शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र एकोणीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे हेरले हायस्कूल हेरले (ता हातकणंगले) या विद्यालयातून २००३-०४ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले . आणि तब्बल एकोणीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा रविवारी अनुशाम मंगल कार्यालय येथे अभुतपूर्व उत्साहात पार पडला. यामध्ये इंजिनियर,वकील,उद्योजक,उत्कृष्ठ खेळाडू अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक महादेव डांगे,अंबाजी कोळेकर, महंमद आटपाडे,फत्तेलाल देसाई,गोविंद आवळे,सुनंदा पाटील,मोहिनी करमरकर, बी जे पाटील,बी एस पाटील,बी आर हुजरे,उदय पाटील, या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोमनाथ भोसले,सुरज पाटील,कैलास माने,अझर पटेल,सुशांत पाटील,प्रवीण कोरेगावे, विजय पाटील,दिग्विजय जाधव,अजित मुंडे,रुपेश चौगुले, संताजी खाबडे, कैश जमादार, गणेश धुळे,युवराज कोळेकर,रुपेश चौगुले,दीपक कराळे, चंद्रकांत काशीद,अश्विनी मिरजे,वृषाली गडकरी, अनघा जोशी,ज्योती कोरवी, सुप्रिया आलमान तसेच यावेळी अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.प्रास्तविक विजय पाटील, सुत्रसंचालन सुरज पाटील तर आभार कैलास माने यांनी मानले.
फोटो :
हेरले (ता.हातकणंगले)येथील हेरले हायस्कूल हेरले येथे सन२००३-०४ च्या एस एस सी बॅचच्या माजी विध्यार्थ्यांनी १९ वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करण्यात आला.