कोल्हापूर /प्रतिनिधी
जन जन साक्षरता 'या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अमंलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी केली. या उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळावा शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते अन्य मान्यवर उपस्थित झाला.
वय वर्षे 15 ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना(असाक्षर )पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान , जीवन कौशल्य विकसित करण्या साठी स्वयंसेवक, शिक्षक , विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले. त्याच बरोबर पुणे येथील रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी पाहून महेश पालकर , संचालक योजना , राजेश क्षीरसागर उपसंचालक योजना पुणे यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजा बद्दल रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा , एस सी आर टी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा , प्रधान सचिव आय ए कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , राज्य प्रकल्प संचालक आर विमला , संचालक राहुल रेखा राव , शिक्षण संचालक शरद गोसावी , संचालक कृष्णकुमार पाटील , शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे ,शिक्षण संचालनालय(योजना )महाराष्ट्र राज्य डॉ. महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती. किरण लोहार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेरणा मार्गदर्शन - नाम. उदय सामंत पालकमंत्री,एम देवेंदर सिंह जिल्हाधिकारी ,कीर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी,योगदान स्टाफ योजना विभाग, सर्वं गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटना, शिक्षक
डाएट प्राचार्य व स्टाफ सर्व नवसाक्षर, स्वयंसेवक यांनी अतिशय मन लावून केलेले काम, रत्नागिरी जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्ट च्या 200% हुन अधिक केलेले काम, त्यातील सातत्य यामूळ 35 मंजूर स्टाफ पैकी फक्त्त, 3 च जण कार्यरत असताना हे यश मिळवू शकलो यांचा खूप अभिमान वाटतो.
फोटो
उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळावा शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते होतांना शेजारी अन्य मान्यवर.