पेठ वडगाव /प्रतिनिधी
वडगाव विद्यालय ज्युनि. कॉलेज / तंत्र शाखा वडगाव या शाळेस " संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”हातकणंगले तालुका प्रथम क्रमांक पुरस्काराने गौरवण्यात आले. कोजिमाशी चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर यांच्या कार्यकुशलतेने या पुरस्काराचा बहुमान विद्यालयास प्राप्त झाला.
संत सोपानकाका सहकारी बैंक लि. सासवड, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”पारितोषिक वितरण समारंभ २०२२ -२०२३ या वर्षातील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन शिवाजी पार्क,कोल्हापूर येथील सभागृहामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते.या प्रसंगी प्रमुख मान्यवर कोजिमाशी चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर, बी. जी. बोराडे, सचिव दत्ता पाटील,खंडेराव जगदाळे, प्राचार्य डी.एस. घुगरे संपर्क प्रमुख अशोक हुबाळे, सागर चुडाप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
वडगाव विद्यालय ज्युनि. कॉलेज l तंत्र शाखा वडगावमध्ये सुंदर वृक्ष लागवड व संगोपन, अटल लॅब, प्रशस्त सांस्कृतीक सभागृह, प्रशस्त चित्रकला हॉल, प्रशस्त प्रार्थना मैदान, सुसज्ज प्रयोगशाळा, निटनेटके अध्यापन वर्ग, प्रशस्त क्रीडा मैदान, एनसीसी ट्रूप, सुसज्ज स्टाफ रूम, निटनेटके कार्यालय, प्रशस्त वॉशरूम, सुसज्ज टेक्निकल हॉल, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त सुंदर इमारत, आदी संपन्न भौतिक सुविधासह प्रत्येक वर्षी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील उतुंग यशाची परंपरा, शासकिय व अशासकीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश, शासकिय चित्रकला परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा, उत्कृष्ठ छात्रसैनिकांचे प्रशिक्षण व संचलन,शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर प्राचार्य बाळ डेळेकर, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या विविध गुण संपन्न पैलुंचे परीक्षण होऊन हा पुरस्कार शाळेस प्राप्त झाला.
प्राचार्य बाळ डेळेकर म्हणाले या पुरस्कारासाठी 'शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर ' अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई,उपाध्यक्ष शिवाजी सावंत, सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य युवा नेते दौलत देसाई,चेअरमन
सौ. मंजिरी मोरे देसाई यांचे बहुमोल सहकार्य व पाठबळ लाभले. तसेच शिक्षकवृंद , सेवक वर्ग व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याने शाळेस हा बहुमान प्राप्त झाला.
“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”पुरस्कार प्राप्त झालेच्या सन्मार्थ विद्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य बाळ डेळेकर यांच्या हस्ते सेवक वर्ग सतीश पाटोळे, नेताजी कुरवडे, बाबासाहेब पाटील, अविनाश कोळी, रविंद्र चौधरी, संदीप नाकुले आदींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे, कार्यवाह के.बी. वाघमोडे, तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी,जेष्ठ शिक्षक डी.एस. कुंभार , सुवर्णा चव्हाण, परीक्षा विभाग प्रमुख डी.ए. शेळके, काकासाहेब भोकरे,एस.एस. माने, आर.एस. पाटील, यु.सी. पाखरे, पी.ए. पाटील, जे.एम.मणेर आदीसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन अजित लाड यांनी केले.
फोटो
वडगाव विद्यालय ज्यु. कॉलेज वडगावचे प्राचार्य बाळ डेळेकर प्राप्त पुरस्कारासह शेजारी उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद सत्कारमूर्ती सेवक वर्गासह