हेरले / प्रतिनिधी
दि.28/4/21
हेरले ( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व कोरोना संनियंत्रण समितीच्या वतीने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत गावामध्ये कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी कडक नियमांचे पालन सुरू आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बुधवारी दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हेरले येथे सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये औषध दुकाने व दवाखाने सुरू असतात.मात्र माळ भागावरील एक मिरची व्यापारी नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्या व्यापाऱ्यास पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. तसेच गावामध्ये विनामास्क फिरणारे, भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांनाही दंड आकारण्यात आला. बुधवार रोजी दंडात्मक कारवाई करून एकूण सहा हजार रुपयांची वसूली करण्यात आली. ब्रेक द चेन या शासन मोहिमेत
हातकणंगले पंचायत समिती व्हिजीट कृषी अधिकारी कारवेकर , मंडल अधिकारी भारत जाधव, तलाठी बी. एस. बरगाले, पोलिस पाटील नयन पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , सरपंच अश्विनी चौगुले ,उपसरपंच सतिश काशिद, दादासो कोळेकर , राहूल निंबाळकर आदी कर्तव्य बजावत आहेत. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिली.