Tuesday, 12 September 2023

mh9 NEWS

प्राथमिक शिक्षणातून स्री पुरुष समानता कशी रुजवता येईल - डॉ.अजितकुमार पाटील सर

               सामाजिक असमानता
शिक्षणामुळे सामाजिक समता प्रस्थापित होण्यात मदत होईल असा सिद्धांत आहे. सामाजिक समतेतील महत्त्वाचा भाग म्हणजे स्त्रीपुरुष समानता. तेव्हा जातीजमाती- मधील विषमता आणि स्त्रीपुरुष विषमता ही जी दोन आपल्या समाजातील ठळक वैगुण्ये आहेत त्यांचा प्रतिकार शिक्षणप्रक्रियेतून व्हायला हवा. हे काम सहज होणारे नाही. कारण विषमता तशीच चालू रहावी यासाठी त्याला बळकटी आणणाऱ्या अनेक यंत्रणा समाजात सतत कार्यरत आहेत. शिक्षण याचा येथील अर्थ शालेय औपचारिक शिक्षण असा आहे. हे शिक्षण आजतरी शंभर टक्के मुलांपर्यंत पोचतच नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही साक्षरता जेमतेम ५०% माणसांपर्यंत पोचली आहे. आणि तीसुद्धा साक्षरतेची व्याख्या लवचिक आणि पातळ करूनच. उलट विषमता कायम ठेवण्याची यंत्रणा शंभर टक्क्यांपर्यंत आयुष्यभर पोचते कारण तिचे मूळ आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेत आहे. हे सहज शिक्षण जन्मापासून मरणापर्यंत घरीदारी आणि सामाजिक व्यवहारातून माणसांना मिळते. इतकेच नव्हे तर शालेय शिक्षण जे ६ ते १४ वयापर्यंत सक्तीचे आहे ते देणारी, त्याची आखणी करणारी मंडळीही या विषमतेच्या प्रभावातून मुक्त नाहीत. तेव्हा शिक्षणामुळे सामाजिक समता येईल असे समजणे हा आशावाद आहे. परंतु त्याची उभारणी मजबूत पायावर करायची झाली तर शिक्षण देताना सध्यापेक्षा कितीतरी डोळस आखणी आणि अंमलबजावणी हवी हे उघड आहे.

शिक्षण कुणाला मिळतं ?

सुरुवात हवी शिक्षण कुणाला कुणाला मिळतं इथपासून. प्रत्येक मूल शाळेत जातं का ? का जात नाही? शाळांचा विस्तार आता सर्वदूर आहे. पण शाळेत यायची मोकळीक सर्व मुलांना नाही. कितीतरी मुलं आर्थिक कारणांसाठी शाळेत पोचत नाहीत. पोचली तरी १-२ वर्षांत शाळा सोडून देतात व नंतर पुन्हा निरक्षरच राहतात. यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुलींना आईबाप रोजगारावर गेल्यावर घरकाम व लहान भावंडे सांभाळणे यासाठी घरी ठेवले जाते. प्रत्यक्ष पाहणीत असे आढळले की ५-६-७ वर्षांच्या मुलींवर सुद्धा कामाची जबाबदारी टाकली जाते व काम नीट झाले नाही तर त्याना मारहाण होते. एका दृष्टीने ही स्थिती बालकामगारांपेक्षा भयावह आहे. कारण कामगार घराबाहेर काम करत असल्याने त्यांना 
थोडी तरी रोख मजुरी मिळते. मुलींना या कामाचा मोबदला मिळत नाही, मान्यता नाही व जवळजवळ रोजच मारहाण होते. कारण वयाच्या मानाने काम जास्त व जबाबदारीचे असते. ते नीट होणे अशाच स्वतःची खेळण्याची कमी दाबून टाकावी त्यामुळे आत्मविश्वास खच्ची होती व कमी महत्वाचा हे भोवतालच्या माणसांच्या वागणुकीतून जाते. भी विषमतेच्या दृढमूलनाचे सहन शिक्षण म्हणते

परिसरातच शाळा हवी

या प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलींना शिक्षण प्रवाहात ओढायचे तर दोन अटी आहेत. एक म्हणजे शाळा परिसरातच हवी आणि जोडून सांभाळण्याची व्यवस्था हवी. कोसबाडला असा यशस्वी प्रयोग ताराबाई मोडक व अनु वाघ यांनी केला. परंतु आज अशा प्रयोगांची शहरातूनसुद्धा अतिशय गरज आहे. काम जाताना घरातली सर्व मुले शाळेच्या आवारात सोपवून जाता आलं तरच शिक्षण संधी सर्व मुलींना मिळेल. अर्थात अशा शाळांना जोडून आरोग्य केंद्रही हवेच. कारण मुलांचे आरोग्य उत्तम नसले तर ती शिकण्याचा उत्साह कुठून दाखवणार? कित्येक मूल मतिमंद नसले तरी अपुल्या आहारामुळे व सततच्या आजारामुळे मागासलेलेच राहते. याच आरोग्यकेंद्रातून कुटुंब नियोजनाचेही शिक्षण पालकांना देता येईल. थोडक्यात म्हणजे प्रत्येक वस्तीत शाळा हे महत्त्वाचे, नवीन जीवन पद्धतीचे केंद्र ठरले पाहिले, आज तभी परिस्थिती नाही. शाळा वस्तीमध्ये हवी व आजूबाजूच्या सर्वांनी तिथेच शिकायला हवे. कारण लहानपणीच जर आज उच्च नीच समजली जाणारी मुले एकत्र मिसळली, खेळली, त्यांची मैत्री झाली तरच त्यांच्या मनात समतेचे बी रुजेल. आपल्याकडे शाळा या विषमता जोपासण्यात अग्रभागी आहेत. कारण शाळेपासूनच श्रीमंत व गरीब यांच्यात दरी रुंदावते व ती पुढे वाढतच जाते. परिसर शाळा व लहान मुले सांभाळणे ही पहिली गरज. दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे आहाराची सोय. पालक या मुलांना 'डवा' देऊ शकणार नाहीत. तेव्हा शाळातून जेवणाची सोय हवी.

स्त्री- शिक्षिका अत्यावश्यक

मुलींना शिक्षण द्यायचे तर या दोन प्रमुख गरजा आहेत. त्याखेरीज आणखी गरज म्हणजे शाळेत एक तरी स्त्री-शिक्षिका हवीच. कारण मुलींना आपल्या घरगुती अडचणी बोलून दाखवता आल्या पाहिजेत. टोलेजंग माध्यमिक शाळांवर खर्च करण्यापेक्षा वर दिलेल्या किमान सोयी असलेली एक प्राथमिक शाळा दर हजार मुलांमागे उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. किंबहुना ज्या नावाजलेल्या खाजगी शाळा आज आहेत त्यांनी अशा तन्हेचे परिसर शिक्षण देणारी प्राथमिक विद्यालये सुरू करावी यासाठी त्यांना अनुदान देण्यास हरकत नाही. ज्या संस्था फक्त उच्चवर्गीय श्रीमंतांनाच सांभाळतात त्या बंद झाल्या तरी चालेल अशा मताची मी तरी आहे. कारण अशा शाळांतली मुले पुढे विषमतेचे दुष्टचक्र चालू ठेवायला स्वतःच्या अधिकारासनांच्या मोठे झाल्यावर वापरत तरी राहतात त्यांचा दृष्टिकोनात विषमता वर्ग असतो त्यामधून सर्व मुलींनी आपल्या क्षमतेनुसार शिकले पाहिजे तरच आपण एकविसाव्या शतकातीला न्याय देऊ असे मला सार्थ वाटते.

   ----जय हिंद---!

डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर
 ( पीएच डी मराठी )

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :