पेठवडगाव / प्रतिनिधी
कोजिमाशि पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांच्या प्रयत्नातून किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ( के.एम. सी. टी.) यांनी वडगाव विद्यालय ( ज्युनि. कॉलेज/ तंत्रशाखा) पेठवडगाव या विद्यालयास सुमारे पाच लाख रुपये किंमतीची पेरू, जांभुळ, सिताफळ, चिंच या फळांची व बांबू आदीची ११ हजार झाडे प्रदान केली.
वृक्षारोपण व रोपवाटप कार्यक्रम प्रसंगी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ( के.एम.सी. टी.) संस्थापक विश्वनाथ पोयेकर,सीएसआर मुख्य विवेकानंद सावंत,पर्यावरण विभाग प्रमुख शरद घनवट, समन्वयक अब्दुल शेख, फ्लीट ग्राफिक्स डिझायनर प्रेमकुमार हुबळे, माजी मुख्याध्यापिका सौ. एस .ए. कुलकर्णी , माजी उपनगराध्यक्ष रंगराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुकुमार पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळ डेळेकर होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे यांनी केले.फ्लीट ग्राफिक्स डिझायनर प्रेमकुमार हुबळे यांनी ट्रस्टच्या वतीने १० लाख झाडांची वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट कार्यक्रमा अंतर्गत केएमसीटीच्या सामाजिक सेवेच्या कार्याचा आढावा घेतला.
संस्थापक विश्वनाथ पोयेकर म्हणाले ट्रस्टने पालघर सारख्या दुर्गम भागात केलेली झाडांची लागवड, गरीब व गरजू विद्यार्थी यांच्यासाठी शाळांची निर्मिती , अन्नछत्र , निवाऱ्याची सोय , डिजिटल क्लासरूमची सोय , कोरोनाच्या काळात विविध भागात पोलीस बंधु भगिनी यांचेसाठी नाष्टयाची सोय, विविध भागात पिण्याच्या पाण्याची सोय केली. संस्थेच्या कार्याची माहिती देऊन ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
सीएसआर मुख्य विवेकानंद सावंत यांनी प्रशालेतील मुलांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून झाडांचे महत्त्व विशद केले.विद्यार्थ्यांच्याकडून झाडे लावून जगवण्याची ग्वाही घेतली व त्याचे फोटो संस्थेला पाठवण्याचे आवाहन केले.विद्यालयासाठी डिजिटल क्लासरुम व पाणी फिल्टर यंत्र देण्याची या प्रसंगी त्यांनी घोषणा केली.
प्राचार्य बाळ डेळेकर म्हणाले,
या शाळेने आम्हाला घडविले आहे. म्हणून शाळेच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम राबवित आहोत.शाळेतील विद्यार्थी अतिशय गरीब कुंटूंबातील असून विद्यालयात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी माझ्या प्राचार्य पदाच्या कालावधीत अनेक उपक्रम माझे स्वतःचे वेतन खर्च करुन राबवत असून त्याचा मला मनस्वी आनंद आहे. केएमसीटी संस्थेने ११ हजार झाडांची अनमोल
भेट शाळेस देऊन हातभार लावला आहे. या ११ हजार झाडांची विद्यार्थी लावगड करून सर्व झाडांचे संवर्धन करून मोठी करतील असे आश्वासन दिले. या वेळी प्रमुख मान्यवरांच्या अमृत हस्ते रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे,परीक्षा विभाग प्रमुख डी.ए.शेळके, तंत्र विभाग प्रमुख अविनाश आंबी, जेष्ठ शिक्षक डी.एस.कुंभार ,सौ. एस.एस.चव्हाण, ए. डी. जाधव, विठ्ठल कुंभार आदी मान्यवरांसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.छायाचित्रण डी. एस. कुंभार व सचिन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अजीत लाड यांनी केले.. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौ.आर.आर. पाटील यांनी मांनले.
फोटो
वडगाव विद्यालयात रोपवाटप कार्यक्रमात मान्यवर व सर्व विद्यार्थी रोपे उंचावून दाखविताना.