हेरले / प्रतिनिधी
श्री जयभवानी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; पेठवडगांवच्या शाखा
हेरलेच्या समिती सदस्य पदावर सलीम खतीब व बाळासाहेब थोरवत यांची निवड नुकतीच झाली आहे.
श्री जयभवानी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी हेरले शाखेच्या प्रगतीमध्ये सलीम खतीब व बाळासाहेब थोरवत
यांचे मोलाचे सहकार्य व सहभाग लाभला आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची शाखा समिती सदस्य पदी निवड
संस्थेचे चेअरमन विलासराव सलगर व जनरल मॅनेजंर राजकुमार पोळ यांनी नुकतीच केली आहे.
त्यांच्या निवडीमध्ये हेरले शाखा चेअरमन आप्णासो चौगुले, शाखा समिती सदस्य संभाजी भोसले,आप्पासो चौगुले, शाखा मॅनेजंर जगदीश लोळगे, लिपीक अरविंद दिंडे यांचे सहकार्य लाभले आहे.