सिद्धनेर्ली - रवींद्र पाटील
कागल मुरगुड रोड बरोबरच सध्या हया रोडवरील सिद्धनेर्ली येथील नदीकिनारा जवळ असणारऱ्या दूध गंगा नदीवरील पुलाची अवस्था बिकट झाली असून काही ठिकाणी संरक्षण पोलची मोडतोड झाली असून सध्या हा पूल धोकादायक बनला आहे .
सण 1971 साली बधलेल्या या पुलाची लांबी दोनशे 95 फूट असून एकूण आकारा गाळे असणारा हा पूल 22 फूट रुंदीचा आहे . गेली अनेक वर्षे वाहतुकी साठी वापरण्यात येत आहे.कागल मुरगुड रोडवरील हा एक मोठा आणि नेहमीच वर्दळीचा भागातील पूल असल्यामुळे सतत ह्या पुलावरून वाहनांची गर्दी दिसून येते पण सध्या हा पूल धोकादायक बनला असून पुलाच्या बाजूला असणाऱ्या संरक्षण कटडयावरील असणाऱ्या पाईप मोडल्या असून काठीच्या आणि बांबूच्या साहाय्याने या ठिकाणी तात्पुरते उपाय केलेले आहेत .ह्या पुलावर काही ठिकाणी झाडे उगवली आहेत तर पुलाच्या काही भागामध्ये रोडवरती खडये पडलेले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून ह्या पुलाची दुरवस्था वाढत आहे. अनेक ठिकाणी रोड साईटला असणाऱ्या पाट्या निखळल्या आहेत.बाजूचे संरक्षक लोखंडी बार काही ठिकाणी गंजलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे हा पूल दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा हा नमुनाच म्हणावा लागेल अशी परिस्थिती आहे. मुरगुड राधानगरी ह्या भागात जाणारी बरीच अवजड वाहने नेहमीच ह्या मार्गावरून जात असतात सध्या ह्या पुलावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी सामान्य नागरीकाकडून होत आहे.