वाडीरत्नागिरी(जोतिबा) - अतिश लादे
येथील महावितरणच्या कार्यालयात भोंगळ कारभार पहावयास दिसुन येत आहे.दोन-दोन दिवस तक्रार करून देखिल दुर्लक्ष करण्याचे काम कर्मचारी करत आहेत.कामाच्या वेळेत स्वतःची कामे करण्यात व्यस्त असतात.तक्रारी बद्दल विचारना केली असता.करतो, नंतर या,अशी उलट-सुलट उत्तरे दिली जातात.फोन केले असता उचलत देखील नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.तसेच कार्यालय उघड़े ठेवून कामाच्या नावाखाली गावातून फिरण्याचे काम करत असताना पहावयास मिळत आहे.यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
फोटो - जोतिबा महावितरण कार्यालयात कर्मचारी नसताना