कोल्हापूर प्रतिनिधी
सुधाकर निर्मळे / भाऊसाहेब सकट /मिलींद बारवडे
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांमधील शिक्षकांची भरती शासनामार्फत करण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे .या आदेशामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षण संस्था चालकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला .
सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली .मोर्चामध्ये शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आला .जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले .यावेळी बोलताना एस.डी. लाड यांनी शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करताना ,सर्व अनुदानित शाळांना नियमितपणे वेतनेतर अनुदान मिळावे व २० टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे मिळावेत . मूल्यांकन झालेल्या शाळांना त्वरित अनुदान मिळावे आणि जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी ,शिक्षकेतर सेवकांचा सुधारित आकृतीबंध त्वरित लागू करावा व बालवाडी शिक्षिका सेविकांना शासनाकडून वेतन मिळावे तसेच बालवाडी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा आदी मागण्या केल्या . यावेळी जयंत आसगांवकर , भैय्या माने , क्रांतिकुमार पाटील आदींची भाषणे झाली . त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना संस्थाचालक संघ व व्यासपिठाच्या शिष्ठ मंडळाने निवेदन दिले .
शिक्षण तज्ञ डी.बी. पाटील , शिक्षण सभापती अमरीश घाटगे , एस. डी .लाड, जयंत आंसगांवर , वसंतराव देशमुख , डॉ. अभयकुमार साळुंखे , भैय्या माने, आबिद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, युवराज पाटील , क्रांतिकुमार पाटील ,शिवाजी माळकर , हसन देसाई , सुंदर देसाई ,सुरेश संकपाळ , व्ही.जी. पोवार , आर. वाय. पाटील , बी.जी. बोराडे , आर.डी. पाटील , के.के. पाटील , उदय पाटील , सुधाकर निर्मळे , संदीप पाटील , मिलिंद बारवडे , भाऊसाहेब सकट , प्रा. समीर घोरपडे , एन.आर. भोसले , एम.एन. पाटील , संजय कलिगते , अशोक हुबळे , संतोष आयरे, बी.के. मोरे डी.ए. जाधव,,नंदकुमार इनामदार , शिवाजी कोरवी , श्रीपती पोवार आदींनी नेतृत्व केले .
फोटो
शिक्षण संस्था संघ आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन एस. डी .लाड, शिक्षण सभापती अमरिश घाटगे , विरेंद्र मंडलिक , जयंत आसगावकर, भैय्या माने ,वसंतराव देशमुख ,क्रांतीकुमार पाटील , व्ही.जी . पोवार , के .के .पाटील , उदय पाटील , सुधाकर निर्मळे व इतर