Tuesday, 30 June 2020

पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कृष्णाजी मसुरकर यांची बिनविरोध निवड

पट्टणकोडोली : ( साईनाथ आवटे) 
पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या नुतन उपसरपंचपदी कृष्णाजी मसुरकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच सुर्यकांत भोजे यांनी राजीनामा सरपंच यांचेकडे सुपूर्द केला होता.
आज ग्रामपंचायतीच्या हाॅल मध्ये सरपंच विजया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृष्णाजी मसुरकर याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. आज उपसरपंच पदाच्या निवडीसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सदर निवड बिनविरोध झाल्या ची घोषणा करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर मसुरकर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

वाढीव विज बिले पुर्वी प्रमाणे द्यावीत . राष्ट्रवादी विद्यार्थी कडून आंदोलन .


कंदलगाव ता .३० ,
विज वितरण विभागाने चुकीच्या पद्धतीने काढ़लेली वाढीव विज बिले पूर्वी प्रमाणे प्रती महीना करुन द्यावीत म्हणुन आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे  आर.के.नगर व मोरेवाडी येथे विज वितरण कार्यालया शेजारी आंदोलन केले.
      गेल्या तीन महीन्यापासुन आधीच कोरोणाच्या महामारीमुळे लॉकडाउन व त्या अनुशंगाने आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेने  आर.के.नगर , मोरेवाडी, कंदलगाव परीसरातील चुकीच्या पद्धतीने आलेल्या वाढीव विज बिलाच्या समस्येने हवालदील झालेल्या नागरिकाचे निवेदन आज कार्यकारी अभियंता विठ्ठल चौगुले यांना देऊन वाढीव वीजबिला संबंधी तातडीने ख़ुलासा करावा व विज बिले दुरुस्त करुन मिळावित म्हणुन सर्वांची बिले परत दिली . व ही तीन महीन्याची एकत्रित आलेली बिले प्रती महीना करुन द्यावित असे सांगीतले, या चुकीच्या पद्धतीने काढलेल्या बिलांवर योग्य तो मार्ग काठावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. 
     यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश हुन्नुरे, अदित्य भाट, अथर्व साळुंखे, मुस्ताक देसाई,आकाश साबळे , कवीता आबळे , रेषा सावंत , सुरेखा गुरव , राधा खरे  व भागातील नागरिक उपस्थित होते .

फोटो  - आर .के. नगर विज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे सदस्य .

कसबा बावड्यात आषाढी प्रतिकात्मक दिंडी

कसबा बावडा कोल्हापूर 

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्‍मिणी असल्याने आषाढी पायी दिंडीला विशेष महत्त्व आहे. पूर्वापार चालत आलेली वारीची परंपरा बावडेकरांनी आजतागायत अखंड सुरू ठेवली होती. मात्र यावर्षी प्रथमच कोरोना पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पायी आषाढी वारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन निर्णयानुसार यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात एकही पायी दिंडी काढण्यात येणार नसून याला सर्व वारकरी संप्रदायाने मान्यता दिली आहे.
  यावर पर्याय म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आज कसबा बावडा येथील मोजक्या पताकाधारी वारकऱ्यांच्या मागे पायी दिंडीने मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले. हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात गावातील नवनाथ मंदिर,  दत्त मंदिर, ज्ञानेश्वर मंडप, तुकाराम मंडप, श्रीराम मंदिर येथे पाणी घालण्यात आले. यावेळी वारकरी दिंडी सोहळ्यातील वीणा व तुळस यांचे पुजन करून हा सोहळा संपन्न झाला.

अनंतशांती आणि फिरंगोजी शिंदे संस्थेमार्फत वृक्षारोपण


नंदगाव प्रतिनिधी   : 

गिरगाव ( ता - करवीर ) येथे अनंत शांती आणी फिरंगोजी शिंदे संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण हा मानवी जीवनाशी निगडित असा महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ पर्यावरण हे सदृढ आरोग्याचा पाया आहे. म्हणून स्वच्छ पर्यावरण ठेवणे प्रत्येक मानवाची जबाबदारी व काळाची गरज आहे. सध्या विज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना एकीकडे वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावुन जगविणे हि काळाची गरज आहे. या अनुषंगाने अनंतशांती संस्था व क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्था यांचे वतीने गिरगांव येथे  सरपंच संध्या पाटील, माजी उपसरपंच पांडुरंग खेडकर, पोलिस पाटील उमेश लोहार,माजी सैनिक सुभाष पाटील  यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी अनंतशांतीचे अध्यक्ष भगवानराव गुरव,माधुरी खोत,  फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील, विश्वजीत पाटील, अजिंक्य जाधव, शितल चव्हाण, सानिका जाधव,लक्ष्मी पाटील, अभिजीत पाटील, चेतनकुमार पाटील, विराज सरनाईक, शिवराज पाटील यांच्यासह मर्दानी आखाड्याचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 फोटो ओळ - वृक्षारोपण करताना गिरगावच्या सरपंच सौ . संध्या पाटील व इतर मान्यवर .

भाजपा नंदुरबार तर्फे अधिक्षक अभियंता महावितरण प्र.विभाग, नंदुरबार यांना निवेदन



नंदुरबार-प्रतिनिधी- वैभव करवंदकर -  


               जागतिक महामारी कोरोनामुळे आपल्या देशात 22 मार्च 2020 पासुन लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना या लॉकडाऊनमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. लोकांना 3 महिन्यांपासुन रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला आहे असे असुण त्यांचे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत आहे. अश्या परीस्थितीत विज वितरण कंपनी ग्राहकांना या 3 महिन्याचे अंदाजित बिल आकारणी करुन त्यांच्यावर मोठा आर्थिक बोझा लादते आहे. 
    भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा या निवदेनाव्दारे राज्य सरकारला विनंती करु इच्छिते की, कोरोना ही जागतिक महामारी लक्षात घेता सर्वसामान्य विज ग्राहकांना त्यांच्या या 3 महिन्यांच्या कालावधीतील विजबिल माफ करण्यात यावे. तसेच कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय अडचणित आले आहे. तर कित्येकांना आपलया नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. सर्व सामान्य नागरीक प्रचंड आर्थिक अडचणित आहे. अश्या परीस्थितीत अवास्तव विज आकारणी केली जात आहे. हे सर्वस्व चुकीचे आहे ग्राहकांची सर्व सामान्य नागरीकांची विजवितरण कंपनीने पिळवणुक थांबवावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी जिल्हा तर्फे नंदुरबार जिल्हयात तीव्र आदोंलन छेडण्यात येईल असे या निवेदनात म्हटले. निवेदन देतांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आकाश चौधरी आदि.

कै.रामभाऊ पाटील यांनी नंदुरबार शहरात छायाचित्रण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.


 प्रतिनिधी - वैभव करवंदकर -------     
      
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २२ वर्ष झाले. आज दि.१ जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्याचा २२  वा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या नकाशावर नंदुरबार जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले असले तरी त्याही पूर्वीपासून या शहराचा ऐतिहासिक ठेवा विविध माध्यमांतून सर्वांनी जपून ठेवला. त्यामुळे नंदनगरीचे नांव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले.

नंदगवळी राजापासून या शहराचा व परिसराचा परिचय इतिहासात सापडत असला तरी आजच्या काळापर्यंत शहरांच्या इतिहासावर आपल्या कार्यकर्तत्वाने आगळा-वेगळा ठसा उमटविणारे अनेक माणसे होऊन गेलीत त्यापैकीच या शहरात स्वतंत्र छायाचित्र व्यवसाय करुन या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. हा मान रामभाऊ जगन पाटील यांनाच जातो. फोटोग्राफिचा क्षेत्राकडे त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही. तर जीवनाच्या प्रत्येक क्षणाला कॅमेरात कैद करण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आहे, आणि कॅमेऱ्यातून टिपल्या जाणाऱ्या प्रत्येक क्षणाला कलात्मकतेच्या उच्चपातळीवर न्यायचे आहे असे म्हणून त्यांनी केले याची साक्ष नंदुरबार जिल्ह्यात आजही दिसून येते. आजच्या युवा पिढीला याची जाण नसेल पण तिसऱ्या पिढीतील फोटो त्यांच्या घरात असतील त्यापैकी काही फोटो तर रामभाऊ पाटील यांनी निश्चित काढली असतील. पाटील फोटो हा केवळ त्य काळात स्टुडिओ म्हणुन परिचित नव्हता तर छायाचित्र क्षेत्रातील एक परवलीचा शब्द झाला होता. रामभाऊ पाटील याना दादा या नावाने घरातील मंडळी हाक मारीत. मात्र त्याच्या ब्रिटीश क्षेत्रातील दराराही तेवढाच होता. ते खरोखरच या क्षेत्रातील दादा होते. ब्रिटीश काळात १९३२ साली त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. केवळ पैसा कमविणे हे उद्दिष्ट नसलेल्या कलंदर जीवन जगलेल्या दादांनी या क्षेत्रात केवळ आपला ठसा उमटविला असे नाही तर शुन्यातून विश्व निर्माण करुन आपली स्वतंत्र कारकिर्द निर्माण केली.

आजच्या आत्याधुनिक युगात कल्पना करता येणार नाही अशा साधनांच्या कमतरतेतही त्यांनी फोटोग्राफीचे काही नजारे पेश केले आहेत की, ते फोटो पाहतांना आजही वाह क्या बात है असे सहजोदार निघाल्याशिवाय राहत नाही. आणि येथेच दादांच्या कलात्मकतेला दाद मिळते. त्या फोटोला खास दादा टच होता. त्यांच्या छायाचित्रणांच्या वाटचालीतील एक महत्वाची आठवण देण्याचा मोह टाळता येत नाही. आदिवासी समाजात अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठित स्थान गुलाम महाराज यांनी मिळवले.

गुलाम महाराज यांनी आदिवासी समाजात जागृतीचे अत्यंत मौलिक कार्य केल्याने त्यांच्या स्मृतिदिन आजही तळोदा तालुक्यातील खरवड भागात साजरा केला जातो. दादांनी त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात बंदीस्त करुन ठेवली. छायाचित्र काढणेही ही केवळ उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी असतांना दादांनी गुलाम महाराजांचा तो पहिला आणि कदाचित शेवटचा फोटो या फोटोची प्रत आजही नितीन पाटील यांच्याकडे उपलब्ध आहे. अनेक आदिवासी बांधव गुलाम महाराजांचा फोटो मागायला येतात. गुलाम महारांच्या स्मृतिदिन जो फोटो पूजला जातो तोही दादांनी काढला आहे.

ही हृदय आठवण दादांचा नातू व वृत्तपत्र छायाचित्रकार नितीन पाटील अभिमानाने सांगतो. ऐकणाराही क्षणात नतमस्तक होतो. छायाचित्रणाप्रमाणेच दादांनी प्रचंद समाधान मिळवून दिले. तरीही स्वछंदी, कप्पेबंद आयुष्य जगणे मानवणारे नव्हते. त्यांना शिकारीचा भारी नाद होता. त्यासाठी त्यांनी ब्रिटीशांकडून बंदुकीचा परवानाही मिळविला होता. शिकारीसाठी दादांनी अवघा सातपुडा पालथा घातला होता. शस्त्र आल्यानंतर दादांनी शस्त्र विक्रीचाही परवाना काढून त्या व्यावसायातही पदार्पण केले. म्हणजे पारंपारिक चाकोरी बद्ध आयुष्य जगत असतांना सामाजिक कार्याची आवड दादांना स्वस्थ बसू देत नव्हती. सामाजिक कार्यकरित असतांना त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली त्यात त्यांना भरघोस यश मिळून ते नगरसेवक झाले.

त्या काळात त्यांनी विकासकार्यासाठी अविरत प्रयत्न केले. दादांच्या नगरसेवकपदाच्या काळात पालिकेच्या इमारतींचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री ना.यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. विविध क्षेत्रात दादांनी यशस्वी संचार करुन आपले कर्तृत्व सिध्द केले. सामाजिक क्षेत्राबरोबर त्यांनी कौंटुबिक जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. आपल्या लहान भावाचे शिक्षण पूर्ण करुन सिव्हिल इंजिनिअर बनविले. त्यांचे बंधू स्व.वामन पाटील दिल्लीत स्थायिक होते
. शिकारीचा छंद असलेल्या दादांनी गॅसवर चालणारी ट्रक आणुक शहरवासियांना चकीत करुन सोडले.

अशा विविध प्रकारे नावाजलेले कर्तृत्वान व्यक्तिमत्व कै.रामभाऊ जगन पाटील यांचे दि.१ जुलै १९९९ रोजी निधन झाले. आज त्यांचा २१  वा स्मृतिदिन दादांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न...

संकलन -  अविनाश पाटील, नंदुरबार

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची आरोग्य तपासणी ग्रामपंचायतीमार्फत गावचे कर्ते म्हणून आपण जबाबदारीने करून घ्यावी - जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे



  आरोग्य तपासणी विशेष मोहीम आढावा बैठकीमध्ये सरपंच, ग्रामसेवकांना, जि प अध्यक्षांनी केल्या सूचना

उदगीर प्रतिनिधी -गणेश मुंडे 
उदगीर तालुक्यांमध्ये कोरोना चे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे उदगीर तालुक्यातील सर्व 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची बीपी,शुगर,किडनी आजार, डायलिसिस,हार्ट चे प्रॉब्लेम आहेत का ? यांची माहिती घेऊन आवश्यक व त्या व्यक्तींना लगेच वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध राहावे याकरिता महसूल प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे आढावा बैठक संपन्न झाली.50 वयापेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेणे विशेष मोहिमेच्या पूर्व तयारीची बैठक शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे घेण्यात आली या बैठकीला उदगीर  उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,उदगीर तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील,उदगीर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी  अंकुश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य रोडगे मॅडम, बापूराव राठोड, यांच्यासह विविध सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

अन्यायग्रस्त शिक्षकाच्या पाठिशी डिसीपीएस संघर्ष समिती

शिरोळ प्रतिनिधी
ज्ञान दान करणारे गुरूवर्य शिक्षक यांना  आपल्या भारतीय संस्कृतीत मानाचे सर्वोच्च स्थान आहे , शिक्षक हा नुसताच पुस्तकातील अभ्यास शिकवत नसतो तर तो मुलांना आकार देत असतो , त्या आकारातुनच एक सक्षम युवक , नागरीक व यातुनच मजबुत देश तयार होतो , कलेक्टर , अधिकारी , व्यापारी , उदयोजक , सैनिक , राष्ट्रपती , आमदार , खासदार , मंत्री ,  पोलीस , एक आदर्श नागरीक या सर्वांना शिक्षक च घडवतात म्हणुन गुरुवर्य शिक्षकांना आपल्या देशात प्रथम वंदनीय स्थान शिक्षकांना दिले जाते , पण सध्या या गुरुवर्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे , कोल्हापुर जिल्हयात अशी घटना घडली आहे , मा. शिक्षक श्री हणमंत आण्णासो वाघमारे सर यांना कोल्हापुर  जिल्हा परिषद मधील विस्तार अधिकारी  यांच्याकडुन हिन दर्जाच्या वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. 
अमानुष वागणूक देण्या-या शिक्षण विस्तार अधिका-यावर कारवाई करणेबाबत निवेदन मा .मुख्यकार्यकारी अधिकारी , मा .जिल्हा परिषद अध्यक्ष , मा .शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले , निवेदन देताना महाराष्ट्र राज्य डिसीपीएस संघर्ष समितीचे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष श्री करणसिंह सरनोबत सर, जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर, जिल्हा सदस्य सचिन कांबळे सर ,संदीप जाधव, सचिन जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, 29 June 2020

मालवाहतूक मध्ये एसटी नक्कीच यशस्वी होईल - परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील

    कोल्हापूर प्रतिनिधी 
   

     एसटी म्हणजे विश्वास, हे गेली ५० वर्षे राज्यातील प्रवाशांनी अनुभवलंय. एसटीवरील विश्वासहर्ता कर्मचाऱ्यांनी टिकवून ठेवलीय. त्यामुळे आज कोल्हापूर विभागातून एसटीतुन मालवाहतूक करण्यास सुरुवात केलीय. यात नक्की एसटी महामंडळ यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आज कोल्हापूर राज्य परिवहन विभागाच्यावतीने मालवाहतूक एसटी बसेसची सुरवात करण्यात आली. याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. 
ज्या बसेस सुरक्षित आहेत मात्र प्रवासी वाहतुकीसाठी त्या बसेस वापरल्या जात नाहीत त्या बसेस माल वाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला राज्य परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यात अशा ३५० मालवाहतूक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ बसने माळ वाहतुक सुरू करण्यात येणाराय. या माल वाहतूक बसचा शुभारंभ परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक अजय पाटील, डिटीओ शिवराज जाधव, स्थानक प्रमुख दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
एसटीची विश्वासहर्ता असल्यामुळे सरकारी कामकाज तसेच बालभारती सारख्या कामांना वेग येईल, असा विश्वास यावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या काळात एसटीने महत्वाची भूमिका बजावलीय. कोकणातील आंबा आणि इतर कामासाठी एसटी उपयोगी आली. एसटीच्या माध्यमातून राज्यात मालवाहतूकीच्या आतापर्यंत १९०० फेऱ्या झाल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला दीड कोटी रुपयांचा नफा मिळलाय.  येणाऱ्या काळात एसटीची मालवाहतूक नक्कीच  एसटीला उभारी देईल, असा विश्वास देखील परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. 


     दरम्यान यावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एसटी स्टँडवरील बसमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मास्कचा वापराबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालण करून प्रवास करावा असं अवाहन प्रवाशांना केले.

इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला - पालकमंत्री सतेज पाटील - जनतेला न्याय देण्यासाठी केंद्राच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

    कोल्हापूर प्रतिनिधी 
        महागाई वाढवण्याचे काम भाजप सरकारकडून केलं जातंय. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. जनतेच्या दुःखात भाजपला सुख मिळते, अशीच भाजपची भूमिका आहे. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटी इथं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्यायी इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. या प्रसंगी ते बोलत होते. 
              एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी लढतोय. लॉकडाउनमुळं  सामान्य जनतेच्या कंबरडे मोडलंय. त्यामुळं सर्वच घटकात आर्थिक परिणाम जाणवत असताना केंद्र सरकारने इंधन दरवाढ केलीय. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने देश पातळीवर इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू  केले आहे. याच इंधन दरवाढी मुद्यावरून कोल्हापूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज सातत्याने होत असलेल्या  इंधनदरवाढीमुळं सामान्य जनता मेटाकुटीला आलीय. या जनतेला न्याय देण्यासाठी  केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस कमिटी इथं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून या इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकरच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरावर देशात इंधनाचे दर ठरवले जात असताना, देशात इंधनाचे दर महाग का? असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. देशात इंधनाचे दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने  केलीय. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं. या प्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील यांनी देशामध्ये झालेल्या इंधन वाढीमुळे सामान्यांना त्रास होतोय.  या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून अन्न, धान्य तसेच सर्वच वस्तू पुरविल्या जातात. इंधन दरवाढ केल्यामुळे की महागाई वाढते. याचा भार मध्यमवर्गीय आणि सर्वसामन्यावर बसत आहे. त्यामुळं जनतेच्या दुःखात भाजपला सुख मिळते, अशीच भाजपची भूमिका आहे. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.


     या आंदोलनात आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजीवबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,  गुलाबराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, तौफीक मुल्लाण्णी, प्रवीण केसरकर, दिलीप पोवार, सागर चव्हाण, सदाशिव चरापले, सचिन चव्हाण, सुरेश कुऱ्हाडे, संध्या घोटणे, संजय पोवार वाईकर, विद्याधर गुरबे, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, उदयानी साळुंखे, चंदा बेलेकर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे सर्वसामान्यवर आर्थिक संकट,वीज बिल माफ करण्याची पुंजानी यांची मागणी


प्रतिनिधी (आरिफ पोपटे )। कारंजा (लाड)


कोविड-१९ या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला व्यापले आहे.कोरोना संक्रमनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण भारतात २१ मार्च पासून लॉक डाऊन लावण्यात आल्यामुळे सर्वसामान्य, गरीब,हातमजुरी करणारे,मजूर,कामगार या सर्व घटकांवर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.गेल्या चार महिन्यापासून कोविड १९ महामारीचे संकट मुख्यतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीत गरीब व सामान्य वर्ग घटकाना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.चार महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.या सर्व समस्यांना लक्षात घेता महाराष्ट्रातील गरीब व सर्वसामान्य लोकांकरिता दिलासा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व विध्यार्थ्यांना देय असलेले शैक्षणिक वार्षिक शुल्क, पाणी बिल,चालू वर्षातील न.प.व ग्रामपंचायत हद्दीतील कर याबाबीसह विद्युत बिल माफ करण्याची मागणी काँग्रेस नेते हाजी मो.युसुफ पुंजानी यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना केली आहे.
        कोरोना संक्रमण महामारीच्या वाशिम जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री २९ जून रोजी वाशिम दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी कारंजा येथिल कोविड-१९ संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या सिंधी कॅम्प परिसराची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वरील मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, गटनेता अड फिरोज शेकूवाले, नगरसेवक अ.एजाज अ. मान्नान,जाकीर शेख,सलीम प्यारेवाले, सभापती सलीम गारवे, राजू इंगोले, रउफ खान मामु,सै मुजाहिद,अ रशीद,चांद शा, निसार खान,युनूस खान पहेलवान, इरफान खान,जाकीर अली,जावेदोद्दीन,इर्शाद अली,अ आरिफ मौलाना,शमीम फरहत आदींसह कारंजा काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष हमीद शेख आदी उपस्थित होते.



अ,लाट ग्रामस्थांचा ठिय्या - महापूर घोटाळ्याची चौकशी करण्याचे तहसिलदारांचे लेखी आश्वासन

शिरोळ प्रतिनिधी
जुलै 2019 मध्ये आलेल्या महापुरात शासनाकडून आलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची चौकशी करावी,दोषींवर फोजदारी कारवाई करावी,पंचनामे बोगस करून अनुदान लाटलेल्यांची वसूली करावी आणि लाभापासून वंचित राहिलेल्याना अनुदान मिळावे या मागणीसाठी आज अ,लाट च्या शंभर पेक्षा जास्त ग्रामस्थांनी तहसीलदार कचेरीत ठिय्या आंदोलन केले.आंदोलक आक्रमक झाल्याने आणि चौकशीचा आदेश मिळाल्याशिवाय हलणार नाही असा पवित्रा घेतल्याने शिरोळ च्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांनी लॉक डाऊन संपताच चौकशी करण्याबाबत लेखी आदेशाचे पत्र दिल्याने वातावरण निवळले आणि ठिय्या आंदोलन थांबवण्यात आले
सामाजिक कार्यकर्ते  प्रा,संजय परीट ,डॉ दशरथ काळे आणि  शेतकरी नेते विद्याधर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गेली 24 दिवस या मागणीचा पाठपुरावा सुरू होता, तहसीलदारांच्या लेखी आदेशाने आज आंदोलकांना न्याय मिळवून आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले आज झालेल्या ठिय्या आंदोलनाला शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,आंदोलन अंकुश चे धनाजी  चुडमुगे ,कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष आणि भा,ज,पा,चे नेते रामचंद्र डांगे,वंचित आघाडीचे सुनील खोत,  उपसभापती मल्लू खोत,आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे,सुरेश सासणे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.
आंदोलनात शरद चे संचालक एस के पाटील,तंटामुक्त चे माजी अध्यक्ष पायगोंडा पाटील, माजी सरपंच श्रीकांत मधाळे ,माजी उपरपंच सागर सांगावे,भारिप चे सतीश कुरणे इ,न,पा,चे माजी शिक्षण सभापती राजू आवळे,संजय कोळी कुरपे,महावीर गाडवे ,सदाशिव कुलकर्णी, विजय कदम,दादासो कोळी, मारुती मोहिते,सुधीर सांगावे,विजय नायकुडे,श्रीमती रोशन मुल्ला,सौ माधुरी ठाकरे,सौ अनिता गोटखिंडे, यांचेसह ग्रामस्थ महिला मोठ्या  संख्येने उपस्थित होते.
आंदोलक न्याय मिळेपर्यंत ठिय्या उठवायचा नाही या हेतूने घरची भाजी भाकरी घेऊनच आले होते त्यांनी कचेरीच्या आवारातच दुपारची भाकरी खाल्ले गेली 24 दिवस सुरू असलेले हे आंदोलन अखेर चौकशीचे लेखी पत्र मिळाल्याने यशस्वी झाले.

संजय घोडावत पॉलीटेक्नीच्या ई लर्निंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद ५००० हुन अधिकचा सहभाग



हातकणंगले /प्रतिनिधी

मिलींद बारवडे
संजय घोडावत पॉलीटेक्नीक मार्फत दि.२५ जून ते २७ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ई-लर्निंग या ऑनलाईन कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास ५००० हुन अधिकांचा सहभाग या कार्यशाळेत होता. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांसाठी अशा पद्धतीची कार्यशाळा घेणारे अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलीटेक्नीक हे राज्यातील पहिले पॉलीटेक्नीक ठरले आहे.
     या कार्यशाळेचे उदघाटन कोल्हापूर चे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य  विराट गिरी यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून देत ही कार्यशाळा शिक्षकांसाठी कशी उपयुक्त आहे व या कार्यशाळेत शिकविल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या अध्यापनात कसा उपयोग करायचा याची माहिती दिली.याचबरोबर देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या शिक्षकांचे स्वागत केले. 
      विश्वस्त विनायक भोसले यांनी येणाऱ्या काळात शिक्षकांनी या अध्यापन कौशल्यांचा वापर आपल्या अध्यापनात करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित केले तसेच लॉकडाऊनच्या काळात संजय घोडावत शिक्षण संकुलाने ऑनलाईन शिक्षण पद्धत कशी यशस्वी राबविली हे सुद्धा आवर्जून सांगितले तसेच संशेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
     या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रा.सागर चव्हाण यांनी अध्यापनात गुगल तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये गुगल ड्राईव्ह, गुगल क्लासरूम तसेच व प्रा.आशिष पाटील यांनी गुगल फॉर्म याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा.धीरज पाटील, प्रा.विनायक पावटे यांनी  गुगल मीट बद्दल तर प्रा.रईसा मुल्ला यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील  एक्सेल व पॉवरपॉईंट चा प्रभावी वापर कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी प्रा.स्वप्नील ठिकणे यांनी दीक्षा, ई पाठशाळा, ई क्लास, बालभारतीचा वापर, ऑनलाईन परीक्षा, लाईव्ह व जामबोर्ड चा वापर याविषयी मार्गदर्शन केले तर प्रा. नरेश कांबळे यांनी यु ट्यूब व त्याची वैशिष्टये या विषयावर मार्गदर्शन केले. 
    या कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम डाएट सोलापूर चे प्राचार्य डॉ.इरफान इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी अकॅडमीक डीन प्रा.एन.एस.पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.शुभांगी महाडिक, प्रा.रईसा मुल्ला, प्रा.आशिष पाटील व टीम ने अथक परिश्रम घेतले. 
ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
      फोटो 
अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलीटेक्नीक कॉलेजच्या राज्यस्तरिय ई लर्निंग ऑनलाईन कार्यशाळेतील मार्गदर्शक प्राचार्य विराट गिरी व त्यांचा प्राध्यापक वर्ग.

--

माजी नगरसेवकांनी केली स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी

कोल्हापूर प्रतिनिधी

गेली कित्येक दिवस खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. ताराबाई पार्क मधील किरण बंगला ते मोहिते हाऊस या रस्त्यावरून जाताना लोकांना रस्त्यावर खड्डे पडले आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नव्हते. प्रशासनाने कित्येक दिवस बेदखल केलेल्या या रस्त्याची  पँचवर्कचे काम स्वखर्चाने माजी नगरसेविका सौ. पल्लवी निलेश देसाई व माजी नगरसेवक श्री निलेश देसाई यांनी करून घेतले. 
   ताराबाईपार्क येथील किरणबंगला ते मोहिते हाऊस या रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते तसेच या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळाही होत होता तसेच अपघात ही होण्याची शक्यता होती .या सर्वाची दखल घेत  देसाई दांपत्याने  लोकांचे हित लक्षात घेऊन तसेच अपघात टाळण्यासाठी स्वखर्चाने या रोडचे पँचवर्क करून घेतले. तसेच तो रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्यात आला.

Sunday, 28 June 2020

एकही रविवार सुट्टी न घेता हे करतात स्वच्छता अभियान


कोल्हापूर प्रतिनिधी

भारत स्वच्छ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच भारत स्वच्छ केला होता. मात्र तेवढ्यापुरता इव्हेंट न करता सातत्याने स्वच्छता अभियानाची गरज आता आहे.
कोल्हापूर शहरामध्ये गेले कित्येक रविवार हक्काची सुट्टी न घेता मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी हे स्वत: कचरा काढून शहराला स्वच्छ करताना दिसत आहेत. ग्रामस्वच्छता अभियानावेळी हाती घेतलाला झाडू कलशेट्टी यांनी अद्यापही कायम सोबत ठेवला आहे. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आपण काम केल्याचं पाहिल्यास इतर कर्मचारीही जोमाने काम करतील, केवळ भाषणं न करता कृतीतून आपला विचार लोकांपर्यंत मांडायचा असतो, लोकांना सवय लावायची असते असे कलशेट्टी यांनी मागे एकदा म्हटले होते . 
  काल सुद्धा रविवारी कसबा बावडा पंचगंगा नदी घाट परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

या अभियानात स्वरा फौंडेशन व आरोग्य विभाग कसबा बावडा आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, व कर्मचारी, व वाय बी पाटील शाळेचे दत्तात्रय चौगुले सर,यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 
कसबा बावडा पंचगंगा नदीवरील घाट परिसरात स्वच्छता करून कोमनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षरोपणसुद्धा करण्यात आले.
 या स्वच्छता अभियानात प्रमोद माजगावकर, अजिंक्य पाटील, राहुल कुंभार, यश कुंभार, अपूर्वा खांडेकर, प्रणव कागले, अक्षय दळवी, अमित ठाणेकर, सरफराज , पियुष हुलस्वार, आदित्य पाटील व स्वरा फौंडेशनचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. 
स्थानिक नगरसेवक डॉ. संदीप नेजदार व तुषार नेजदार यांनी विशेष परिश्रम घेतले. या ठिकाणी जवळपास एक डंपर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. 
 आयुक्त कलशेट्टी यांनी परिसरातील स्मशानभूमीस भेट देऊन नुतनीकरणा बद्दल समाधान व्यक्त केले.

अनुपवाडी येथे विज पडुन म्हैस ठार


उदगीर  प्रतिनिधी :-गणेश मुंडे 

उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथे आज सांयकाळी जवळपास 5:30च्या अंदज्यात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती शेतकरी पशु पालक आपली जनावरे घरच्या दिशेने निघण्याचा तयारीत असतांना एवढ्यात  विज पडुन गोविंद नामदेव सुरनर यांची गाभण असलेली एक म्हैस अनुपवाडी शिवारामध्ये ठार झाली आहे या म्हेसीची किंमत साठ ते पहासष्ठ  हजार रुपयाच्या घरात  आहे.या बाबत उदगीर तहसील कार्यालयाला माहिती मिळताच समंधीत सज्जाचे तलाठी जानतिने यांनी पंचनामा केले असुन शासनाने मदत करावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.

शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांना विधान परिषदेवर घ्यावे - सौ. लक्ष्मी पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 
राज्याच्या विधानपरिषदेत प्राथमिक शिक्षकांचे विद्यार्थी व शाळेचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक नेते श्री.संभाजीराव थोरात संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला कमिटी कोल्हापूरच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर महिला कमिटी जिल्हा आध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी दिली आहे .
     महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष ना.जंयत पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या विधानपरिषदेत माध्यमिक, उच्चमाध्यमिक व महाविद्यालय शिक्षकांचे राज्यातून सहा प्रतिनिधी घेतले जातात तसेच पदवीधर व इतर क्षेत्रातील प्रतिनिधी विधानपरिषदेत घेतले जातात पण प्राथमिक शाळेचा व शिक्षकांचा प्रतिनिधी विधानपरिषदेत घेतला जात नाही.
      म्हणून राज्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची विधानपरिषदेत योग्य ती मांडणी करुन प्रश्नांची सोडवून करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांचा प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे गरजेचे आहे. 
       प्राथमिक शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून गेली ४५ प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यम तून प्राथमिक शिक्षक विद्यार्थी व शाळेचे प्रश्न अधिवेशन अंदोलनाध्या माध्यमातून सतत शासन दरबारी मांडणारे व राज्यातील ३ लाख सदस्य असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते तथा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संभाजीराव थोरात यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे .     
      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील प्राथमि क शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारी शासन मान्यता प्राप्त संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना हक्काबरोबरच कर्तव्याची ही जाणीव करन दिली जाते. तसेत गुणवत्ता वाढीसाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा करण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात.
     संभाजीराव थोरात यांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्यास हे कार्य अधिक गतिमान होणार असल्याने नजीकच्या काळात राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेयरः घेण्यात येणाऱ्या १२ प्रतिनिधीत त्यांना संधी मिळायी अशी मागणी निवेदनात केली आहे.
     निवेदनावर कोल्हापूर महिला कमिटी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील यांच्यासह मोहन भोसले, बाळकृष्ण तांबारे, आप्पासाहेब कुल, जनार्दन निऊंगरे, एन.वाय पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, संगिता खिलरी, पुजा मुराळी, नुतन सकट, निता पोतदार, बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, दूंडेश खामकर, अरूण चाळके आदींच्या सह्या आहेत. 


अनंतशांती व फिरंगोजी शिंदे संस्थेचे कार्य गगणबावडा तालुक्यात कौतुकाचे ...

कंदलगाव ता .२८ ,
     जागतीक आपत्ती कोरोणाच्या काळात पुर्ण जगभरात शिक्षणाची दारे कोरोणा सारखीच लाॕक डाऊन झालीत. अद्याप ही शाळा सुरु होण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत.  शहरी भागात काही इंग्लीश माध्यम च्या शाळा मध्ये आँन लाईन शिक्षण प्रणाली सुरु झाली आहे . मात्र ग्रामीण दुर्गम डोंगराळ भागातील मुलाचे काय?त्याचे वर्षे वाया जाण्याची वेळ येत आहे .
     याचाच आढावा  घेवुन अशा डोंगराळ दुर्गम  भागातील  हुशार होतकरु मुलाना त्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या पुढिल वर्षाची शैक्षणिक साहीत्य व बौध्दिक क्षमता वाढवणारी शैक्षणिक उपक्रम साहित्य वितरण करण्यात आले . संस्था प्रति वर्षी अशा एक हजार होतकरु मुलांना दत्तक घेते व वाडी वस्ती वरिल मुलाना शैक्षणिक साहित्याचा मोफत पुरवठा करते.   सुट्टी असल्याने दुर्गम भागातील मुले अभ्यासाच्या प्रवाहातून बाजूला जात आहेत. 
ग्रामीण व दुर्गम भागात गरीब गरजु विद्यार्थ्यांना लाॕक डाऊनच्या काळात कोणत्याही शैक्षणिक साहित्याचा पुरवठा झाला नाही. ऑनलाईन शिक्षण घेण्या इतपत तिथले पालक जागृत नाहीत व वडीलांच्याकडे एंड्रॉइड फोन नाहित त्यांना जिवन जगण्यासाठी शेती हाच पर्याय आहे . अशाच गगणबावडा तालुक्यातील काही ग्रामीण दुर्गम भागाचा आढावा  घेवुन मुलांना शैक्षणिक साहित्याचा अनंतशांती संस्था व फिरंगोजी शिंदे संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने   शेळोशी गावातील मुलांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . 
  यावेळी भगवान गुरव,माधुरी खोत,वस्ताद प्रमोद पाटील,शितल चव्हाण, वेदश्री देसाई,मनोज देसाई, हिंदुराव पाटील,तुषार पाटिल अर्थव गुरव यशराज पाटिल  अंगणवाडी सेविका सुनिता पालव उपस्थित होते.
फोटो  - शेळाशी गावातील शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना अनंतशांती व फिरंगोजी संस्थेचे सदस्य .

आर .के. नगर येथे मास्क व औषध वाटप ...


कंदलगाव ता .२८ ,
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कै.शामराव शंकर शेटे यांचे स्मरणार्थ श्री.मिलिंद शामराव शेटे यांचेकडून आर्सेनिक अल्बम-३० व मास्कचे वाटप आर.के.नगर येथे सोसा.नं १,२, व मूळ सोसायटी येथे ५००घरांमध्ये करणेत आले. त्याचबरोबर आर.के.स्पोर्टस्च्या खेळाडूंनाही स्वच्छतेचे महत्व,सोशल डिस्टन्सींग पाळण्याचे आवाहन करणेत आले.
    यावेळी मिलिंद शेटे,प्रमोद हुदले ,सुशील वंदुरे -पाटील, अमर शिंत्रे, गजानन मनगुतकर,संदिप मगदूम व खेळाडू उपस्थित होते.
फोटो  - आर .के. नगर येथे खेळाडूंना मास्क व औषध वाटप करताना मिलींद शेटे व इतर

Saturday, 27 June 2020

मंगरुळपीर येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेशाने बिलालनगर परिसर सिल


 मंगरुळपीर प्रतिनिधी 
रजनिकांत वानखडे दि.२७ -
आज सकाळी अकोला येथे प्राप्त झालेले कोरोना विषयक चाचण्यांचे अहवालात शहरातील बिलाल नगर परिसरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने याबाबत संबंधीत व्यक्तीचे संपर्कातील नागरिकांचा शोध सुरु केला आहे. 
 दरम्यान, कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या आजचे एका आदेशान्वये या परिसराला कान्टेंन्मेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. बिलालनगर परिसर सिल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश मंगरुळपीर नगर परिषद व पोलिस स्टेशनला देण्यात आलेले आहे. याभागातील नागरिकांचे मुक्तसंचारावर बंदी घालण्यात आली असून आदेशीत चतु:सिमे मध्ये येणारे सर्व वाहतूकीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. 
     या चतु:सिमे मध्ये  कॉन्टेंन्मेंट झोन म्हणून राहणार आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्यास व जाण्यास मज्जाव घालण्यात आला येऊन मनाई हुकुम आदेश लागू करण्यात आलेला आहे. 
 नागरिकांनी प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे व कोरोना पासून आपले रक्षण करावे असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.


आरोग्य राज्यमंत्री डॉ यड्रावकर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

सैनिक टाकळी( प्रतिनिधी)
देशात आलेल्या कोरोनो सारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता २४ तास अविरतपणे सेवा केल्याबद्दल राज्याचे  आरोग्य राज्य मंत्री डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर)  यांच्या हस्ते सैनिक टाकळीतील डाॅ.संजय पाटील यांचा कुरूंदवाड येथील दयावान तालीम यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. कोरोना  सारख्या महाभयंकर रोगाशी तोंड देत असताना पोलीस कर्मचारी, होमगार्ड, स्वछता कर्मचारी ,डॉक्टर, नर्स आदिंनी  आपला जीव धोक्यात घालून सामाजिक सेवेबरोबरच आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले आहे. मंडळाच्या वतीने या सर्व क्षेत्रातील कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जुलै अखेर ! ग्रामविकास मंत्री मा .ना. हसन मुश्रीफ

                           
माजगाव प्रतिनिधी:-        
       
              आज शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री मा .ना . हसन मुश्रीफ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली . व निवेदन दिले . विस्थापित झालेल्या शिक्षकाना तसेच पती पत्नी, गंभीर आजार,५३ वर्षावरील गैरसोयीत असणाऱ्या शिक्षकांना सोयीत आणण्यासाठी जिल्हांतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत तसेच आंतर जिल्हा बदलीचे ऑनलाईन माहिती भरुन तयार आहे . त्याही बदल्या करुन बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या शिक्षकाना न्याय द्यावा असा आग्रह धरला .                                     
       यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ साहेब म्हणाले की तुम्ही ज्यावेळी भेटता त्यावेळी बदल्या करणेचा आग्रह धरता, परंतू कोरोना संकटामूळे आम्ही बदल्या करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता .आता बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून मंत्रीमंडळामध्ये ही याची मी चर्चा करुन जुलै अखेर बदल्या करण्यासाठी मान्यता घेतली आहे . त्यासाठी बदली समितीला सॉफ्टवेअर तयार करणेस सांगितले असून जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा सोयीच्या बदल्याचे धोरण राबविले जाईल असे स्पष्ट केले . शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांचे आभार मानले व या बदल्या लवकरात लवकर झाल्या तर शिक्षकांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होवून शैक्षणिक कामकाजही शिक्षकांच्या हातून अतिशय चांगले  घडेल असा विश्वास ही शिष्टमंडळाने मंत्री महोदयांना दिला .                       
            जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदल्या व्हाव्यात म्हणून राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वा खाली अनेक वेळा शिष्टमंडळ भेटले होते . त्यामूळेच शिक्षक संघाच्या प्रयत्नाला यश आले आहे . या शिष्टमंडळात बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, बँकेचे संचालक राजमोहन पाटील, बाजीराव कांबळे, जी . एस . पाटील, कागल तालुका अध्यक्ष तुकाराम राजूगडे, एच एन पाटील, रावणसर, सखाराम राजूगडे, आदी उपस्थित होते .

नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांची बेठक संपन्न !


अॅड . अमोल कळसे

उदगीर शहरात उद्या सकाळी 50 वर्षे व त्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तरी उदगीर शहरातील सर्व मौलवी यांची बैठक मा..डाॅ.अरवींद लोखंडे  अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.मा.उपविभागीय अधिकारी मेंगशेटी यांनी मार्गदर्शन केले.

लॉकडाऊन मध्ये भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कंपनी प्लेसमेंट ...

कंदलगाव ता .२७ ,
   भारती  विद्यापीठ  अभियांत्रिकी  महाविद्यालय  कोल्हापूर  येथील  मेकॅनिकल  विभागाच्या  अंतिम  वर्षातील  अकरा  विद्यार्थ्यांची पुणे  येथील  राधेय  इंजिनिअरिंग  वर्क  येथे  हे  प्रशिक्षणार्थी  अभियंता म्हणून  निवड  झाली. 
   सद्य परिस्थितीला कोरोनाचा जो सर्व जगात थैमान चालु आहे, त्यामुळे जिकडे तिकडे आर्थिक मंदीची लाट आलेली आहे, अनेकांना जॉब उपलब्ध नाहीत या पार्श्वभूमीवर आणि  नोकरीच्या  कमी  संधी  असताना  सुद्धा कॉलेजने  विद्यार्थ्यांना  नोकरी  मिळवून  देण्यासाठी  विशेष प्रयत्न  केले.  सदर  कंपनीचा  इंटरव्यू  टेलेकॉन्फरन्सिंग  द्वारे  घेण्यात  आला . 
   संस्थेचे  रिजनल  डायरेक्टर डॉ. एच  एम कदम  व  प्राचार्य  डॉ. विजय आर घोरपडे  यांनी  अभिनंदन  करून  भावी वाटचालीसाठी शुभेच्छा  दिल्या  मेकॅनिकल  चे  विभागप्रमुख  डॉ. सुनील  कदम  तसेच  प्रा. अमित  देसाई  आणि महाविद्यालयाचे  ट्रेनिंग  अँड  प्लेसमेंट  ऑफिसर  प्रा. माणिक  सोनवणे  यांचे  मार्गदर्शन  लाभले.

कंदलगाव सृष्टी पार्क परिसरात मद्यपिंचा वावर वाढला . दारूच्या बाटल्या फोडल्याने जनावरे , शेतकरी जखमी ..

कंदलगाव ता .२७ ,
    एकांत आणि निर्जन परिसर व सध्या बार बंद असल्याने या परिसरात मद्यपिंचा वावर वाढला आहे . गेल्या तीन महिण्यापासून या परिसरात तरुणांची टोळकी संध्याकाळच्या वेळेत आपला राबता वाढवत असून मद्य पिऊन झाल्यावर मद्याच्या बाटल्या रस्त्यावर व शेतात फेकून देतात . या बाटल्या एखाद्या दगडावर आदळल्याने त्या फुटतात त्यामुळे जनावरे व शेतकरी जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत .
      सबंधीत पोलिसांनी या परिसरात आपली गस्त वाढवून स्थानिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे .

गिरगावात शाहू जयंती निमित्त स्वच्छता अभियान ..


कंदलगाव ता .२७ , 
     क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने विद्या मंदिर गिरगांव येथे शाहू जयंती साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज  यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक विठ्ठल शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. 
      कोरोनामुळे गेले कित्येक दिवस शाळाना सुट्टी देण्यात आली आहे.  त्यामुळे शाळेच्या  परिसरात गवत उगवले होते व कचरा पडून होता . क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाड्याच्या मुलानी शाहू जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करत शाळेच्या परिसरातील स्वच्छता केली. 
   यावेळी संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील, भगवन गुरव , मेढे टिचर, काजल पाटील, सानिका जाधव, सानिका पाटील, शिवराज पाटील, पूर्णानंद जाधव, करन देसाई, विराज सरनाईक इत्यादी उपस्थित होते.

फोटो  - गिरगाव येथील विद्यामंदिर परिसराची स्वच्छता करताना क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्थेचे सदस्य .

श्रीकांत तानाजी कांबळे यांची तहसीलदार पदी निवड - - जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते सत्कार


उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे

 उदगीर तालुक्यातील हाळी या गावचे श्रीकांत तानाजी कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत दिलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असुन त्यांची निवड तहसीलदार पदी झालेली आहे. हाळी तालुका उदगीर जिल्हा लातूर या गावचे भूमिपुत्र असून त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या सोबत उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अमर पवार,जिल्हा सचिव सागर बिरादार,विशाल रंगवाळ,  बालाजी भोसले पाटील,दत्ता भोसले, श्रीधर स्वामी,बालाजी गुडेवार,  संग्राम भोसले,रंगनाथ क्षीरसागर,  महेश भोसले,राहुल कोरे,दत्ता भोसले,गणेश वाघमारे,संतोष क्षीरसागर,विकी भोसले आदींसह ग्रामस्थ सामाजिक अंतर राखून  उपस्थित होते.

प्रविण काकडे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी–जिल्हाध्यक्ष प्रा.शंकरराव पुजारी.


कोल्हापूर प्रतिनिधी 

 जिल्हा धनगर समाजाच्या वतीने श्री प्रविण काकडे यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष तर काहींशी फोन द्वारे चर्चा करून पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब , मा.नामदार डॉ. विश्वजीत कदमसाहेब , आमदार पी.एन.पाटील साहेब, आमदार चंद्रकांत जाधव साहेब , आमदार ऋतुराज पाटील साहेब व आमदार राजूबाबा आवळे साहेब यांना  शिष्टमंडळ भेटून  लेखी निवेदन दिले आहे.अशी माहिती ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव  पुजारी यांनी दिली आहे .  
  धनगर समाजाच्या राज्यभर विविध संघटना कार्यरत असून संपूर्ण देशभर कार्य करणाऱ्या "ऑल इंडिया धनगर समाज महासंघ" दिल्ली ,या संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,श्री प्रविणजी काकडे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे संधी देण्यात यावी अशी मागणी  जोर धरू लागली आहे .धनगर समाजातील सर्व स्तरावर त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे . विविध ठिकाणी वस्तीगृहात असणारे व महाविद्यालयात शिकणाऱ्या धनगर समाजातील हुशार गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करून अनेकांना मदत करणारे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे समाजातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून लोकप्रिय बनत गेले . धनगर समाजाच्या आरक्षण लढाईत चळवळीत संपूर्ण देशभर आणि राज्यात अभ्यासपूर्ण व्याख्याना द्वारे समाज जागृती केली .न्यायालयीन लढाईसाठी चालू असलेल्या चळवळीला गट तट  न पाहता पाठिंबा दिला .
 प्रविण काकडे सरांचे हे कार्य नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य संघटनेच्या माध्यमातून देशातील विविध राज्यात सुरू आहे.  दिल्ली, हरियाणा ,गुजरात ,कर्नाटक, गोवा ,अशा ठिकाणी त्यांनी आपले कार्य करत आहेत. महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर विविध ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रविण काकडे सरांच्या कार्याची सुरुवात 1997 पासून झाली आहे. आज पर्यंत कार्यरत असणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे म्हणूनच त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी संपूर्ण राज्यभर जोर धरू लागली आहे .
निवेदनामध्ये धनगर समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील नेते एकत्र  आले आहेत .त्यामध्ये  प्रा. राजेंद्र कोळेकर ,श्री. ओंकार कोळेकर,(पन्हाळा) , सचिन पुजारी , काशिनाथ पुजारी (हातकणंगले) , श्री. महादेव लांडगे , श्री.तानाजी लांडगे ,श्री.आनंदा करपे , श्री.प्रविण करपे (करवीर) , उद्योगपती श्री. निवास वाटेगावकर  (कोल्हापूर), प्रा. मंगेश हजारे , श्री अनिल हजारे ( कागल), नेमिनाथ पुजारी , अजय हराळे (शिरोळ) व कोल्हापूर जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते. 

Friday, 26 June 2020

प्रहार संघटनेतर्फे महाबीज कार्यालयाला फासलं काळं


रजनिकांत वानखडे 
 वाशिम प्रतिनिधी

       महाबीज बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पहिलेच शेतकरी दुष्काळ यामुळे अडचणीत आणि आता त्यात महाबीज सोयाबीन मुळे शेतकऱ्यांना डबल पेरणी करावी लागत आहे.  महाबीज बियाणे 70 टक्के निघालेच नाही.  त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कृषी विभागाने तात्काळ कारवाई करावी.  शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी,  अन्यथा आज फक्त प्रहार संघटनेतर्फे काळे फासण्यात आले दोन-चार दिवसात प्रहार स्टाईलने उग्र आंदोलन सर्व शेतकरी मिशी करू लाँकडॉउन चा कोणताही नियम आम्ही यानंतर पाळणार नाही.  जर शासनाने महाबीज अंकुर रोहित सीड्स या कंपनीवर कारवाई केली नाही तर आंदोलन उभं करून त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन व कृषी विभाग जबाबदार राहील. 
यावेळी वाशिम  जिल्हाध्यक्ष सागर सोलव वाशिम  जिल्हा संघटक विजय शेंडगे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे  मंगेश घुगे रवी घुगे इत्यादी कार्यकर्ते हजर होते. 


रत्नाप्पा कुंभार हायस्कूलच्या शिक्षकांनी उचलला सामाजिक वसा , एक दिवसाच्या पगारातून परिसरातील शाळेना सॅनिटायझर मशीन वाटप ....


कंदलगाव ता . २६ 
     आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी ज्या शाळेतून येतात त्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुस्थितीत व चांगले रहावे . या कल्पनेतून एक समाजशिल उपक्रम हाती घेऊन आर .के. नगर येथील दे .भ. रत्नाप्पा कुंभार हायस्कूल च्या शिक्षकांनी आपल्या पगारातील काही रक्कम बाजूला काढून कंदलगाव विद्या मंदिर व परिसरातील मराठी शाळेना सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले .
 कंदलगाव विद्यामंदिरला सॅनिटायझर मशीन भेट देताना शाळेचे शिक्षक हिंदूराव परीट , मोहन कोळी , कुंभार हायस्कूलचे मुख्याध्यापक आर .बी. पाटील , पर्यवेक्षक बी .वाय.परकाळे , के.पी. कुवर , व्ही .बी .टकले , डी.एस. सागावकर यांचे दक्षता समितीचे सदस्य व शाळा व्यवस्थापनचे सदस्य उपस्थित होते .

फोटो  - कंदलगाव शाळेला सॅनिटायझर मशीन भेट देताना मुख्याध्यापक , शिक्षक व इतर मान्यवर  ..

( छायाचित्र - प्रकाश पाटील )

विद्यामंदिर कंदलगाव येथे छ .शाहू जयंती साजरी ..

 कंदलगाव ता .२६ ,

       येथील विद्यामंदिर शाळेत दक्षता समितीचे सदस्य विलास कांबळे यांच्या हस्ते  छ . शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालणेत आला .
    यावेळी शाळचे शिक्षक हिंदूराव परीट , मोहन कोळी यांचे सह शाळा व्यवस्थापन सदस्य नृसिंह पाटील , प्रमोद खोत तसेच दक्षता समितीचे संस्थापक अशोक पुंदिकर व विद्यार्थी हजर होते .

उदगीर शहर भारतीय जनता पार्टी तर्फे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


उदगीर प्रतिनिधी :- गणेश मुंडे 
 उदगीर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची उदगीर शहर भाजपाच्या वतिने विनम्र अभिवादन करून जयंती साजरी केली.जाती व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुत्व ही मूल्ये रुजवणारे थोर समाजसुधारक,#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 
उदगीर शहर भारतीय जनता पार्टी तर्फे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. गोविंद केंद्रे,भगवान दादा पाटील तळेगावकर,लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज  बागबंदे,  उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, पं. स. सभापती  विजय कुमार पाटील,  शहराध्यक्ष उदय सिंह  ठाकूर, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, दिलीप मजगे, पंडित सुकणीकर, सावन पस्तापुरे, आनंद भोसले, विशाल रंगवाळ, नगरसेवक मनोज पुदाले, राजकुमार मुक्कावार,  दत्ता पाटील,  शहाजी पाटील,  गणेश गायकवाड,पप्पू गायकवाड,  नरेश सोनवणे, रामेश्वर पवार, आनंद बुंदे, आनंद साबणे, श्यामला ताई कारामुंगे,मधुमती कनशेट्टे, जीवने मॅडम,आदी पदाधिकारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.