कोल्हापूर मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूर
शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871
कोल्हापूर: एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात टिकण्यासाठी व राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11, बावडा कोल्हापूर होय. या शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाली. ही शाळा पूर्वी श्री लक्ष्मी विलास पॅलेस कॅम्प कसबा बावडा मध्ये घोड्याच्या पागेत सुरुवात करण्यात आली होती असे पूर्वीच्या रेकॉर्डवर दिसून येते या शाळेचा शताब्दी महोत्सव 3 :2:1975 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई प्राचार्य आमदार एन डी पाटील, आयुक्त द्वारकानाथ कपूर, शिक्षण सभापती हिंदुराव साळुंखे, कार्याध्यक्ष बा द पाटील तेव्हाचे मुख्याध्यापक विश्वास जोदाळ यांच्या पुढाकाराने नवीन वास्तूत शाळा बांधण्यात आली होती.
या शाळेत पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील अडव्होकेट पंडित आळवेकर, शामराव पाटील , बबन पिसाळ, प्रकाश जाखलेकर, भगवान चौगले, तसेच या शाळेमध्ये इंजिनीयर, वकील, डॉक्टर, शासकीय सेवेमध्ये, आदर्श शेतकरी असे कितीतरी यशस्वी व देशासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य या शाळेने केले आहे.या शाळेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी सामान्य कुटुंबांमधील आहेत कष्टकरी, मोलमजुरी करणारे, शेतकरी वर्गातील विद्यार्थी आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज मैदान सुंदर शालेय परिसर, संगणकीय शिक्षण, शाळेमध्ये प्रथमच नेस्ट एज्युकेशन दिल्ली यांच्यामार्फत पहिली ते सातवी तील विद्यार्थ्यांच्यासाठी डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आला आहे. शालेय विविध स्पर्धांच्या माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धा, कवायत स्पर्धा,भाषण स्पर्धा, एमटीएस, भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, तसेच सामाजिक राष्ट्रीय प्रश्नावर समाज प्रबोधन करण्यासाठी विविध प्रश्नावर पथनाट्य सादर करण्यात येतात. त्यामध्ये मुलींचे शिक्षण, साक्षरता अभियान , स्वच्छता अभियान, ध्वनी प्रदूषण ,हवा प्रदूषण ,मतदार राजा जागा हो ,पल्स पोलिओ मोहिम, महा स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी इत्यादी पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन करण्यात येते.
मुलींच्या शिक्षणासाठी मीना मंचच्या माध्यमातून किशोरी मेळावा आयोजित करण्यात येतो त्यामध्ये महिलांच्या साठी व मुलींच्या साठी महिला डॉक्टरांची विशेष मार्गदर्शन देण्यात येते. यामधून मुलींना स्वसंरक्षणासाठी आपण सक्षम कसे पाहिजे हे दाखवून दिले जाते.
दर वर्षी एक मे ते पाच मे या दिवशी शाहू संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते या शिबिरामध्ये योगासने, ध्यान धारणा लाठी काठी, शुद्धलेखन ,कूट प्रश्न,इंग्रजी स्पष्ट वाचन बौद्धिक खेळ , अराबिक्स सूर्यनमस्कार,गणित कार्यशाळा, ध्यानधारणा , कागदी पिशव्या बनवण्याची कार्यशाळा , शुद्ध हस्ताक्षर कार्यशाळा , मनशांती तसेच पुस्तक वाचनातून प्रभावी व्यक्तिमत्व विकास कसे असावे या बद्दल दररोज तज्ञांचे आयोजन करण्यात येते.
शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या साठी शिष्यवृत्ती, समाज कल्याण शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, उत्कृष्ट पोषण आहार, दुरच्या विद्यार्थ्यांच्या साठी के एम टी मोफत पास योजना, यासारख्या सुविधा मोफत देण्यात येतात.
हे सर्व शैक्षणिक उपक्रम सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार, सुशील जाधव, सुजाता आवटी, तमेजा मुजावर ,आसमा तांबोळी विद्या पाटील सेवक हेमंत कुमार पाटोळे ,मंगल मोरे तसेच बालवाडीचे शिक्षिका कल्पना पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सतत कार्यरत असतात शाळेतील नवीन उपक्रमांवर भर दिल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, भाषण स्पर्धा ,ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा तसेच यावर्षी नेस्ट एज्युकेशन यांनी पावणेचार लाख रुपयांची डिजिटल क्लासरूम बसवलेली आहे त्यामध्ये 1 ली ते 7 च्या सर्व विषय आहेत. कसबा बावडा मधील सामाजिक मंडळे शाळेला सतत मदत करतात त्यामध्ये भारतवीर मित्र मंडळाने आमच्या शाळेला यावर्षी दहा खुर्ची, चार कुंड्या व रोपे तसेच किसान बिल्डर चे मित्र रज्जाक तांबोळी यांनी पहिली वर्गासाठी मोफत खुर्च्या दिलेले आहेत. सनराइज् रोटरी क्लब कोल्हापूर यांनी शाळेसाठी हॅन्ड वॉश स्टेशन, शनिटायझर स्टॅन्ड, दीडशे मास्क, स्टेरिओ बॉक्स, व्हाईट बोर्ड, कॉर्डलेस माइक, भेट दिलेले आहेत.
शाळेच्या प्रभागातील नगरसेविका माधुरी संजय लाड यांनी अथक प्रयत्नातून दहा लाखापर्यंत चा निधी समग्र अभियानातून शाळेसाठी भौतिक सुविधा देवून शाळा सुसज्ज करून ठेवलेले आहेत. त्यामुळे शाळेचा परिसर सुसज्ज व नैसर्गिक परिसर असल्यामुळे समाधानाचे वातावरण दिसून येते तसेच वंचित घटकासाठी दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे कार्य सर्व शिक्षक पालक माजी विद्यार्थी करत आहेत.
शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रेरणा देणारे ज्या शाळेत पहिली ते सातवी शिकलेले विद्यार्थी अजितकुमार पाटील हे या शाळेचे सध्याचे केंद्रमुख्याध्यापक पदावर काम करत आहेत. त्यांनी विविध पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण जागृती प्लास्टिक बंदी ,पाणी वाचवा जीवन वाचवा ,पक्ष्यांसाठी घरटी, ध्वनि प्रदूषण, विज्ञान शिबिर, शुद्धलेखन कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, या विविध शैक्षणिक उपक्रमातून व माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांचा शैक्षणिक पट पाहिला असता त्यांचे प्राथमिक शिक्षण राजर्षी शाहू या शाळेमध्ये झालेले आहे, माध्यमिक शिक्षण छत्रपती राजाराम हायस्कूल कसबा बावडा येथे झाली आहे, महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शहाजी कॉलेज दसरा चौक येथे झालेली आहे. तसेच एम ए मराठी, एम ए इतिहास, एम ए समाजशास्त्र, एम ए शिक्षण शास्त्र, एम एड शिक्षण शास्त्र, मास कम्युनिकेशन, याच वर्षी त्यांनी मराठी विज्ञान साहित्यावर पीएच डी संपादन केलेली आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत 119 चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी 12 आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये, 45 राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंध मराठी, इतिहास, पर्यावरणशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र भूगोल, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, हिंदी, यादे विविध विषयावर शोधनिबंध सादर केलेले आहेत.62 बेबीनार मध्ये भाग घेतलेला आहे, चार पुस्तके, अठरा वैचारिक लेख, दोन हस्तलिखित,तेरा प्रश्नमंजुषा स्पर्धा
ह्या प्रकारे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समग्र साहित्याचे दर्शन दिसून येते. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळेतील एक प्राथमिक विद्यार्थी याच शाळेत पहिली ते सातवी शिक्षण घेतलेला, तो विद्यार्थी त्याच शाळेत मुख्याध्यापक होऊन आपल्या शाळेतील शाहू बाल संस्कार घेऊन मराठी विषयातील पीएच डी धारक धारक बनलेला आहे, ही बाब प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरला महानगरपालिकेच्या इतिहासातील गौरवास्पद अभिनंदनीय बाब घडलेली आहे.
एकूणच शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील शिक्षकांनी राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजुषा, महात्मा गांधी प्रश्न मंजुषा, ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा, यासारख्या ऑनलाइन व ऑफलाइन, अभ्यासाचा वापर करून कोरोना काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.
प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली शाळा दर्जेदार ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षक वृंद करत आहेत.
"विद्यार्थी हेच दैवत" हे ब्रीद वाक्य मानून शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील, इंग्रजी पदवीधर शिक्षक उत्तम कुंभार, टेक्नोसॅवी शिक्षक सुशील जाधव, ॲप निर्मिती चे धडे देणारे तमेजा मुजावर, गणिततज्ञ आसमा तांबोळी, मीना मंचच्या सुजाता आवटी, व्हिडिओ निर्मिती करणारे शिवशंभु गाटे,स्कॉलरशिप तज्ञ विद्या पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेवक पाटोळे मामा, मोरे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, भारतवीर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक वृंद यांचे सहकार्यातून हे ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदर्श नागरिक घडवत आहे.
2 comments
Write commentsVery nice.
ReplyVery nice.
Reply