हेरले / प्रतिनिधी
जेईई मेन्स परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी ने घवघवीत यश संपादन केले.अकॅडमीच्या पंधरा विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळवून जेईई सीईटी आणि नीट परीक्षा मधील उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.
भक्ती पाटील 99.94 तनिष्क चिरमे (99.89 ) हर्षल पाटील (99.79) दुर्वेश गांगण (99.69) आदित्य बोराटे (99.66) स्वातम दोशी (99.64) विवेककुमार सिंग (99.64) शिवतेज घाटगे (99.55) शंतनू बेनके (99.55) युवराज पवार (99.54) मिहीर सहस्त्रबुद्धे (99.50) वैष्णवी मोरे (99.31) शुभम पाटील (99.20) चारुता कराड (99.14) प्रणव मगदूम (99.9).
वरील सर्व विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळविल्याबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालक श्रीनिवास (वासू) कोंडूती, यशस्वी विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले आहे.