कोल्हापूर प्रतिनिधी
म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माता पालकांच्या पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इनरव्हील क्लब ऑफ सनराइजच्या अध्यक्ष माननीय मनीषा जाधव माननीय सुरेखा जाधव व माननीय वृषाली बाड त्याचबरोबर परीक्षक म्हणून रेवती कुंभार आणि अनिता पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर यांनी सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यानंतर उत्तम कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच तमेजा मुजावर यांनी तृणधान्यातील आहाराचे महत्त्व सांगितले आजच्या पाककृती स्पर्धेत तृणधान्यापासून पराठा धपाटे इडली आंबोळी, मोदक शिरा वडी खीर चकली, वडा यासारखे आकर्षक व चविष्ट पदार्थ बनवण्यात आले होते यानंतर सर्व पदार्थांचे रेवती कुंभार व अनिता पाटील यांनी परीक्षण करून क्रमांक काढले पाककृती स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रियांका अजय गायकवाड प्रथम क्रमांक निशा महेश माळी द्वितीय क्रमांक शुभांगी जगदीश चौगुले तृतीय क्रमांक प्रज्ञा प्रदीप रणदिवे उत्तेजनार्थ पुनम युवराज कुंभार उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी डॉअजितकुमार पाटील उत्तम कुंभार मीनाज मुल्ला सुशील जाधव उत्तम पाटील आसमा तांबोळी तमेजा मुजावर विद्या पाटील कल्पना पाटील सावित्री काळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनुराधा गायकवाड दिपाली चौगुले कोमल कासे शुभांगी चौगुले नीलम पाटोळे वर्षा दाभाडे सारिका वडर यांनी विशेष सहकार्य केले उत्तम कुंभार सर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले