हेरले/ प्रतिनिधी दि. १९/१०/१७
मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत संयुक्त आघाडीचे सरपंच उमेदवार काशिनाथ कांबळे यांनी अपक्ष उमेदवार प्रकाश कांबरे यांच्यावर ११ मतांनी विजय मिळवला. संयुक्त आघाडीने अकरापैकी सहा जागा जिंकून जय शिवराय पॅनेलचा पराभव करीत सत्तांतर घडवून आणले.
सरपंच पदाची निवडणूक चौरंगी झाली. संयुक्त आघाडीचे काशिनाथ कांबळे ( ७६९ ), अपक्ष प्रकाश कांबरे ( ७५८), जय शिवराय आघाडी ( ४९७), जय हनुमान आघाडी ( ४८२) आदी उमेदवारांनी मते घेतली.
आठ ग्रामपंचायत सदस्यासाठी दुरंगी निवडणूक झाली.संयुक्त आघाडीचे सहा विजयी उमेदवार किरण चौगुले ( ४४२), अश्विनी लोंढे( ४१२), सुभाष अकिवाटे (३९७), वैशाली गोरड( ३६७), अवधूत मुसळे( (४५७), सरताज बारगीर( ४५६) या उमेदवारांनी प्रचंड मतांनी परस्पर उमेदवारांवार विजय मिळविला.आघाडीचे नेतृत्व मानसिंग रजपूत, किरण चौगुले, अवधूत मुसळे, मुबारक बारगीर यांनी केले.
जय शिवराय आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध होऊन दोन उमेदवार विजयी अविनाश पाटील ( ३२६), सरिता यादव ( २४८) आदी पाच जागा मिळाल्या. आघाडीचे नेतृत्व श्रीकांत सावंत , रावसाहेब चौगुले, अॅड. विजय चौगुले, सरपंच सतिश चौगुले, सतिश वाकरेकर यांनी केले.
अपक्ष सरपंच उमेदवार प्रकाश कांबरे यांनी सहा महिने परिश्रम घेऊन एकहाती प्रचार यंत्रणा राबवत ७५८ मते मिळवत दोन्ही आघाडीस चॅलेज केले होते. त्यांच्या पाठीशी जनतेने भरभरून साथ देऊन संयुक्त आघाडीच्या बरोबरीने मते पदरात टाकली. त्यांचा ११ मतांनी निसटता पराभव गावातील गटनेत्यांना आत्मपरिक्षण करणारा ठरला आहे.
सरपंच उमेदवार शिवसेना शाखाप्रमुख सुरेश कांबरे यांना जय शिवराय आघाडीने माघारी पर्यंत झुलवत ठेवून नंतर उमेदवारी नाकारली. त्यांनी जय हनुमान आघाडी पुरूस्कृत उमेदवारीने निवडणूकीत उभे राहिले. अवघ्या सहा दिवसात बाळासाहेब थोरवत, धोंडीराम चौगुले, महादेव शिंदे, रामदास कांबरे, नेताजी कांबरे,रावसाहेब चौगुले, बाळासाहेब चौगुले, दादा चौगुले आदींनी खर्चासाठी वर्गणी काढून नेतृत्व करीत दोन्ही आघाडींना आव्हान निर्माण केले. सुरेश कांबरे यांना ४८२ मते मिळाली.जय शिवराव आघाडीने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या मताच्या घटीमुळे ६ जागेवर परिणाम होऊन पराभवास सामोरे जावे लागले. बिनविरोध तीन व निवडणूकीत दोन जागा मिळाल्या. एका सरपंच पदाच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याने गर्वहरण होऊन सत्तेवर पाणी सोडावे लागले.
कांबरे बंधूचे कडवे आव्हानाची राजकारण्यांना प्रचिती!!
पीके सामाजिक सेवाग्रुपचे अपक्ष सरपंच उमेदवार प्रकाश कांबरे यांचा ११ मतांनी पराभव झाला. त्यांनी गटनेत्यांना दाखवून दिले की, हम भी कुच्छ कम नही. तर सुरेश कांबरे यांची ६ तारखेस ऐन निवडणूकीच्या तोंडावर जय शिवराय आघाडीने सरपंच उमेदवारीचा पत्ता कट केला. मात्र सहा दिवसाच्या प्रचार यंत्रणेत आघाडीच्या उमेदरा ऐवढी मते घेऊन सहा उमेदवारांना पराभूत करण्याचा पराक्रम करून जोर का झटका कैसा लगा हे दाखवून दिले.
किरण पॉलीटिक्स किंगमेकर बनले!!
गटनेते किरण चौगुले यांना यापूर्वी दोन निवडणूकीमध्ये उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी उमेदवारी मागायची नाही आपण दुसऱ्यांना दयायची या जिद्दीने या निवडणूकीत पॅनेल तयार केले.ते निवडून तर प्रचंड मतांनी आलेच आणि सरपंच पद, ६ जागा जिंकून किंगमेकर बनले.
शिवसेनेच्या वाघांनी मारला पंजा ! !
जय शिवराय आघाडीने निवडणूकीच्या काळात शिवसेना पुरस्कृत जय हनुमान आघाडीबरोबर फारकत घेतल्याने त्यांचे प्रभाग १,३,४ यातील उमेदवार शिवसेनेने पाडले. त्यामुळे वाघाने मारला पंजा याची प्रचिती जय शिवराय आघाडीस आली. चिडीयॉ चूग गई खेत आब क्या पछतांने का फायदा. अशी चर्चा चौका-चौकात आहे.