हेरले / प्रतिनिधी
गणेशोत्सवामध्ये सामाजिक उपक्रमासह रक्तदान सारख्या शिबिरांचे आयोजन करून एखाद्या व्यक्तीचा जिव वाचवून पुण्याईचे काम करावे व गणेशोत्सव आरोग्यत्सव म्हणून साजरा करावा असे मत शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी यांनी व्यक्त केले ते मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाच्या बैठकी प्रसंगी बोलत होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनिल खारेपाटणे होते.
ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या जुलमी अन्याया विरुद्ध लढण्यासाठी भारतीय तरुणांमध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे व देशहितासाठी भारतीय तरुणांनी एकत्रीत यावे या दुरदृष्टीने लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रोवला आशा विषयावर जिवंत देखावे तरुण मंडळांनी करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले .
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , ग्रा. पं. सदस्य रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, नितिन घोरपडे, सतिश वाकरेकर, जयवंत चौगुले, अमोल झांबरे , महादेव शिदे, महादेव चौगुले, गणेश मोरे, गोपनिय विभागाचे निलेश कांबळे, अभिषेक गायकवाड, यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे यांनी केले . आभार माजी. ग्रा.पं. सदस्य अविनाश पाटील यांनी मानले.
फोटो
सार्वजनिक गणेशोत्सव निमित तरुण मंडळांना मार्गदर्शन करतांना सपोनि पंकज गिरी व ग्रा पं.. पदाधिकारी