राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एम.एस् (NMMS )परीक्षेत घवघवीत यश
हेरले /प्रतिनिधी
पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि.कॉलेज मधील इयत्ता आठवीतील ५४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस् (NMMS) परीक्षेत वीस लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.या परीक्षेत विद्यालयातील तब्बल १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.केंद्र स्तरावर वेदांत चव्हाण,स्वरित मोहिते,वीर महाजन, सौगंधिक वंजाळे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती पात्र झाली आहे. तसेच तब्बल ५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८ हजार याप्रमाणे एकूण १९ लाख रुपयांच्या सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशी तब्बल वीस लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे.यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी एस घुगरे सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे व पर्यवेक्षक एस जी जाधव ,प्रशासक एस ए पाटील यांची प्रेरणा लाभाली.तर एस डी पाटील,सौ ए व्ही पाटील, ए डी सिसाळ आणि सौ.बी के शेटे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.