हेरले / प्रतिनिधी
हेरले गावातील सहकाराची चळवळ बळकट करण्यासाठी यापुढे छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून विविध संस्था काढून छत्रपती शिवाजी ग्रुप ची घौडदौड कायस्वरूपी चालू राहील असे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी हेरले ( ता. हातकणंगले ) येथील श्री छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेची २८ व्या सर्वसाधारण सभा प्रसंगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक मुंडे होते .मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली.
चेअरमन अशोक मुंडे म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ४ लाख ४ हजार इतका नफा झाला आहे. सभासदांसाठी संस्थेमार्फत ठिबक सिंचन साठी अर्थसहाय्य करणार.संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे.
या प्रसंगी सरपंच राहुल शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार,शेतकरी सोसायटी चेअरमन अरविंद चौगुले,सुरेश चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली.
या सभेस जवाहर पतसंस्थेचे शाखा चेअरमन अबूबकर जमादार,व्हा चेअरमन कपिल भोसले, उदय चौगुले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील,सुकुमार कोळेकर, रावसाहेब चौगुले, पांडू चौगुले, संजय परमाज,आदी मान्यवरांसह सभासद, संस्थेच कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले यांनी मानले.
फोटो:-हेरलेत छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेत मार्गदर्शन करत असताना माजी सभापती राजेश पाटील