हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता . हातकणंगले) येथील विद्यामंदिर या प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले शाळेतील अंगणवाडीतील लहान मुलांपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक , धार्मिक ,प्रबोधनपर, तसेच चित्रपटांच्या गितांचे सादरीकरण केले. यावेळी अंगणवाडीतील बालचमूंनी कला सादर करून मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पालक ग्रामस्थ आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतूक केले.
यावेळी शिरोली पोलिस स्टेशनचे सपोनि सागर पाटील म्हणाले ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकाअधिक अभ्यास करून शाळेचे नाव उज्वल करावे असे मत व्यक्त करून शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी त्यांच्या हस्ते व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तालूकास्तरिय व जिल्हास्तरिय खेळात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. सपोनि सागर पाटील यांनी शाळेस भेट दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच व्यासपीठावरिल सर्वच मान्यवरांचे स्वागत व सत्कार पार पडले.
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , सपोनि सागर पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश कांबरे ,स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड ,शालेय समितीचे अध्यक्ष संतोष मोरे , मुख्याध्यपक आप्पासो पाटील , रघूनाथ कुंभार, ग्रा. पं . सदस्या सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार ,दिपाली तराळ , यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक योगेश पाकले यांनी केले सुत्रसंचालन फिरोज मुल्ला यांनी केले तर आभार देवदत्त कुंभार यांनी मानले .
फोटो
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करतांना सपोनि सागर पाटील व अन्य
मान्यवर .