कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.31/12/20
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीत सन २०२० चे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
यामध्ये चंद्रकांत मिठारी ( दै.महासत्ता व्यवस्थापक ) यांना जीवन गौरव पुरस्कार, राजू पाटील ( दैनिक पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मिडिया, विजय केसरकर (एबीपी माझा) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया, दगडू माने ( दैनिक पुण्यनगरी ) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार व निवास कांबळे यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
याशिवाय तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार - चंदगड - लक्ष्मण व्हन्याळकर ( तरुण भारत ), आजरा - विकास सुतार ( महासत्ता ), गडहिंग्लज - गणेश बुरुड ( सकाळ ), भुदरगड - शैलेंद्र उळेगड्डी ( पुण्यनगरी ), राधानगरी - रवींद्र पाटील ( पुढारी ), शाहुवाडी - श्रीमंत लष्कर ( पुढारी ), करवीर दक्षिण विभाग - राम पाटील (एस न्यूज ), करवीर उत्तर विभाग - सतीश पाटील ( तरुण भारत ) हातकणंगले पश्चिम विभाग - संतोष सणगर ( तरुण भारत ), हातकणंगले पूर्व विभाग - सुहास जाधव ( लोकमत ), पन्हाळा पश्चिम विभाग धनाजी पाटील ( सकाळ ), पन्हाळा पूर्व विभाग - संजय पाटील (सकाळ),कागल मुरगूड विभाग -प्रकाश तिराळे ( सकाळ),कागल विभाग-सागर लोहार ( तरुण भारत ),शिरोळ-निनाद मिरजे (पुण्यनगरी),हातकणंगले दक्षिण विभाग - संजय साळुंखे ( पुढारी )
पुरस्कार वितरण समारंभ दहा जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीस अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, अॅड. प्रशांत पाटील, प्रा.भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रा.रवींद्र पाटील ,अतुल मंडपे, सुरेश कांबरे, भाऊसाहेब सकट, विवेक स्वामी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.