शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा पाया आहे. हा पाया मजबूत करण्यासाठी कृषिशिक्षण महत्वाचे योगदान बजावत आहे.पारंपरिक शेतीला फाटा देवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषिदुतांनी केले.
ते हेरले ( ता. हातकणंगले)येथे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या अंतर्गत आयोजित कायक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी सरपंच राहुल शेटे, ग्राम विकास अधिकारी बी.एस.कांबळे आदी मान्यवरांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कृषीदुतांनी ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी उद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती ग्रामस्थांना दिली. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पीक व पीक समस्यांबाबत कृषीदूतन कडून व कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या प्राध्यापकांकडून मार्गदर्शन व्याख्याने प्रात्यक्षिके व तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग, मृदा परीक्षण, एकात्मिक किड व रोग नियंत्रण , पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, अन्नद्रव्य व्यवस्थापन या प्रकारच्या कार्यक्रमांची माहिती ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिली. यावेळी कार्यक्रम पार पाडण्यासाठी कृषिदुत अभिनंदन हनुमाळे , वरुण घोडके, अनिल जंगम, स्वप्निल पाटील, मंथन पाटील. हे कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी.खरबडे. रावे समन्वयक डॉ.बी.टी. कोलगणे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी.पी खराडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
फोटो
हेरले : ग्रामपंचायत येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या आयोजित कार्यक्रम प्रसंगी कृषिदुत