हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील
सौ. वैशाली विशाल करके सहायक शिक्षिका बालावधूत हायस्कुल, मौजे वडगाव यांना रोटरी क्लब ऑफ हॉरिसन कोल्हापूर यांच्या वतीने नेशन बिल्डर पुरस्कार(उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार)
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सौ. वैशाली विशाल करके म्हणाल्या,
हा पुरस्कार लोकसेवा शिक्षण संख्येचे अध्यक्ष बाळासो करके, उपाध्यक्ष नारायण संकपाळ ,शालेय समिती चेअरमन सदाशिव चौगुले, सेक्रेटरी संजय चौगुले, मुख्याध्यापक पी. बी. खांडेकर व माजी मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन व प्रेरणेमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
फोटो
रोटरी क्लब ऑफ हॉरिसन कोल्हापूर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी पुरस्कारकर्तेसह क्लबचे पदाधिकारी.