हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले ) येथील कौतुक विद्यालयामध्ये गणेशोत्सवानिमित्त हळदी कुंकू समारंभ व पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये घागर घुमवणे, सूप नाचवणे, फुगडी, छिया फू यासारख्या पारंपारिक खेळांचा सर्व महिला पालकांनी आस्वाद घेऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी संगीत खुर्ची उखाणे अशा प्रकारचे मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले. खूप उत्साहाने व हिरीरीने सर्व महिलांनी सदर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व आपला आनंद द्विगुणीत केला. यामध्ये अनुक्रमे सूप नाचवणे - रंजना पाटील,छीया फु - सुश्मिता पाटील,घागर घुमवने - विनिता चौगुले, काटवट कणा - सोनम भोसले, संगीत खुर्ची - ऐश्वर्या हवालदार, काळे मंगळसूत्र - कविता चौगुले,
भांगेत कुंकवाचा टिळा - सुनिता कुंभार, पारंपारिक दागिने - कल्पना माने, एकुलती एक लेक - निशिगंधा माने, सासु सुनेची जोड - सुष्मिता पाटील या महिलांनी बक्षीस पटकावले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला पालकांचे तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करणाऱ्या सर्व महिलांचे कौतुक विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी
शुभांगी ढवळे, अक्षिता कोळेकर,ज्योती पाटील,करिश्मा खतीब, शीतल कोळी, प्रतिक्षा पाटील,नीता माळी, श्वेता पाटील रुपाली घुघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
फ़ोटो:- कौतुक विद्यालय येथे बक्षीस वितरण करत असताना संचालिका जयश्री भोसले मॅडम व इतर मान्यवर