प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका
राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र११,कसबा बावडा कोल्हापूर मध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ता इनर व्हील क्लब ऑफ सनराईज अध्यक्ष मनीषा जाधव,स्मिता खामकर,यांच्या हस्ते व केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, सुनिल पोवार,अभिजित मगदूम, शामराव कदम,सचिन चौगले,राजू चौगले, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले .
भारतविर मित्र मंडळाचे सचिन चौगले, सुनील पोवार,अजय बिरणगे, अनिकेत चौगले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,इनरव्हील सनराईजचे सुरेखा जाधव,मयूरा खोत,दिव्या घाटगे,पालक संघ सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी , भागातील नागरिक , पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
15 ऑगस्ट निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना वृषाली बाड मॅडम यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.तसेच त्यांनी 2 री ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी स्पिकिंग पुस्तके दिली .
बालवाडी ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी, पंडित नेहरू,झाशीची राणी,क्रांतिकारक,वीर जवान, इत्यादी वेशभूषा परिधान केला होता.शाळेचे माजी विद्यार्थी शामराव कदम,अभिजित मगदूम यांची कोल्हापूर जिल्हा असोसिएशनमध्ये संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.आदर्श माता पालक यांचा सत्कार करण्यात आला .
अष्टविनायक रिक्षा मित्र मंडळ च्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल हातरुमाल वाटण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले , तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली , मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्राण शपथ व शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले.
शेवटी विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यामार्फत जिलेबी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात .
सूत्रसंचालन आदिती बिरणगे व तमेजा मुजावर मॅडम यांनी केले.
आभार उत्तम पाटील यांनी मानले.