कोल्हापूर / प्रतिनिधी
विविध प्रलंबित शैक्षणिक समस्या महाराष्ट्र शासनाने त्वरीत सोडवाव्यात म्हणून बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्था चालक संघ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या महामोर्चात शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर ४६ संघटना सहभागी होणार आहेत.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्ग दर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात महामोर्चा प्रचंडपणे यशस्वी करण्याचा निर्णय झाला.
या सभेस सचिव आर. वाय. पाटील, प्रा.सी. एम.गायकवाड,भरत रसाळे, बी. जी. बोराडे,शिवाजी माळकर,राजाराम वरूटे,प्रसाद पाटील,सुधाकर निर्मळे,प्रमोद ताैंदकर,रविकुमार पाटील,सुधाकर सावंत,उमेश देसाई,संतोष आयरे,सुनिलकुमार पाटील
अमर वरुटे,संभाजी बापट,सदानंद शिंदे,तुषार पाटील,जयंत पाटील,सर्जेराव सुतार,संदीप पाडळकर,बी.एस. पाटील,नेताजी कमळकर,सुभाष कलागते,मनोहर जाधव,एस.एस. बोरवडेकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या महामोर्चात मुख्याधापक संघ, संस्था चालक संघ, शिक्षक भारती,म. रा. कायम विनाअनुदान शाळा संघटना,म. रा. शाळा कृती समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती, कोल्हापूर महानगर माध्य. शिक्षक संघ, शिक्षक परिषद, कनिष्ट महाविद्यालय शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ ( पाटील गट ), प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), स्वाभिमानी शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक सेना, शारिरीक शिक्षक संघटना, डीएड सेवक संघटना, प्रयोग शाळा कर्मचारी महासंघ, शासकिय तांत्रिक माध्य. कर्मचारी संघ, शिक्षण संघर्ष संघटना, पदवीधर शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, स्वयंम अर्थसाहय्य शाळा कृती समिती, सुटा, व्यवसाय शिक्षक संघ, डि. बी. पाटील विचार मंच, महानगर पालिका प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, अखिल भारतीय शिक्षक संघ, डीसीपीएस संघटना, महानगर पालिका शिक्षक संघ, मागासवर्गिय शिक्षक संघटना, कोल्हापूर जिल्हा माध्य. कर्मचारी व शिक्षक संघ, आश्रम शाळा शिक्षक संघटना, विभागिय शिक्षण संस्था संघ, माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ, महाविद्यालयीन प्राचार्य संघटना, पालक संघटना, अपंग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवा संघ, इंग्लिश मेडियम स्कूल असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा माध्य. शिक्षक संघ आदी ४६ संघटना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत आंदोलनात उतरल्या आहेत.
फोटा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत शिक्षक संघटना पदाधिकारी समवेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर,एस. डी. लाड, आर. वाय. पाटील. बी. जी. बोराडे, प्रा. सी. एम. गायकवाड आदीसह अन्य मान्यवर.