हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयुष्यमान भव मोहिमेला सरपंच कस्तुरी पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भव नामफलकाचे आनावरण करून सुरुवात करण्यात आली. तसेच या मोहिमेच्या आनावरण प्रसंगी अवयव दानाची शपथ घेण्यात आली. हि मोहिम दि. १ सष्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोलीच्या मेडिकल ऑफिसर जेसिका अँड्रयूज यांनी मार्गदर्शन केले व म्हणाल्या की, आयुष्यमान भव आपल्या दारी, स्वच्छता अभियान , अवयव दान जागृती यासह आभा कार्डचे महत्व सांगितले. या योजनेत सर्व कुटूंब सामाविष्ट होऊ शकते .तसेच या लाभार्थ्यांना संपूर्ण देशात कोणत्याही खाजगी व सरकारी हॉस्पीटल मध्ये मोफत उपाचार घेऊ शकतात. यावेळी आभा कार्ड व गोल्डन कार्डचे लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेविका भारती ढेंगे यांनी डेग्यू मुक्त विषयीची माहिती व जनजागृतीव स्वच्छाता संदर्भात माहिती दिली. यावेळीसुरेश कांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड , सविता सावंत, दिपाली तराळ, तंटामुक्त अध्यक्ष मधूकर अकिवाटे, सतिश वाकरेकर , अविनाश पाटील , अमोल झांबरे , आरोग्य सेवक पी.एन. काझी, आरोग्य सहाय्यक मोहन साळवी, यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
आभा कार्ड व गोल्डन कार्डचे वाटप तसेच मार्गदर्शन करतांना डॉ. जेसिका अँड्रयूज व मान्यवर