हेरले / प्रतिनिधी
दि.21/12/20
मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत यांचेवतीने देण्यात येणारा
"सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
२०२० " विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉक्टर केदार विजय साळूंखे यास माजी खासदार राजू शेट्टी ,भारत कुस्ती संघाचे सभापती डी.आर जाधव.व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम इचलकरंजीमध्ये संपन्न झाला .
विश्र्व विक्रमवीर डाॅ.केदार साळुंखे यांने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत स्केटींग व सायकलिग मध्ये १४विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ केदार यास वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरेट इन ॲथलेटीक्स ही पदवी देऊन द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू यांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामधे गाेल्ड वीस , सिल्वर सोळा , ब्राँझ पंधरा पदकासह अन्य बक्षिसे हि मिळवली आहेत
मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत यांचेवतिने देण्यात येणारा
"सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
२०२० " क्षेत्रातील नवीन उंची गाठण्यासाठी केलेली कठोर परिश्रम, समर्पण आणि आवेश ओळखण्यासाठी व भवितव्य घडविण्यासाठी उपयाेगी पडणार आहे.डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुलच्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर, प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
फोटो
भारत कुस्ती संघाचे सभापती डी आर जाधव डॉ.केदार साळुंखेस पुरस्काराने सन्मानित करतांना.