हेरले /प्रतिनिधी
हेरले (ता हातकंणगले) हेरले हायस्कूल हेरले ची दहावीत शिकणारी समिक्षा मनोज लोखंडे हिने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला.
समिक्षा हिने परिस्थितीवर मात करत इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवीत विद्यालयात ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तिने ५०० पैकी ४६६ गुण मिळवीले. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून अत्यंत जिद्दीने तिने हे यश मिळवले. तिचे वडील ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. तर आई खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करते.दररोज सात ते आठ तास अभ्यासाला वेळ देऊन यश मिळवले.या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने मुख्याध्यापक पी. आर शिंदे यांच्यासह शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो:- समिक्षा लोखंडे