हेरले / प्रतिनिधी
हेरले चर्मकार समाजाच्या विकास कामासाठी लागणारा निधी समाजास मिळवून देण्यास शासन दरबारी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन जिल्हा नियोजन कमिटी सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. ते हेरले (ता. हातकणंगले) येथील चर्मकार समाज मंदिरामध्ये संत रोहिदास जयंती निमित्त सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
डॉ. अशोकराव माने पुढे म्हणाले की संत रोहिदास यांनी सामाजिक समतेचा संदेश देऊन सामाजिक समता निर्माण होण्यासाठी कार्य केले. राष्ट्रपुरुषांनी आपल्या स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजासाठी कार्य केले म्हणून समाजाची उन्नती झाली. म्हणून आपण सर्वांनी संताच्या व राष्ट्र पुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजासाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहूया. जिल्हा नियोजन कमिटी सदस्य या माध्यमातून चर्मकार समाजास विकास निधी देण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहणार असे आश्वासन दिले.
सरपंच राहुल शेटे म्हणाले समाजामध्ये एकता असल्यास निश्चितच समाज उपयोगी कार्य सर्वांकडून होत असते. हेरले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चर्मकार समाजास विकास निधी व समाजकल्याण विभाग कोल्हापूरच्या माध्यमातून समाजबांधवांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे मत व्यक्त केले.
स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधाकर निर्मळे यांनी केले.
प्रथमतः दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या मुर्तीस पुष्पाहार अर्पण करून आर्ती करण्यात आली तसेच त्यांचा सत्कार पोपट जाधव व आनंदा गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सरपंच राहूल शेटे ,उपसरपंच महंमदबख्तियार जमादार , ग्रामपंचायत सदस्य राकेश जाधव, विजय भोसले, अमित पाटील, अर्जुन पाटील, मनोज पाटील, हिरालाल कुरणे, श्रीमती उर्मिला कुरणे, सविता पाटील, शुभांगी चौगुले, रंजना माने, वनिता खाबडे आदी नुतन सदस्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. अमोल राजमाने, पापा जाधव, पोपट जाधव, संजय जाधव, गोरखनाथ जाधव, आनंदा गवळी, मारुती जाधव, कुमार जाधव, सचिन जाधव, पिंटू जाधव, प्रमोद जाधव, दीपक सोनवणे, विपुल गवळी, ऋषिकेश जाधव, अनिकेत जाधव, आशिष जाधव, दीपक जाधव, हर्ष जाधव, सुमित जाधव, मंथन जाधव, सतीश जाधव,अभिषेक जाधव, केदार जाधव,अंकुश जाधव,महेश जाधव
संस्कार जाधव,निखिल जाधव
सुजल जाधव,ओंकार जाधव,अभिषेक निर्मळे,शुभम सोनवणे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
फोटो
हेरले : येथील चर्मकार समाज मंदिरात कार्यक्रम प्रसंगी बोलतांना दलितमित्र
डॉ. अशोकराव माने बोलतांना शेजारी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच महंमदबख्तियार जमादार, अमित पाटील, विजय भोसले, अर्जुन पाटील राकेश जाधव व अन्य मान्यवर.