हेरले /प्रतिनिधी
पारंपारिक व सांस्कृतिक आठवणीना उजाळा देत विविध कलागुणांचे प्रदर्शन आशा विविध उपक्रमाने मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व महिला बचत गटांच्या वतीने महिला महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूण्या म्हणून जि. प. च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी कार्यकमाच्या मार्गदर्शिका व ग्रामसेविका भारती ढेंगे - पाटील यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन करुण विविध कलागुणांचे महत्व पटवून दिले. यामध्ये देशी गायीची ओटी भरण, महिला रक्तदान शिबिर, नेत्रदान चळवळ, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, गरोदर माता ओटी भरणी, आशा विविध उपक्रमांनी तसेच स्पर्धेमध्ये माता पालकांनी आपला उस्पूर्त सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. त्या नंतर बक्षिस वितरण मान्यवरांच्या व उपस्थितांच्या हस्ते पार पडले. हा कार्यक्रम उत्तम रित्या यशस्वी होणासाठी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्पप्नील चौगुले, रघूनाथ गोरड , सुनिता मोरे, सविता सावंत, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , डॉ. पंकज पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच महिला बचत गटांचे मोठे सहकार्य मिळाले.
फोटो
महिला महोत्सव कार्यक्रमात देशी गायीची ओटी भरतांना महिला व मान्यवर.