हेरले /प्रतिनिधी
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने, आणि अभत्याला सत्याने जिंकता येते. असे विचार सांगणारे विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी यावेळी पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण संयुक्त ज्येष्ठांच्या वतीने केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील,उर्मिला कुरणे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. गौतम ज्येष्ठ नागरिक यांच्या विरंगुळा केंद्र मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांची मूर्तीचे प्रतिष्ठान माजी मुख्याध्यापक विश्वास भाटे व संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी धम्ममित्र अशोक कटकोळे यांनी सामुदायिक पंचशील, विधायक पंचशील, व बुद्ध पूजा पठण केले. या कार्यक्रम प्रसंगी संयुक्त बौद्ध समाज मोठ्या उत्साहाने उपस्थित होता.