हेरले /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य विभाग जि.प.कोल्हापूर व ट्यूलिप हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे.
या शिबिरामध्ये फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ ,होमिओपॅथी तसेच आयुर्वेद तज्ञ व अस्थिरोग तज्ञ तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करण्यात येणार आहे .यामध्ये रक्त लघवी- सीबीसी शुगर ,एचआयव्ही हिपॅटीस बी, सिरम कॅल्शियम व थायरॉईड तपासणी, ई.सी.जी. (कार्डिओग्राम ) व इतर जनरल तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ हेरले परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र हेरलेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.
याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जागरूक पालक तर सुरक्षित बालक या मोहिमेचे उद्घाटन हेरले सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये शून्य ते अठरा वर्षे पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्य कक्षेतील सर्व बालकांची शालेय स्तरावर अंगणवाडी स्तरावर पथकांच्यामार्फत तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत व दुर्धर आजारी मुलांना संदर्भ सेवा दिली जाणार आहे