य , लेखक मा. श्री आण्णाप्पा परीट सर यांनी प्रशिक्षणास भेट देऊन नवीन अभ्यासक्रम बदल , नवीन घटकाचे अध्यापन करत असताना अध्यापनात कृतीचा वापर करून त्याचे पूर्वज्ञान जागृत करणे ,  विदयार्थ्यांना गणिताची आवड रुची , कशी निर्माण करता येईल, विविध मुद्दे घेऊन त्यावर मार्गदर्शन केले . 


गणित विषयातील तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा .श्री.व्ही.के.पोतदार सर, मा श्री पी.एस.शिंदे सर, मा . श्री व्ही.व्ही.पाटील सर . तज्ञ वर्गसमन्वयक _ मा .श्री एम .आर. पाटील सर यांचे प्रशिक्षणास मार्गदर्शन लाभले ,DIECPD चे आदिव्याख्याते : सौ.विद्या कदम, श्री.लोंढे सर, प्रशिक्षणास उपस्थित होते , या  प्रशिक्षणास मार्गदर्शन लाभाणाऱ्या तज्ञांचे सर्व   शिक्षकांच्या वतीने मा . श्री अरविंद मगदूम सर यांनी आभार मानले .

कळे येथे कुंभार समाज मंडपाची लोकवर्गणीतून नव्याने उभारणी

 .

 प्रतिनिधी -  ज्योती वास्कर कळे ,ता.पन्हाळा जि. कोल्हापूर 

     कळे येथील कुंभार समाजाच्या लोकांनी लोकवर्गणीतून मंडप बांधण्यास सुरुवात केली आहे. 

  मागील तीन वर्षापूर्वी म्हणजे 25 जून 2015 रोजी ऐन पावसाळ्यात सकाळी कळे येथील कुंभार वाड्यात एकच धांन्दल  उडाली सकाळी 9 च्या सुमारास मंडपाची भिंतीला भेगा पडून मंडप कोसळला सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण आजुबाजुच्या लोकांचे नुकसान झाले ,काहींना इजा पण झाल्या होत्या. 


     आता तीन वर्षांनी सर्व कुंभार समाजातील लोकांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करून मंडपाचे बांधकाम सुरू केले आहे. हे काम सुरू असतांनाच आज संत गोरोबा पुण्यतिथी निमित्ताने कुंभार समाजातील लोकांनी फोटो पूजन करून दिड ते दोन हजार लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. व लोकवर्गणीतून सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.


Friday, 13 April 2018

हेरले परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण - - ग्रामस्थ हैराण आंदोलनाच्या पवित्र्यात.


शिरोली/ प्रतिनिधी दि. १३/४/१८

       अवधूत मुसळे


 हेरले परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची गेली सात वर्षापासून अक्षरक्ष: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी स्थिती झाली असून शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या गांधारीच्या भूमिकेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. नागरिकांना  या रस्त्यावरूनच सातत्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याने शाररिक व्याधींसह वाहनांच्या मोडतोड मुळे आर्थिक बुर्दंडचा सामना करावा लागत आहे.

        मौजे वडगांव ते हेरले दीड किमी अंतर आहे. हा रस्ता आठ वर्षापूर्वी पक्क्या स्वरूपाचा केला होता. काही महिन्यानंतर पावसाच्या माऱ्यामुळे व दोन्ही बाजूच्या शेतवडीतील रस्त्यावरून पाणी वाहत व साठून राहिल्याने रस्त्याची चाळण होऊन खडडेमय बनला. तदनंतर आठ वर्षापर्यंत अशा चाळण व खड्डेमय रस्त्यातून नागरिकांनी प्रवास केला. त्यापैकी मागील वर्षी पाऊण किमीचा रस्ता केला. तर उर्वरीत पाऊण किमी रस्त्यात खड्डे इतके आहेत, साधे  चालताही येत नाही,प्रवास करतांना तर मोटरसायकल व वाहन चालकांना अक्षरक्ष: सर्कस करावी लागते. लोकांना या रस्त्यावरून सातत्याने प्रवास करावाच लागल्याने पाठीचे, मानेचे आजारास सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पाणी साठून राहिल्याने रात्रीच्या वेळी अनेक सायकल व दुचाकी स्वारांचे अपघात होऊन जखमी व जायबंद झालेले आहेत.


        मौजे वडगांव ते नागांव हा डांबरी रस्ता सात  वर्षापूर्वी केला होता. मात्र रस्त्याच्या खालचा भाग काळी मातीचा असल्याने पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे खचला गेला. रस्त्याचा मधला भाग तसाच राहून दोन्ही बाजू एक ते दीड फूटापर्यंत खचला गेला आहे. त्यामुळे याही रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले असून दुचाकी चारचाकी गाडी चालवताच येत नाही. हा रस्ता एमआयडीसी औदयोगिक वसाहतीस जोडला आहे. हेरलेसह परिसरातील रूकडी, चोकाक, अतिग्रे, माले, मुडशिंगी, मौजे वडगांव, नागांव, आदी गावातील लोक कारखान्यात कामास जात असल्याने दैनदिंन या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र रस्त्याची दुरावस्था झालेने प्रवास करणे कठीण बनले आहे. शाररिक तंदरुस्तीच्या समस्यासह वाहनाचीही मोडतोड होत आहे.

       मौजे वडगांव ते तासगांव ,पेठवडगांव डांबरी रस्ता पाच ते सहा वर्षापूर्वी केला होता. मात्र या रस्त्यात पडलेल्या खडडयांचा ज्या त्या वेळी पॅच वर्क न केल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. हा मार्ग पेठवडगांवास जाण्याचा सोयीचा मार्ग आहे. शिरोली मार्गे या ठिकाणी जायचे झाल्यास दीडपट प्रवास करावा लागतो. म्हणून या रस्त्यावरून अनेकजण सातत्याने प्रवास करतात. मेडीकल कॉलेज, विविध ज्ञान विभागाच्या शाळा, महाविद्यालये, मोठी बाजारपेठ, जनावरांचा बाजार, न्यायालय, हॉटेल्स, दवाखाने, डी.एड, बीएड कॉलेज, आदीमध्ये नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांची, विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी यांची वर्दळ सातत्याने असते. मात्र रस्ताची चाळण झाल्याने प्रवास करणे महाकठीण बनले आहे. याही रस्त्यावर अनेक अपघात होऊन प्रवाश्यांना शाररिक व्याधींना सामोरे जावे लागले आहे. 

      हेरले परिसरातील रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जि.प. अध्यक्ष, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य काही वेळेला कार्यक्रमानिमित्त या गावांना भेटी देतात. मात्र या रस्त्याची दुरावस्था पाहून या परिसरातील लोकांना प्रवास करतांना  किती त्रास होत असतो. याची कल्पना येत नसेल का? हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ रस्त्यास शासनाकडून निधी मंजूर होऊन रस्ता केला जावा अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

       फोटो - हेरले परिसरातील मौजे वडगाव ते हेरले ,  नागांव व पेठवडगांव रस्त्यांची दुरावस्था.

Thursday, 12 April 2018

विद्यार्थांनी लहानपणापासून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे - माधुरी लाड (नगरसेविका)


*

कसबा बावडा: प्रतिनिधी 

प्राथमिक  शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या विविध स्पर्धेत  यश मिळवलेबद्दल  गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीचे आयोजन कसबा बावडा परिसरात पालकांच्या वतीने करण्यात आले. सदर गुणगौरव व कौतुक रॅलीचे उदघाटन नगरसेविका माधुरी लाड यांच्या हस्ते व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी साहेब,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,वैशाली करपे,रमेश सुतार,भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले, स्वप्नील चौगले,राहुल भोसले,कृष्णा चौगले,राजेंद्र चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 


सदर प्रसंगी  KTS परीक्षा ,MSTS परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा,भारती विद्यापीठ, पुणे, इंग्रजी,गणित परीक्षा,हिंदी राष्ट्र सभा पुणे, व इतर स्पर्धेतील जिल्हा,शहर, गुणवत्तयादीत विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांना ओपन जीप मध्ये उभे करून संपूर्ण कसबा बावडा परिसरात कोल्हापुरी फेटे बांधून  मिरवणुकीद्वारे फिरवण्यात आले.नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेतील गुणवतेबद्दल शिक्षक व पालक यांना आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिल्याबद्दल कौतुक करून शाळेने आपला गुणवत्तेचा आलेख असाच उंचावत ठेवावा असे आवाहन करून गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाब देऊन कौतुक केले. शाळांनी फक्त विद्यार्थी न घडवता या देशाचा सक्षम असा नागरिक घडवावा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.


 भारतवीर मित्र मंडळाचे चेतन चौगले,राजू चौगले,राहूल भोसले,कृष्णात चौगले व इतर कार्यकर्त्यानी ही विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून अभिनंदन केले.

सदर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जान्हवी ताटे, वेदांतीका पाटील,जान्हवी कोरवी,सानिया देवकुळे,तनिष्का पाटील,ऋतुराज कोरवी,मयुरी कांबळे,निषिका शिंदे,श्रुतीका चौगले,दिशा कांबळे,प्रणव घेवदे,आदी मुलांचा समावेश होता. 


त्यापूर्वी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांचे हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला .सदर कार्यक्रमाचे व रॅलीचे प्रास्ताविक मुख्याद्यापक अजितकुमार पाटील, नियोजन उत्तम कुंभार व सुशील जाधव यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,प्रभावळे मॅडम यांनी रॅलीच्या आयोजनात परिश्रम घेतले.कार्यक्रमचे आभार जे,बी,सपाटे मॅडम यांनी मानले

Wednesday, 11 April 2018

जापनीज भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी  करिअर करावे: जपान वाणिज्य दूतावास सदस्य श्री. युकिओ उचिदा यांचे प्रतिपादन



पेठ वडगांव

विद्यार्थी वर्गाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व भाषा अवगत कराव्यात, त्यांनी भाषेच्या माध्यमातून जगभर पोहचावे, इंग्रजी व जापनीज यासारख्या भाषेतून विविध क्षेत्रात करिअर करावे असे प्रतिपादन जपानचे वाणिज्य दूतावास सदस्य श्री युकिओ उचिदा यांनी डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅॅशनल स्कूलमध्ये ‘‘जापनीज भाषेचे महत्व व करिअर’’ या विषयावर बोलताना केले. मंगळवार दि. 10.04.2018 रोजी ‘जापनीज भाषेचे महत्व व करिअर’ या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

पुढे त्यांनी विद्या्यार्थ्यां  जपान संस्कृती, जपानची भौगोलिक स्थिती, जापनीज भाषेचे महत्व, त्यातून करिअर कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी दशेतच विद्या्यार्थ्यांना भाषेची आवड कशा प्रकारे निर्माण करावी यांची सविस्तर माहिती दिली. डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅॅशनल  स्कूलमध्ये गेली चार वर्षे जापनीज भाषेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. जापनीज भाषा ही सोपी व सहज असून अवगत झाल्यास व्यक्तीमत्व विकास घडविण्यास या भाषेचे महत्व आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पूनावाला स्कूलमध्ये जापनीज भाषेचे  प्रशिक्षण दिले जाते हे पाहून त्यंानी विद्याथ्र्याच्या जापनीज भाषेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील षिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ‘जपान देश व त्याची प्रगती जगाच्या नकााशवर  कोरलेले नाव, त्याचबरोबर भारत व जपान सहसंबंध यांची विषेष माहिती सांगून जापनीज भाषा अवगत करून स्वतःचे करिअर करावे असे त्यांनी प्रतिपादन व्यक्त केले.


अध्यक्षीय भाषणात बोलतांना श्री. गुलाबराव पोळ म्हणाले की, आम्ही विद्या्यार्थ्यां  आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रयत्नषील असून जापनीज सारख्या भाषेतून ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय जगताातील ओळख निर्माण करून देत आहोत. इंग्रजी बरोबरच जापनीज सारख्या भाषेतून विद्याथ्र्याना प्रबोधीत केले जाते असे सांगून सर्व विद्या्यार्थ्यां  ही भाषा अवगत करावी व स्वतःचा विकास साधावा असे मत त्यांनी व्यक्त केले व जापनीज भाषा अवगत केलेल्या विद्याथ्र्याचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पुजनाने झाली तदनंतर जापनिज भाषेची माहिती सांगणा-या भित्तीपत्रिकेचे मान्यवरंाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. युकिओ उचिदा यांचा सत्कार सन्माननीय श्री.गुलाबराव पोळ यांच्या हस्ते करण्यात आला तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये कु. पार्थ तिवारी, कु. अंगज शर्मा, कु. सृष्टी फरांदे, कु. स्पृहा पाटील, कु. भैरव चैथमल या विद्याथ्र्यानी भाषणे सादर केलीत. तदनंतर भारतीय संस्कृृतीचे दर्शन  घडविणारे आकर्षक नृत्य सादर करण्यात आलीत तसेच जपानबद्लची माहीती, जापनीज नृत्य, सिद्धार्थ ते बुद्ध ही नाटीका व विविध देशांचे  समिश्र डान्स सादर करून विविधतेतून एकता हा संदेश देण्यात आला. त्यानंतर जपान या देषावर आधारीत चित्रफित दाखविण्यात आली. यामध्ये जपान या देषाला ‘उगवत्या सुर्याचा देश’ म्हणून का संबोधले जाते तसेच जपानी संस्कृती, परंपरा, उत्सव, पोषाख, आहार, खेळ यासह जपानने केलेली प्रगती यातून दाखविण्यात आली. यामध्ये विद्याथ्र्यानी भारत-जपान संस्कृती, शिक्षण क्षेत्रातील जपान, राजकिय, सामाजिक,  खेळ, तंत्रज्ञान या संबधीत प्रश्न  विचारले. विद्याथ्र्यानी विचारलेल्या विविध प्रश्नांचे  /शंकाचे निरसन मान्यवरांनी केले. 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जापनिज भाषेचे शिक्षक श्री. कृष्णाजी केसकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मारूती कांबळे व आभार प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांनी मानले. भारताच्या व जपानच्या राष्ट्रगीत ने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ, स्कूलचे संचालक डाॅ. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर, जापनीज भाषेचे मार्गदर्शक  श्री कृष्णाजी केसकर, एक्स एल जे. ई.ई चे संचालक श्री.शैलेश नामदेव, ए.एफ.पी.आय. चे संचालक श्री.घनशाम सिंघ, ए.एफ.पी.आय. चे संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षक पालक संघाचे सदस्य, विद्यार्थी व पालक उल्लेखनिय संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 10 April 2018

निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची स्वाभिमानी संघटनेची मागणी  




      कोल्हापूर / प्रतिनिधी दि. १०/४/१८
        मिलींद बारवडे 

कोल्हापूर जिल्ह्यातील चोवीस वर्ष सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या व निवड श्रेणीस पात्र असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे निवड श्रेणी प्रशिक्षण शिक्षण विभागाने यासाली तात्काळ आयोजित करावे अशी  मागणी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने  संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी लेखी निवेदन प्रभारी उपशिक्षणाधिकारी भिमराव टोणपे यांना देऊन केली आहे.

     कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांचे चोविस वर्ष पूर्ण झालेल्या व पदवीत्तर अहर्ता प्राप्त करणाऱ्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून  ज्यांचे चोविस वर्ष पूर्ण झाले त्यांचे  दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. ते प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या  शिक्षकांना ज्या त्या शाळांचे संस्थाचालक संस्था पातळीवर त्या शिक्षकांना चोविस वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केला असून निवड श्रेणीस पात्र म्हणून ठराव दिला जातो. शाळेच्या पातळीवर प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवून मान्यता घेतली जाते. त्यांना मुख्याध्यापक स्केल सुरू होतो.

        
   मात्र शिक्षण विभागाकडून गेली दोन वर्षे  निवड श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले नाही. यामुळे या श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची गैरसोय झाली आहे. प्रशिक्षण न झालेमुळे संस्था पातळीवर संबधीत शिक्षकांचे नावे निवड श्रेणीसाठी पात्र म्हणून ठराव देता येत नाही. काही शिक्षकांचे पंचवीस ते अठ्ठावीस वर्षे पूर्ण होऊनही त्यांचे प्रशिक्षण न झालेने त्यांना निवड श्रेणीच्या लाभापासून अनेक शिक्षकांना वंचीत राहावे लागत आहे. 

     या श्रेणीमुळे मुख्याध्यापक व निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांचा पगार समतूल्य होतो. मुख्याध्यापक पद न मिळाले तरीही निवडश्रेणी प्राप्त शिक्षकांना  तो स्केल मिळतो. म्हणून पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मिळणे अत्यावश्यक आहे.तरी शिक्षण विभागाने निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करून पात्र शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे. लेखी निवेदन दिले आहे ते राज्य शासनाच्या  शिक्षण विभागाच्या बोर्ड विभाग  ,उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर, शिक्षण आयुक्त पुणे , शिक्षण सचिव मुंबई विभागाकडे तात्काळ पाठवून पाठपूरावा व्हावा असे लेखी निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हाध्यक्ष प्रविण देसाई, संघटक फुलसिंग जाधव, खजानिस नंदकुमार कांबळे, शहराध्यक्ष अॅन्थनी गोन्सावलीस, सल्लागार उध्दव पाटील,रुजाय गोन्सावलीस, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

        फोटो 

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी भिमराव टोणपे यांना लेखी निवेदन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे देत असतांना. शेजारी स्वीय सहाय्यक सुधिर कुंभार  अन्य पदाधिकारी

Sunday, 8 April 2018

प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती बैठक संपन्न


हेरले / प्रतिनिधी दि. ८/४/१८


      सुगम व दुर्गम बदल्यांचा प्रश्न व्यवस्थित सुटण्यासाठी चांगली भूमिका चांगले विचार व योग्य ध्येय सर्वांचे एकच असेल तर शिक्षक वर्गाचे निश्चितच भले होईल.सर्वांनी प्रत्येकाच्या मनाचा विचार केल्यास आत्मयिता निर्माण होऊन नाते दृढ होईल. असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले यांनी केले.

     ते प्राथमिक शिक्षक बँकेत समन्वय समितीची शिक्षकांच्या बदली संदर्भात विचारमंथन सभा आयोजित केली होती त्या प्रसंगी बोलत होते. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील, सचिव सुरेश कोळी, मार्गदर्शक राजाराम वरुटे, मार्गदर्शक प्रसाद पाटील व संघटना पदाधिकारी यांच्या सुसंवादातून सुगम व दुर्गम जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात पुढीलप्रमाणे चर्चा झाली. खालील मुद्यांच्या आधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

   बदली पोर्टल भरताना समन्वय समितीच्या वतीने विनम्र आवाहन खो पध्दतीला समर्थन असा गैरसमज करून घेऊ नये.दुर्गम बांधवांवर अन्याय न होता २७/२ च्या जी आर मध्ये सुधारणा व्हावी यासाठी समन्वय समितीचा पाठपुरावा शेवट पर्यंत सुरू रहाणार आहेच.तरीही बदली पोर्टल सुरू झाल्याने खालील काही गोष्टी विचारात घेतल्यास कमीत कमी बदल्या होवून कमीत कमी अन्यायकारक बदल्या होतील.

        सोयीत असताना अधिक सोयीत येण्यासाठी संवर्ग १ मधील शिक्षक बंधू भगिनींनी विनंती फॉर्म भरू नये.त्यांनी बदली नको हा पर्याय निवडावा.


खरोखर जे ३५-४० किमी पेक्षा दूर आहेत त्यांनी बदली हवी पर्याय निवडावा इतरांनी निवडू नये ही विनंती आणि २० शाळा निवडताना ही जास्तीत जास्त रिक्त असलेल्या सोयीच्या शाळा निवडाव्यात. म्हणजे कमी खो बसतील आणि बदल्या कमी होतील.आपल्याच बांधवांवर होणारा अन्याय टळेल.

     संवर्ग २ मधील शिक्षकांनीही २० शाळा निवडताना आपल्या सोयीच्या जास्तीत जास्त रिक्त असलेल्या शाळा निवडाव्यात म्हणजे कमी खो बसतील आणि बदल्या कमी होतील.आपल्याच बांधवांवर होणारा अन्याय टळेल.

   सोयीत असणाऱ्या संवर्ग ३ मधील शिक्षकांनी बदली मागू नये. गैरसोयीतील शिक्षकांनीही २० शाळा निवडताना ही आपल्या सोयीच्या जास्तीत जास्त रिक्त असलेल्या शाळा निवडाव्यात.म्हणजे कमी खो बसतील आणि बदल्या कमी होतील. आपल्याच बांधवांवर होणारा अन्याय टळेल.


     मागील वर्षीचा अनुभव पाहता बदली मागणारे दुर्गम बांधव फक्त ३४ होते. पण सोयीत असतानाही संवर्ग १ मधील बदली मागण्याची संख्या जास्त झाल्याने बदली संख्या वाढली होती. तेंव्हा विनाकारण जास्त बदल्या होवू नयेत याची सर्वांनीच दक्षता घेण्याचे समन्वय समितीच्या बैठकीत ठरले आहे.

     २७/२ च्या बदली धोरणांत सुधारणा बाबत आज समन्वय समिती सर्व सदस्य व दुर्गम बांधव प्रतिनिधी यांच्यात प्राथमिक सकारात्मक चर्चा झाली.ही चर्चा पुढे चालू ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही असे सर्व समावेशक धोरण तयार करून शासनास सुचवावे यासाठी पुन्हा मंगळवारी सर्व संघटना प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.

     या प्रसंगी समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील, सचिव सुरेश  कोळी, मार्गदर्शक राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, मार्गदर्शक राजाध्यक्ष प्रसाद पाटील, कृष्णात कारंडे, सुधाकर निर्मळे विविध प्राथमिक शिक्षक  संघटनांचे  जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे, जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील, जिल्हाध्यक्ष रघुनाथ खोत, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबरे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौंदकर, जिल्हाध्यक्ष तानाजी घरपणकर, जिल्हाध्यक्ष गुरुराज हिरेमठ, जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, पी.ए. पाटील, सतिश बरगे, हरिदास वर्णे, आनंदा जाधव, प्रकाश ऐडगे, नागेश शिणगारे, ए.के. पाटील, प्रकाश सरदेसाई, मारूती पाटील, सदाशिव कांबळे, शिवाजी रोडे पाटील, किरण शिंदे, सदानंद शिंदे, प्रभाकर कमळकर, कृष्णात भोसले, सर्जेराव सुतार, विकास चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

        फोटो - प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत शिक्षक नेते मोहन भोसले बोलतांना शेजारी रविकुमार पाटील, सुरेश कोळी, सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील.

Saturday, 7 April 2018

12 वी नंतर सेना दलात उज्ज्वल भविष्याची संधी



कोल्हापूर -  ज्ञानराज पाटील 


देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलामध्ये प्रवेश घेऊन राष्ट्राची सेवा करु इच्छिणाऱ्या आणि चमकदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यासंबंधीच्या अभ्यासक्रमांविषयी व त्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परिक्षांसंबंधीची माहिती या लेखात दिली आहे तरी गरजूंपर्यंत ती जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे यासाठी शेअर करा. 

दहावी आणि बारावीचे निकाल लागू लागले की, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे पुढे काय ? बहुतेक वेळा या परिक्षांमध्ये मिळणाऱ्या टक्केवारीवर पुढील भवितव्य ठरविण्याकडे कल असतो. त्यातही विशेष ओढा असतो तो वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि आता स्पर्धा परीक्षांकडे. परंतु या परिक्षांमध्ये अपेक्षेएवढे गुण मिळाले नाही, तर विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये नैराश्य निर्माण होते आणि सर्व जीवन अंध:कारमय वाटू लागते. तसेच या अभ्यासक्रमांच्या वाढत्या खर्चामुळे पालक हवालदिल होतात.

परंतु, विद्यार्थी आणि विशेषत: पालकांनी जर डोळसपणे पाहिले तर, त्यांच्या असे लक्षात येईल की, जेथे केवळ दहावी व बारावीतील टक्केवारी तसेच पालकांना काहीही भुर्दंड बसणार नाही, असे अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. शिवाय हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पुढे काय ? हा प्रश्न निर्माण न होता, शाश्वत, प्रतिष्ठित व देशासाठी गौरवशाली आयुष्य जगण्याची संधी मिळते. अशा या काही अभ्यासक्रमांची माहिती करुन घेऊन शालेय जीवनापासूनच आपल्या कारकिर्दीचे नियोजन केल्यास पुढील वाटचाल ही निश्चितच सुखद व सुकर होते. म्हणून भारतीय सेनादलांशी संबंधित असलेल्या पुढील चार प्रमुख संस्थांची माहिती करुन घेणे उपयुक्त ठरेल.

विशेषत: या चारही संस्था महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातच आहेत. या संस्था म्हणजे (1) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला (2) सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, खडकी (3) नाविक अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणावळा (4) सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे.

1) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला - महाराष्ट्राचे शिल्पकार कै.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या प्रबोधिनीत प्रवेश मिळणे हे अत्यंत सन्मानाचे समजले जाते. प्रबोधिनीतून यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची पुढे भूदल, नौदल आणि हवाईदलात अधिकारी म्हणून निवड होते.

येथील तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, विषयांनुसार बी.ए. वा बी.एस्सी. ही पदवी मिळते. त्यानंतर सेनादलाच्या इंडियन मिलिटरी ॲकेडमी, डेहराडून; इंडियन नेव्हल ॲकेडमी, केरळ आणि इंडियन एअरफोर्स ॲकेडमी, हैद्राबाद या तीनपैकी एका विशेष प्रबोधिनीत एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड होते. त्यात शेवटच्या सहा महिन्यात आकर्षक असे विद्यावेतनही मिळते.

या प्रबोधिनीत दर महा महिन्याला जवळपास 400 विद्यार्थी घेतले जातात. कला, वाणिज्य वा शास्त्र विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रबोधिनीच्या स्पर्धा प्रवेश परीक्षेला बसू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी ही परीक्षा दरवर्षी एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. येथे प्रवेशासाठी 15 महिने आधी अर्ज करावा लागतो. परीक्षेची प्रश्नपत्रिका ही पाचवी ते बारावी दरम्यानच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. लेखी परीक्षा व व्यक्तिमत्व चाचणी हे दोन प्रमुख घटक या परिक्षेत असतात. लेखी परिक्षेत 300 गुणांचा गणित व 600 गुणांचा विज्ञान असे दोन पेपर असतात. तर व्यक्तिमत्व चाचणीत मानसशास्त्रीय कसोटी, गटचर्चा, लष्करी नियोजनाची क्षमता आणि नेतृत्वगुण पाहिले जातात. यासाठी निवड मंडळापुढे मुलाखत होत असते. उमेदवाराचे वय साडेसोळा ते साडेएकोणीस या दरम्यान असावे. दृष्टी निर्दोष असावी व तब्येत सुदृढ असावी.

2) सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, खडकी - या महाविद्यालयात दर सहा महिन्यांनी 75 विद्यार्थी घेतले जातात. भौतिक, रसायनशास्त्र व गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्पर्धा परिक्षेला बसण्यास पात्र असतात. या महाविद्यालयातून यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयाची बी.टेक. ही पदवी मिळते. या पदवीनंतर भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते.

3) नाविक अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणावळा - या महाविद्यालयात दर सहा महिन्यांनी 75 विद्यार्थी घेतले जातात. शैक्षणिक पात्रता ही भौतिक, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण अशी आहे. याशिवाय जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाची बी.टेक. ची पदवी मिळते. त्यानंतर नौदलात अधिकारी म्हणून निवड होते.

4) सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे - या वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी 130 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यापैकी 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. भौतिक, रसायन व जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असावी लागते. याशिवाय नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट उत्तीर्ण व्हावी लागते. येथील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते व पुढे सेनादलात सेवेची संधी प्राप्त होते.

वरील सर्व अभ्यासक्रमांची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे उमेदवारांना काहीही फी भरावी लागत नाही. शिवाय सरकारी खर्चात भोजन व वसतीगृहाची व्यवस्था होत असते. उमेदवार शिस्तशीर व चमकदार आयुष्य जगू शकतात.


सौजन्य -  विकासपिडिया

काळवीट पुन्हा एकदा मेले - सलमानला 50 हजारचा जामीन मंजूर


20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लोकांना वाटलं की काळवीटाला तब्बल 20 वर्षांनी का होईना न्याय मिळाला. 

पण जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.सलमान खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच, मुंबईत त्याच्या घराबाहेर तळ ठोकून बसलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 

आणि पैशांसाठीच खर्याचे खोटे व खोट्याच खरे करणाऱ्यांची जीत झाली व शिकार झालेले काळवीट पुन्हा एकदा मेले. 

Friday, 6 April 2018

पैसे मिळवणार्‍या खेळाडू, नट यांना पद्म सन्मान का ? नानाचा सवाल


आपल्या वक्तव्यामुळं सतत चर्चेत राहणाऱ्या पाटेकरांनी एक कटू सत्य सांगितले आहे. पद्मश्री पुरस्कार देतात अनेकांना ती का देतात ते पण समजले पाहिजे. जवळपास सर्वच खेळाडू हे पैसा मिळवण्यासाठी खेळतात तर नट नट्या पैशांसाठीच चित्रपट करतात असं असताना त्यांचे देशासाठी व समाजासाठी योगदान काय ?. तरीपण पैसे कमावणारऱ्या खेळाडू, नट यांना का देतात पद्म सन्मान का देतात असा बोचरा सवालही नाना पाटेकर यांनी  केला आहे. 


Thursday, 5 April 2018

बिटकॉइनसहित सर्व कॉईन वर भारतात बंदी - आरबीआयचा निर्णय


MH9 LIVE NEWS 

फेसबुक पेज ला लाईक करा व बातम्या मिळवा फेसबुकवर. 



आरबीआयने भारतातील कुठल्याही बँकेच्या खात्यातून बिटकाॅइनसहित सर्वच  क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. अशाप्रकारचे कॉईन मध्ये लाखो करोडो रुपये गुंतवणूक केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. आज गुरुवार पासून आता देशातील कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँक ग्राहकाला व्हर्च्युअल करन्सीची ट्रेडिंग करता येणार नाही.त्याचसोबत क्रिप्टोकरन्सीच्या खात्यात पैसे टाकता येणार नाही किंवा काढताही येणार नाही. 

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही व्यक्तीला या व्हर्च्युअल करन्सीने पैसे पाठवता येतात. महत्त्वाचं म्हणजे या व्यवहारावर कुठल्याही बँकेचं नियंत्रण नसतं. अशा प्रकारचे व्यवहार काळा पैसा व गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्ती करत असतात. 

MH9 LIVE NEWS 


पण आता भारतात देशातील कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँक ग्राहकाला व्हर्च्युअल करन्सीची ट्रेडिंग करता येणार नाही, त्यामुळे कॉईन च्या भुलभूलैय्या ला चांगलाच आळा बसेल. 

Wednesday, 4 April 2018

२त्नागिरी -नागपूर महामार्ग भूसंपादनास मौजे वडगाव ग्रामस्थांचा विरोध


फोटो - अप्पर जिल्हाधिकारी हदगल यांना लेखी निवेदन देतांना अॅड. विजय चौगुले व शेतकरी


हेरले / प्रतिनिधी 

रत्नागिरी - नागपूर या महामार्ग  रस्त्यासाठी मौजे वडगाव येथील शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत . रस्त्यासाठी पिकाऊ जमीन घेण्यास येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे  तीव्र विरोध  केला आहे .


    कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वडगावमधील शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून प्रस्तावित रस्ता करण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे . कारण या पिकाऊ जमिनीपासून तीन कि.मी. अंतरावर मुंबई - बेंगलोर रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध आहे . असे असताना शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन घेतल्यास शेतकऱ्यांची विहिर , जनावरांचे गोठे, राहती घरे जाणार आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे . त्यामुळे या रस्त्यास तीव्र विरोध शेतकऱ्यांकडून आहे . अशा आशयाचे लेखी निवेदन शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी हदगल यांना दिले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. 

    निवेदनावर रावसो चौगुले , सदाशिव चौगुले , किरण सुलताने , प्रकाश थोरवत , विलास सावंत , विलास पोवार , गुंडोपंत कुलकर्णी, संतोष थोरवत, सिकंदर हजारी, प्रकाश परमाज, संजय सावंत, धनाजी सावंत, सखाराम सावंत, तानाजी सावंत, दिपक थोरवत, सुनिल सावंत, प्रकाश भोसले, कुमार परीट, तानाजी थोरवत, रामचंद्र चौगुले, आण्णासो थोरवत, प्रकाश जांभळे, मनोहर सावंत, श्रीकात सावंत, संभाजी थोरवत, भिकाजी पाटील, सुभाष सावंत, संजय थोरवत आदींच्या सह्या आहेत.

     

Tuesday, 3 April 2018

कोल्हापूर सांगली मार्गावरील वाहने पार्कींग अपघातास कारणीभूत 


सलीम खतीब

हातकणंगले . / प्रतिनिधी दि. ३/४/१८


      कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर अनेकदा अपघात होऊन अनेकांचा जिव गेला तर कित्येक जण जखमी झाले आहे. या अपघाताना कारणीभूत ठरतो तो म्हणजे रस्त्यावर तर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मार्बल बाजारपेठ,गुळ , काकवी, मातीचे तवे , पेपर फोल्डर, लसी , उसाचा रस, चहा हातगाडी, नाष्टा सेंटर  चिकन६५ , चायनीज  यासारख्या स्टाॅलमुळे रस्त्यावर वाहतुकीची  कोंडी होत असल्याने अपघातात कारणीभूत ठरत आहे.याकडे ट्राफिक पोलिसांची नजर नाही का ?

       कोल्हापूर सांगली हा राज्य मार्गाचा काही भाग शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे वडगाव फाट्यापर्यंत येत असल्याने सांगली फाटा ते या मौजे वडगाव फाट्यापर्यंत मोठी मार्बल बाजारपेठ असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्बलचा व्यवसाय होत असल्याने याठिकाणी नेहमीच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते . खरेदी केले मार्बल वाहून नेण्यासाठी  अवजड वाहनांची गरज असते.ती वाहने या रस्त्याच्या  आजूबाजूला लावलेने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असतात. तसेच सध्या याठिकाणी परप्रांतीय लोकांनी कामगारांसाठी व प्रवाशांसाठी विविध खादयपदार्थांचे स्टॉल घातले आहेत.हे स्टाॅल चक्क रस्त्यावरच उभे केल्याचे पहावयास मिळत असल्याने वाहतुकीची  कोंडी होऊन याठिकाणी अपघातास कारण ठरत आहे .


    कांही दिवसापूर्वी हेरले येथील तरूण अभिजीत दिलीप बलवान( वय 25 ) या तरूणाचा अपघात याच रस्त्यावरून अपघात होऊन ठार झाला .पण हा अपघात रोडवर लावण्यात आलेल्या स्टाॅल मुळे झाला असल्याचे लोकातून बोलले जाते कारण हे स्टाॅल व्यवसायिक आपला माल विकण्या दृष्टीकोनातून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बोलावून वस्तू घेण्याचा घाट घालतात यांच्या बोलावण्याकडे वाहन चालकांचे गाडीवरील ताबा सुटून अपघात होत असतो.

     सांगली फाटा हा चौक नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी दररोज ट्राफिक जामचा प्रश्न उपस्थित होत असून येथे दररोज छोटे मोठे अपघात होत असतात. याचा विचार करून शिरोली येथील एक उद्योजकाने लाखाची पोलिस कक्षाची केबीन भेट देऊन पोलिस ठाण्यास मदत केली. पण हि केबीन पोलिसाविना बंदच आहे .या  ट्राफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिरोली पोलिस ठाण्याने दोन ट्राफिक पोलिसांची या ठिकाणी नियुक्त केले आहे,पण हे दोघे वाहतूक सुव्यवस्थित लावण्याऐवजी हायवेवरील येणाऱ्या जाणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना अडवून त्याना त्रास देण्याचे काम केले जात आहे.ज्याठिकाणी ट्राफिकचा विषय निर्माण होतो त्याठिकाणी या दोन ट्राफिक पोलिसांची दांडी असते मग या दोन ट्राफिक पोलिसांची वर्णीवर लोकांच्यातून प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे .

      कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावरील रस्त्याकडील वाहतूकीस अडथळा ठरत असेलेली सर्व मार्बल बारपेठची व विविध स्टॉलची अतिक्रमणे काढून वाहतूकीस शिस्त लावावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

         फोटो कॅप्शन

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील वाहतूकीची कोंडी होणेसाठी व अपघातास कारणीभूत ठरत असेलेली उभी वाहने.

राजाराम बंधारा दुरुस्ती शुभारंभ - 1 महिना बंधाऱ्यावरील वाहतूक बंद राहणार


आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून 19 लाख रुपये निधीतून  राजाराम बंधारा रस्ता  काँक्रिटीकरण  ,  पिलर दुरुस्ती , रेलिंग बसवणे आदी कामे होणार आहेत..या कामाचा शुभारंभ युवा नेते ऋतुराज पाटील यांच्या  हस्ते झाला . यावेळी नगरसेवक मोहन सालपे, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक सुभाष बुचडे, मदन जामदार व राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. 


राजाराम बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गावरुन कसबा बावडा ते जोतिबा, पन्हाळा, वडणगे, निगवे अशी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. यापूर्वी या बंधाऱ्यावरील अपघातात कित्येक दुर्घटना घडल्या आहेत. या रस्त्याची डागडुजी करावी ही जनतेची मागणी लक्षात घेऊन आ. सतेज पाटील यांनी लोकांना दिलासा दिला आहे. 


या बंधाऱ्यावरील वरील सद्या असलेले काँक्रीट खराब झाले आहे. ते काढून पूर्ण नवीन काँक्रीट करावे लागणार आहे . याकरिता सुमारे 1 महिना बंधाऱ्यावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे