हेरले / प्रतिनिधी
दि.3/4/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे शासनाच्या जमीन आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत गावच्या जमिनीतील अन्नद्रव्य घटक तपासणी तक्त्याचे अनावरण करण्यात
आले.आणि त्यासंबंधी माहिती सांगण्यात आली.
या तक्त्यानुसार निरनिराळ्या पिकाच्या आवश्यक खत मात्रा ठरवता येतात, खताचे योग्यप्रकारे नियोजन करता आले तर उत्पादनात कमालीची वाढ होते. शेतकरी बंधूंना या तक्त्याच्या बोर्डद्वारे आपल्या शेतीतील विविध उत्पादनासाठी खत मात्रा किती दयावी याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या फ्लेक्स अनवरणावेळी उपसरपंच सतीश काशिद , माजी उपसरपंच राहुल शेटे , ग्रामपंचायत सदस्य बटुवेल कदम, निलोफर खतीब, मजीत लोखंडे ,कृषिमित्र सयाजी गायकवाड, ग्रामसेवक संतोष चव्हाण, कृषी सहाय्यक राहुल पाटील व शेतकरी उपस्थित होते.
फोटो
हेरले : शासनाच्या जमीन आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत गावच्या जमिनीतील अन्नद्रव्य घटक तपासणी तक्त्याचे अनावरण करतांना मान्यवर.