Monday, 5 November 2018

mh9 NEWS

दिवाळी स्वराज्याच्या गडकोटांसोबत' या उपक्रमाअंतर्गत किल्ले पन्हाळगडाच्या पदभ्रमंती चे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

                    पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा यांच्या वतीने 'ही दिवाळी  स्वराज्याच्या गडकोटांसोबत' या उपक्रमाअंतर्गत किल्ले पन्हाळगडाच्या पदभ्रमंती चे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे .

             इतिहासात प्रथमच शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या राजमार्गावरून या सफरीची सुरुवात होणार आहे . या मध्ये पन्हाळ्याचा दुर्लक्षित भाग ,गडाच्या वाटा - चोरवाटा , व्यापारी मार्ग , फरसबंदी मार्ग ,दुर्लक्षित समाध्या ,येथे घडलेल्या लढायांची भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीने मांडणी पन्हाळ्यावर अभ्यास करणारे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे करणार आहेत . त्याचबरोबर या पदभ्रमंती मध्ये इतिहास अभ्यासक श्री. सतीश वाकसे यांचे "स्वराज्याचे साक्षीदार उपेक्षित नरवीरांचा इतिहास" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे .

          या भटकंतीची सुरुवात शिवा काशीद समाधी स्थळापासून होणार असून रेडिघाटी , ब्रिटिशकालीन स्मशानभूमी परिसर ,काली बुरुज , राणमंडळ , अंधारबाव ,कोकण दरवाजा , अंबरखाना मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या अवशेषांच्या जवळ सांगता होणार आहे . या मोहिमेत चहा  ,जेवण (झुणका भाकरी) व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून 7 नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे . नावनोंदणीचे अर्ज सह्याद्रीसाहित्ययात्रा ,भवानी मंडप येथे पवन निपाणीकर व बिंदू चौक येथे प्रशांत आंबी यांच्याकडे उपलब्ध आहेत . अधिक माहितीसाठी 7350407969 या क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन या मोहिमेचे संयोजक सुदर्शन पांढरे व प्रशांत आंबी यांनी केले .

                

पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ ,

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :