भारतामध्ये आयुर्विम्याने पदार्पण १०० वर्षापूर्वी केले. आपल्या देशामध्ये, जो जगातील सर्वात जास्त लोकसंख्येच्यापैकी आहे, विम्याचे महत्व जितक्या व्यापकरित्या पाहिजे, तितके समजले जात नाही. पुढे आहे तो वाचकाला आयुर्विम्याच्या काही संकल्पनांचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न.
संरक्षण:
आयुर्विम्याच्या मार्फत केलेली बचत बचतकर्त्याच्या मृत्युच्या बाबतीत जोखीमीपासून पूर्ण संरक्षणाची हमी देते. त्याच प्रमाणे मृत्यु झाल्यास आयुर्विमा, खात्री देण्यात आलेली (सर्व लागू बोनससह) सर्व रक्कम देण्याची हमी देते, याउलट इतर बचत योजनेत, फक्त बचतीची रक्कम (व्याजासहित) देय होते.
काटकसरीला मदत:
आयुर्विमा काटकसरीला प्रोत्साहन देतो. योजनेमधील अंतर्भूत ’सोप्या हप्त्या’च्या सोईमुळे (विम्यासाठीचे विम्याचेहप्ते एकतर मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असतात) कष्टाशिवाय पैसे भरता येऊ शकत असल्यामुळे दीर्घकालीन बचत करता येते.
आयुर्विमा दोन धोक्यांशी संबंधीत आहे:
1. अकाली मृत्यु झाला तर अवलंबून असणाऱ्या कुंटुंबाला जगण्यासाठी पैसा
2. कोंणत्याही आधाराशिवाय उतारवयापर्यंत जगण्याचा (पेन्शन)
कर भरण्यापासून मुक्तता :
आयकर आणि संपत्तीकरावरील वजावटी उपभोगण्याचा आयुर्विमा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
जेंव्हा तुम्हाला पैशाची गरज असते:
पॉलिसी, योग्य विमा योजना किंवा वेगवेगळ्या योजनांचे एक संयोजन असते, जे वेळोवेळी उद्भवणा-या विशिष्ट आर्थिक गरजा भागवण्यासाठी वापरता येते.