हेरले / प्रतिनिधी दि. ५/११/१८
अवधूत मुसळे
नागपूर ते रत्नागिरी रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे . यासाठी मौजे वडगाव (ता.हातकणंगले)गावातील शेतकऱ्याची जवळ जवळ २१ एकर बागायती शेतजमीन , २ विहिरी ,छप्पर वजा घरे , बोअरवेल , फळझाडे , इतके भुसंपादकरूण रस्त्यामध्ये जाणार असल्याने गावातील शेतकरी भुसंपादन होऊ नये यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात होते . त्यामुळे मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त मागविला होता . यावेळी आधिकारी व शेतकरी यांचे मध्ये सुरुवातीला थोडा शाब्दीक वाद होऊन नंतर सामोपचाराने शेतकऱ्यांनी मदत केली.
नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग १६६याचे सर्वेक्षण शेतकऱ्यानी रोखण्याच्या प्रयत्नात होते . पण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर बी .एस. साळूखे व भुसंपादन अधिकारी अभियंता बशीर भाई यांनी शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण त्यावर योग्य मार्ग काढला . आम्ही फकत सर्वेक्षण करणार असून आजून तुम्हाला तुमचे म्हणने मांडण्यास वेळ आहे तसेच त्यावर हरकती घेऊ शकता. यामुळे सर्वेक्षण होऊ दया असे या अधिकाऱ्यांनी पटवून दिले .
शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे,अॅड. विजय चौगुले व शेतकऱ्यानी आपली बाजू मांडत तालूक्यातील ६ गावांचा समावेश असून प्रत्येक गावाचा रेडिरेकनर दर वेगळा आहे . त्यामुळे ६ही गांवांना एकाच रेडिरेकनरच्या ४ते ५ पट मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी केली. शेतकऱ्यात सर्वानुमते चर्चा झाली व जागेची मोजणी करू देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला .
पण तत्पुर्वी या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी येणार अशी चर्चा व महमंद जमादार कोतवाल यांनी आगोदर नोटिस बजावल्याने शेतकरी मोठया प्रमाणात जमा झाले होते . त्यामुळे हे अधिकारी सर्वेक्षणासाठी पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले . यामुळे शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची या अधिकाऱ्यानी समाधानकारक उत्तर देऊन शेतकऱ्यांना शांत केले.कोणाचीही अडचण नाही असे विचारूण मोजणी करण्यास सुरुवात केली . त्यामुळे मोजणीचे कामकाज सांय .६पर्यत सुरू होते.
यावेळी तलाठी संभाजी घाटगे , कोतवाल महमंद जमादार , अॅड . विजय चौगुले , स्वाप्निल चौगुले , शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे , जयेंद्र सावंत , तानाजी थोरवत , मधुकर आकिवाटे , कॉ.प्रकाश कांबरे , संतोष थोरवत , बबन सावंत , तसेच गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी शिरोली पो . ठाण्याच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक सुर्यकांत शिरगुपी यांनी दंगल नियंत्रण पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता .
फोटो
मौजे वडगाव येथे रस्ता सर्वेक्षणासाठी आलेले राजमार्ग प्राधीकरणाचे जनरल मॅनेजर बी .एस. साळूंखे , शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे , अॅड. विजय चौगुले, स्वप्नील चौगुले , व शेतकरी पोलीस कर्मचारी