हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.1/1/21
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव येथील श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रमामध्ये मंगळवार दि.५ रोजी श्री सद्गुरु निरंजन महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी व शारदामाता जयंती निमित्त आश्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सुर्योदय ७:१४ वा. 'श्री' चे पादुकांना अभिषेक सकाळी ८ ते ९ नोंदणी व चहापान,
सकाळी ९ ते ११ भजन : श्री भजनी मंडळ, हेरले सकाळी ११ते १२ प्रवचन : परमार्थभूषण ह.भ.प.श्री. नारायण महाराज एकल,जोगेवाडी.
दुपारी १२ ते १२:१५ श्री सद्गुरु निरंजन महाराज पुण्यतिथी सोहळा.
श्री शारदामाता जयंती : फोटोपूजन व पुष्पअर्पण स्वामीभक्त पूज्य श्री नंदुआण्णा माणगांवकर यांच्या अमृत हस्ते,
दुपारी १२:१५ ते १:१५ : प्रवचन : ह.भ.प.श्री. अनंत कुंभार महाराज, बुधगाव, सांगली.
दुपारी १:१५ ते १:३० : सत्कार समारंभ
दुपारी १:३० ते ३:३० : महाप्रसाद
दुपारी ३.३० ते भजन : श्री माऊली महिला भजनी मंडळ,हमिदवाडा
सायं. ५ ते ६ : प्रवचन : ह.भ.प.श्री. अशोक पाटील कौलवकर सुर्यास्त व आरती होईल
या सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.