पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.5/4/21
वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावमध्ये मुली व महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले.
वडगाव विद्यालय जुनिअर कॉलेज वडगावमध्ये श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाऊंडेशन यांच्या अंतर्गत नारी सिद्धी फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने मुली व महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात नारी सिद्धी फाऊंडेशनच्या संचालिका सुवर्णा बोडके, राधिका निकम, सुजाता पोतदार आदी मान्यवरांनी महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरची विविध कारणे व त्यावरील उपाय या संदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले.
या शिबिरासाठी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.मंजिरी अजित मोरे देसाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी मुख्याध्यापक आर.आर.पाटील उपमुख्याध्यापक एस.डी.माने, पर्यवेक्षक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार आदी मान्यवरासह विद्यालय व महाविद्यालयातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. सूत्रसंचालन एस.ए. पाटील यांनी केले. आभार अध्यापिका एस. आर. पाटील यांनी मानले.
फोटो
पेठवडगांव:मुलींना व महिलांनाआरोग्य शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना सुवर्णा बोडके शेजारी राधिका निकम सुजाता पोतदार व अन्य मान्यवर.