कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटीकरण कंपनीकरण, अशैक्षणिक कामे रद्द करा व जुनी पेन्शन योजना ताबोडतोब सुरु करा. शिक्षण ही मुलभूत गरज असून शासनाने अलिकडेच शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या चुकीच्या व अन्यायकारी निर्णयाने शिक्षण ही मुलभूत गरज या संकल्पनेचा कडेलोट झाला आहे. आपण शिक्षक विद्यार्थी बेरोजगार युवक व समाजाने शिक्षणाच्या कंपनीकरणास व कंत्राटीकरणास तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अशैक्षणिक व ऑनलाईन कामास विरोध न केल्यास केवळ गोर गरिबांचेच नव्हे तर मध्यम वर्गिय बहुजनांच्या पाल्यांचे आतोनात नुकसान अटळ आहे. औपचारिक शिक्षणाचे क्षेत्र नष्ट केले जात आहे. शिक्षणाचे कंपनीकरण तातडीने माघे घ्या, सक्तीचे मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे प्रत्येक बालकाचा हक्क आहे. त्यासाठी केवळ शिक्षकांना शिकवू दया. कमी पटसंख्येचे कारण देऊन कोणतीही शाळा बंद करू नका, शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा व शिक्षणावर उत्पन्नाच्या ६ टक्के खर्च करा व जुनी पेन्शन योजना ताबोडतोब मंजूर करा या मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता टाऊन हॉलपासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक आमदार जयवंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
चौकट
संस्थाचालक संघ , मुख्याध्यापक संघ,प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक संघटनांनी व विद्यार्थी पालक, बेरोजगार संघटनांनी शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजीच्या भव्य मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेस शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, अध्यक्ष एस. डी. लाड,शिक्षक नेते दादा लाड, बी. जी. बोराडे, बाळ डेळेकर, अनिल लवेकर,
प्रा. किसनराव कु-हाडे,राजाराम वरुटे ,बाबा पाटील, दत्ता पाटील, डॉ.डी.एस. घुगरे, सुधाकर निर्मळे,व्ही. जी. पोवार, आर वाय पाटील, उदय पाटील,के. के. पाटील, काकासाहेब भोकरे, आर.डी. पाटील,सुधाकर सावंत, मिलींद बारवडे, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, मिलींद पांगिरेकर,बी. के. मडिवाळ, संदीप पाथरे,अरुण मुजुमदार, इरफान अन्सारी आदी पदाधिकारीसह ३२ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
बैठकी प्रसंगी बोलतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, शेजारी अध्यक्ष एस. डी. लाड,शिक्षक नेते दादा लाड, बी. जी. बोराडे आदी मान्यवरांसह अन्य.