कोल्हापूर / प्रतिनिधी
१४ मार्चपासून जुनी पेन्शन योजना शासनाने त्वरीत मान्य करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासकिय व निम शासकिय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक समन्वय समिती यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपातून कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही.
असा निर्धार शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत व्यक्त करण्यात आला. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते.मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात ही सभा संपन्न झाली.
महाराष्ट्रात सदरचा संप अत्यंत यशस्वीपणे व्यापक प्रमाणात सुरू असतांना यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत. म्हणून अशा घटकां विरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.
जिल्ह्यातील काही शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून सदरच्या शाळेच्या संस्था चालकांना शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी भेटून त्यांना संपात सहभागी होण्याबाबत विनंती करतील. जुनी पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची भविष्यात पेन्शन कमी किंवा बंद होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन जुन्या पेन्शन योजनेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी असलेच पाहिजे असे ठरले. संप मोडून काढण्यासाठी संपात सहभागी झाल्या बद्दल कारवाई करणार अशा प्रकारच्या नोटीसा शिक्षण विभागाने दिल्यास त्यांना कोणतेही उत्तर देऊ नये असे सर्वानू मते ठरले. मध्यवर्ती समन्वय समितीचा संपाबाबतचा निर्णय अंतिम असेल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, राजाराम वरुटे, बी.जी. बोराडे,बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, प्रा.सी.एम. गायकवाड, भरत रसाळे,पी.एस. हेरवाडे, शिवाजी माळकर, बी. डी. पाटील, इरफान अन्सारी, अशोक हुबळे, उमेश देसाई, सुधाकर सावंत, राजेश वरक, अनिल चव्हाण, मनोहर जाधव, संदीप पाथरे, वर्षा पाटील मिलींद पांगिरे आदीसह विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत मार्गदशन करतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादा लाड, सुरेश संकपाळ अन्य मान्यवर.