हेरले / प्रतिनिधी
शिरोली एम. आय.डी.सी. पोलिस ठाणे व ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व महात्मा गांधी हॉस्पीटल ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने गणेशोत्वानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४३ रक्तदात्यानी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन शिरोली एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी व सरपंच कस्तुरी पाटील यांनी केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेद्र मौजे वडगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी मार्गदर्शन केले . ते म्हणाले की , भारत देशामध्ये दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्त ही आशी गोष्ट आहे की ती कृत्रिमरित्या बनविता येत नाही. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. एका रक्तदात्यामुळे पाच लोकांचा जीव वाचू शकतो. गणेशोत्वानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने गावातील तरुण मंडळापुढे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बाळासो पाटील व रुपाली पाटील या पती पत्नीने रक्तदान करुण समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे . यावेळी पोलिस स्टेशनच्या वतीने प्रमाणपत्र व रक्तदात्यांना मोफत हेल्मेट देण्यात आले.
यावेळी सपोनि पंकज गिरी , सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, ग्रामसेविका भारती ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , सतिश वाकरेकर , अमोल झांबरे, अविनाश पाटील, पीएसआय इम्रान मुल्ला, पोलिस कर्मचारी निलेश कांबळे, जगन्नाथ महाले, नितिन भंडारे, अनिल पाटील, ऋषीकेश पवार आदी उपस्थित होते.
एका रक्तदात्यामुळे पाच लोकांचा जीव वाचू शकतो त्यामळे रक्तदान करणाऱ्याचीही सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणून पोलिस ठाण्याच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांना मोफत हेल्मेट देण्यात आले आहे .
सपोनि पंकज गिरी
शिरोली एमआयडीसी
पोलिस स्टेशन
फोटो
रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपास्थित मान्यवर