हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगावातील युवकांनी कुस्ती क्षेत्रामध्ये गतवैभव प्राप्त करून दयावे तसेच शालेय शिक्षणा बरोबर कुस्तींचे धडे अंगीकारावे असे उदगार उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांनी काढले ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील जय हनुमान तालीम मंडळाच्या उद्घघाटनप्रसंगी बोलत होते.
गेले काही दिवस जय हनुमान तालीम बंद आवस्थेत होती . परंतू काही युवा कुस्ती शौकिनांच्या इच्छा शक्ती मुळे व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या तालमीची स्वच्छता करण्यात आली असून जुन्या काळातील वस्ताद बाळासो थोरवत, बाबासो सावंत ,धोंडिबा हजारी, जहांगीर हजारी, यांच्या सारखे जुने जानकार मल्ल तालमीत येणाऱ्या नवीन मल्लांना जोर ,बैठका , तसेच कुस्तीचे धडे देत त्यांच्या कडून सराव करवून घेत आहेत. तालमीच्या उद्घघाटनाच्या पहिल्याच दिवशी १६ मल्लांनी आपला सहभाग नोंदविला असून तब्बल १० ते १२ वर्षांनी या तालमीत शडूंचा आवाज घुमू लागला आहे. त्यामुळे गावातील कुस्ती शौकिना मध्ये आनंद व्यक्त होत आहे.
या उद्घघाटन प्रसंगी सरपंच प्रतिनिधी अविनाश पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले , रघूनाथ गोरड , अँड विजय चौगुले ,जयवंत चौगुले , ज्ञानेश्वर सावंत , संदिप नलवडे , अमोल झाबरे,अभिजीत थोरवत , तौफिक हजारी ,महादेव चौगुले ,रवि रेडेकर , अविनाश सावंत , विनायक शेंडगे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौकट
जुन्या काळामध्ये कौटूबिंक परस्थिती हालाकीची असतांना सुद्धा पंचक्रोशीतील जत्रा यात्रामध्ये निकाली कुस्त्या करून गावाचे नाव उज्वल केले तसाच वारसा नवीन मल्लांनी चालवावा हि अपेक्षा
वस्ताद पै . बाळासो थोरवत
चौकट
गावातील युवकांनी कुस्ती क्षेत्राकडे वळावे ध्येय निश्चित करूण मेहनतीच्या व कष्ठाच्या जोरावर कुस्तीमध्ये आपले नाव उज्वल करावे आडचणीचा काळामध्ये सर्व पैलवानांना माझे सहकार्य मिळेल .
वस्ताद पै . बाबासो सावंत
फोटो
जय हनुमान तालमीचे उद्घघाटन प्रसंगी कुस्ती लावतांना पै . बाळासो थोरवत व ग्रामपंचायत पदाधिकारी .