कोल्हापूर दि 5 : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मास्क आणि 111 पेन वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब होते. प्रमुख मान्यवर उपस्थित मध्ये शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, सुनील गणबावले, राजेंद्र पाटील, दत्तात्रय डांगरे, प्रमोद गायकवाड, संजय पोवाळकर, तानाजी इंदुळकर, उत्तम कुंभार, अभिजीत शिंगाडे, जोतीबा बामणे, प्रदीप पाटील, तानाजी पाटील इत्यादी होते.
प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांनी एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात टिकण्यासाठी व राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11, बावडा कोल्हापूर होय. या शाळेमध्ये आज मास्क वाटप व पेन वाटप कार्यक्रम घेतलेला आहे तो अत्यंत विद्यार्थ्यांना उपयोगी असा आहे कोरणाकाळामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षतेसाठी शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी मास्क व पेन वाटप हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा घेतलेला आहे शासनाच्या नियमानुसार पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू आहेत. सोसल डिस्टन्स चा वापर काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आत्मसात करावे व जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे बाजारातून जात असताना येत असताना बाहेर पडताना सॅनिटायझर व मास्कचा जरूर वापर करावा. बाजारातुन व बाहेरून घरी आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे व आपले वैयक्तिक कपडेसुद्धा सुरक्षित ठेवावेत असे प्रतिपादन केले
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना ऑफलाइन अभ्यासक्रम व ऑनलाइन अभ्यासक्रम यांची थोडक्यात माहिती दिली व आपल्या अभ्यासाबरोबरच आरोग्याची सुद्धा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आपण एकमेकाला समर्थपणे साथ देणे अत्यंत गरजेचे आहे कारण भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून संस्कारावर अवलंबून आहे रूढी,परंपरा ,चालीरीती या सर्व आपण टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभु गाटे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक माहिती मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, नीलम पाटोळे,सोनाली जामदार, राजू लोंढे,दिपाली चौगले,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर सर इत्यादी उपस्थित होते.
भारतवीर मित्र मंडळाचे राहुल भोसले,राजू चौगले, सचिन चौगले,विलास भोसले, विलास चौगले, शैलेश पिसाळ, शुभम चौगले इत्यादींनी कार्यक्रम संपन्नत्तेसाठी सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार उत्तमराव कुंभार यांनी मानले
प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई ,बाळासाहेब कांबळे यांच्या सहकार्याने शाळा दर्जेदार ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षक वृंद करत आहेत.
"विद्यार्थी हेच दैवत" हे ब्रीद वाक्य मानून शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील, इंग्रजी पदवीधर शिक्षक उत्तम कुंभार, टेक्नोसॅवी शिक्षक सुशील जाधव, ॲप निर्मिती चे धडे देणारे तमेजा मुजावर, गणिततज्ञ आसमा तांबोळी, मीना मंचच्या सुजाता आवटी, व्हिडिओ निर्मिती करणारे शिवशंभु गाटे,स्कॉलरशिप तज्ञ विद्या पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेवक पाटोळे मामा, मोरे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, भारतवीर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक वृंद यांचे सहकार्यातून हे ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदर्श नागरिक घडवत आहे.